• 24 Sep, 2023 06:15

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cyber Insurance का आहे महत्वाचा? जाणून घ्या फायदे

Cyber Insurance

सायबर विमा असणे आजच्या काळात फार गरजेचे आहे. अनेकांना याचे महत्व पटले आहे. सायबर विमा आधुनिक डिजिटल लँडस्केपमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसत आहे. वाढत्या सायबर धोक्यांच्या घटना लक्षात घेऊन संभाव्य आर्थिक परिणामांपासून संरक्षण प्रदान करण्याचे काम सायबर विमा करते.

आजकाल आपल्या सगळ्यांचे आर्थिक व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. एकीकडे ऑनलाइन पेमेंटच्या संख्येत वाढ होत असताना सायबर चोरांनी देखील बाजी मारल्याचे दिसते आहे. प्रत्येक दिवशी सायबर चोरांच्या काही ना काही कुरापती समोर येत असतात.

अशात सायबर विमा असणे फार गरजेचे आहे. अनेकांना याचे महत्व देखील पटले आहे. सायबर विमा आधुनिक डिजिटल लँडस्केपमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसत आहे. वाढत्या सायबर धोक्यांच्या घटना लक्षात घेऊन संभाव्य आर्थिक परिणामांपासून संरक्षण प्रदान करण्याचे काम सायबर विमा करते.

सध्या सर्वच छोटे-मोठे व्यवसाय तंत्रज्ञान आणि डेटावर अधिकाधिक अवलंबून असल्याने, सायबर विम्याची गरज आज ग्राहक, व्यावसायिक, छोट्या-मोठ्या कंपन्या, सर्वांनाच भासते आहे. या प्रकारचे विमा कव्हरेज डेटा चोरी, सॉफ्टवेअर बिघाड किंवा त्यावरील सायबर हल्ला यांमुळे होणाऱ्या नुकसानांची भरपाई करते.

सायबर विम्याचे फायदे 

आधीच म्हटल्याप्रमाणे आजकाल सर्वच व्यवहार, व्यापार तंत्रज्ञानावर आधारित आहेत. जर व्यापार प्रणालीसाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर जर सायबर चोरांकडून बाधित झाले तर अशावेळी कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागते.

याशिवाय डेटा चोरी झाल्यास सायबर कायद्याचे देखील उल्लंघन होते. अशावेळी निर्माण झालेल्या कायदेशीर समस्या सोडवण्यासाठी, सिस्टम रिस्टोरेशनसाठी लागणाऱ्या खर्चाची भरपाई यात दिली जाते. काही विमा कंपन्या त्यांच्या ग्राहकांना सायबर हल्ल्यानंतर व्यापाऱ्यांना ब्रांड बिल्डींगसाठी देखील मदत करतात.

कव्हर म्हणजे काय?

सायबर इन्शुरन्सच्या कव्हरेजच्या बाबतीत, प्रत्येक कंपनीचे नियम हे वेगवेगळे असू शकतात हे लक्षात असू द्या. ही विमा सुरक्षा जशी कंपन्यांना दिली जाते तशीच ती सामान्य ग्राहकांना, युजर्सला देखील दिली जाते. ऑनलाइन बँकिंग, ट्रेडिंग, शॉपिंग करणारे सामान्य युजर्स देखील हे विमा संरक्षण घेऊ शकतात.

तुम्ही जेव्हा सायबर विम्यासंदर्भात विमा कंपनीशी बोलणी कराल तेव्हा विम्याचे नियम व अटी आधी जाणून घ्या, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे हे आधीच माहिती करून घ्या.