Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Trekking Insurance: सोलो ट्रिप करणाऱ्यांसाठी इन्शुरन्स का महत्त्वाचा!

Insurance for Solo Trekkers

Trekking Insurance: सोलो ट्रिप किंवा सोलो ट्रेक करणाऱ्यांसाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स महत्त्वाचा का आहे. याची काही कारणे आपण जाणून घेणार आहोत.

ट्रेकिंग किंवा डोंगरदऱ्यांमध्ये एकट्याने फिरण्यासाठी जात असताना ट्रॅव्हल इन्शुरन्स किंवा ट्रेकिंग इन्शुरन्स (Trave Insurance or Trekking Insurance) खूप महत्त्वाचा आहे. सहलीला किंवा फिरण्यासाठी जाताना ज्याप्रमाणे राहण्याची व्यवस्था, जेवण, पाणी किंवा इतर सोयीसुविधा आपण पाहतो. त्याचप्रमाणे ट्रॅव्हल इन्शुरन्स हा सोलो ट्रॅव्हलरसाठी तितकाच गरजेचा आहे.

ट्रेकिंगमधील एखाद्या मोहिमेवर असताना तु्मचा एखादा अपघात झाला किंवा तिथल्या पाण्यामुळे, जेवणामुळे तुमची तब्बेत खराब झाली किंवा अचानक तुमचे सेफ्टी गिअर खराब झाले किंवा एका महत्त्वाच्या कारणामुळे तुम्हाला ट्रिप रद्द करावी लागली तर तुमचे आर्थिक नुकसान अटळ आहे. पण तुम्हाला जर या अचानकपणे येणाऱ्या संकटापासून सुटका करून घ्यायची असेल तर तुमच्यासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स गरजेचा आहे. तो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला या अशा कारणांमुळे होणारा आर्थिक बोजा सहन करावा लागेल.

ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा क्लेम करता येतो. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 'Travel Insurance म्हणजे काय? त्याचे प्रकार आणि फायदे जाणून घ्या', हा लेख आवर्जून वाचा.

सोलो ट्रिप किंवा सोलो ट्रेक करणाऱ्यांसाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स का महत्त्वाचा आहे. याची काही कारणे आपण जाणून घेणार आहोत.

मेडिकल इमर्जन्सी

सोलो ट्रिपमध्ये आपणच आपली काळजी घ्यायची असते. त्यामुळे मेडिकल इमर्जन्सची सामना करण्यासाठी आपल्या ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये मेडिकलचा समावेश असणे गरजेचे आहे. मेडिकल इमर्जन्सीमुळे तुम्हाला कदाचित एक दिवस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी थांबावे लागू शकते. यामुळे हॉस्पिटलवर तुमचा खर्च तर होईलच. पण त्यामुळे तुमचे पुढचे प्लॅनिंगसुद्धा रद्द करावे लागेल. यामुळे तुमचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते.

ट्रिप रद्द करावी लागली तर...

मेडिकल इमर्जन्सीमुळे तुम्हाला तुमची ट्रिप रद्द करावी लागली किंवा सर्व बुकिंग कॅन्सल करावे लागले तर तुमचे बरेच नुकसान होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सची मदत होऊ शकते. जसे की, ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये अशा काही तरतुदी आहेत. ज्याद्वारे तुम्ही रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे पुन्हा मिळवण्यासाठी क्लेम करू शकता.

विमान किंवा ट्रेन मिस झाली तर...

मेडिकल इमर्जन्सीबरोबरच काही कारणामुळे तु्मचा प्रवास किंवा रेल्वे प्रवास होऊ शकला नाही किंवा या प्रवासादरम्यान तुमच्या सामानाची चोरी झाली किंवा हरवले. तर त्याची नुकसान भरपाई मिळण्याची तरतूददेखील ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये उपलब्ध आहे.

काही इन्शुरन्स कंपन्या कोणत्याही प्रकारच्या कारणांचा समावेश ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये करून देतात. पण त्यासाठी त्या जास्तीचा प्रीमिअम आकारतात. तर काही कंपन्या काही टिपिकल Add-on ग्राहकांना देतात.

वैयक्तिक सुरक्षितता

सोलो ट्रिप करताना वैयक्तिक सुरक्षिततात याशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला प्राधान्य असू शकत नाही. त्यामुळे मेडिकल इमर्जन्सी गृहित धरून ट्रॅव्हल इन्शुरन्स काढलाचा पाहिजे.

अशाप्रकारे सोलो ट्रिप करणाऱ्यांनी ट्रॅव्हल इन्शुरन्सला प्राधान्य दिले पाहिजे. पण त्याचबरोबर तुमच्याकडे जर हेल्थ प्लॅन आहे आणि त्यात ट्रॅव्हलिंग करतानाचे अपघात कव्हर होत असतील तर ते चेक करावेत. तसेच काही क्रेडिट कार्ड कंपन्या कार्डधारकांना अॅक्सिडेंटल कव्हर देतात. त्यात ट्रॅव्हलिंगचा समावेश आहे का? आणि असेल तर त्याचे नियम आणि अटी काय आहेत. हे समजून त्याचा योग्य पद्धतीने वापर करावा.