काही दिवसांपूर्वीच ओएनजीसीने (ONGC) कंपनीचे तिमाही निकाल जाहीर करतानाच त्यांच्या शेअरहोल्डर्ससाठी लाभांश सुद्धा जाहीर केला. नफ्याचा काही भाग भागधारकांमध्ये (Shareholders) वाटण्यात येतो तेव्हा त्याला लाभांश म्हणतात. लाभांश (Dividends) द्यायचा की नाही, हा निर्णय कंपनीवर स्वतःवर अवलंबून असतो. लाभांश दिलाच पाहिजे असे काही अनिवार्य नाही. म्हणजेच लाभांश देण्यासाठी कोणताही अनिवार्य नियम नाही. असे असले तरी अनेक कंपन्या शेअरहोल्डर्सना वेळोवेळी लाभांश देत असतात. लाभांशाचा (Dividends) भागधारकांना फायदा होतो हे आपण समजू शकतो. पण हा लाभांश जाहीर करणाऱ्या कंपनीला त्याचा फायदा काय? याचा कधी विचार केला आहे का? त्याबद्दल येथे जाणून घ्या.
गुंतवणूकदार आकर्षित होतात
शेअर बाजारात शेअर्सची घसरण रोखण्यासाठी किंवा अधिक शेअरहोल्डर्सना आकर्षित करण्यासाठी कंपन्या लाभांश जाहीर करतात. परिणामी अधिकाधिक लोक कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. आणि अशाप्रकारे कंपनीच्या शेअर्सच्या दरात वाढ होते. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारसुद्धा अशा कंपन्यांच्या शोधात असतात, जे जास्तीत जास्त लाभांश जाहीर करतात. थोडक्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या लाभांश जाहीर करत असतात.
गुंतवणूकदारांचा विश्वास कायम राहतो
लाभांशाचा थेट फायदा कंपनीला होत नाही. असे असले तरीही कंपन्या शेअरधारकांनाही त्यांच्या नफ्यात वाटा मानतात. अशा परिस्थितीत कंपनीवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी ते त्या भागधारकांना लाभांशाचे वितरण करतात. अशा परिस्थितीत शेअरहोल्डर्सना शेअर्समध्ये काही तोटा झाला असेल तर तो तोटा लाभांशाद्वारे भरून काढला जातो. गुंतवणूकदार कंपनीशी जोडलेला राहतो. त्याचप्रमाणे त्याचा कंपनीवरील विश्वास कायम राहतो.
लाभांशाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी
- प्रत्येक तिमाहीच्या निकालांसह लाभांश जाहीर केला जातो. हे कंपन्यांवर अवलंबून आहे की ते लाभांश कधी देतात, किती देतात आणि किती वेळा देतात.
- तुमच्या खात्यात लाभांश दोन प्रकारे येतो. पहिला म्हणजे लाभांश तुमच्या खात्यात रोख स्वरूपात येईल किंवा अतिरिक्त स्टॉकमध्ये पुनर्गुंतवणुकीच्या स्वरूपात देखील तुम्हाला डिविडेंड मिळू शकतो.
- प्रति शेअर मिळणाऱ्या लाभांशाला लाभांश उत्पन्न म्हणतात. या लाभांश उत्पन्नाचा उपयोग कंपनीच्या शेअर्सच्या शेअर प्राईजच्या तुलनेत कंपनीने तुम्हाला किती लाभांश दिला आहे हे शोधण्यासाठी केला जातो.
- काही म्युच्युअल फंड आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड सुद्धा गुंतवणूकदारांना डिविडेंड देतात.
- लाभांशाची एक्स डेट आणि रेकॉर्ड तारीख असते. एक्स डेट म्हणजे लाभांश पात्रता संपुष्टात येण्याची तारीख. म्हणजेच, समजा जर एखाद्या कंपनीने 10 सप्टेंबर ही एक्स डेट निश्चित केली. तर त्या दिवशी किंवा त्या दिवसानंतर शेअर खरेदी करणाऱ्यांना लाभांशचा फायदा मिळणार नाही.
- रेकॉर्ड तारीख म्हणजे एक प्रकारची कटऑफ तारीख होय. कंपनी ही तारीख ठरवते. कोणता भागधारक लाभांश मिळवण्यास पात्र आहे की नाही हे ठरवले जाते. एक प्रकारे, ही निष्ठा पाहिली जाते की, आपण किती काळ कंपनीचा स्टॉक होल्ड करत आहात हे पाहिले जाते.