Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Who will pay 44 Billion Dollars : जाणून घ्या इलॉन मस्कच्या ट्विटर डिलबद्दल!

Who will pay 44 Billion Dollars

Who will pay 44 Billion Dollars : इलॉन मस्क यांनी 44 बिलियन डॉलर्सला ट्विटरची डील पूर्ण केली. पण इलॉन मस्क हे एकटे 44 बिलिअन डॉलर्स कसे देणार? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. चला तर जाणून घेऊयात 44 बिलियन डॉलर्सची डील आणि या डीलमधील रक्कम इलॉन मस्क कशी देणार आहे?

14 एप्रिल 2022 रोजी सुरु झालेल्या टेस्लाचे मालक आणि अब्जाधीश इलॉन मस्क (Elon Musk) आणि ट्विटर (Twitter) यांच्यातील शाब्दिक युद्धावर आता कुठे पूर्णविराम लागताना दिसत आहे. 27 ऑक्टोबर 2022 रोजी इलॉन मस्क यांनी ट्विटरचा अधिकृतपणे कारभार हाती घेतला. इलॉन मस्क यांनी 44 बिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनांत 3,62,06,588 लाख रुपयांची ट्विटर डील कशी झाली आणि इलॉन मस्क हे एकटे 44 बिलियन डॉलर्स कसे देणार? असे साधे प्रश्न अशा मोठ्या डील्सच्या बातम्या ऐकल्यानंतर आपल्याला नेहमीच पडतात. चला तर मग जाणून घेऊयात कशी झाली ही 44 बिलियन डॉलर्सची डील आणि या डीलमधील 44 बिलियन डॉलर्सची रक्कम कोण देणार आहे?

ट्विटर आणि इलॉन यांच्यात जानेवारी 2022 पासून युद्ध सुरु झाले. ट्विटर ही पब्लिक लिस्टेड कंपनी असून ती न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (New York Stock Exchange) वर लिस्टेड आहे. जानेवारी 2022 मध्ये इलॉन यांनी अमेरिकन सोशल मिडिया कंपनीचे शेअर्स विकत घेण्यास सुरुवात केली व एप्रिल 2022 मध्ये कंपनीच्या 9.1 टक्के भागीदारीचे मालक होऊन ते कंपनीचे सर्वात मोठे शेअरहोल्डर म्हणजेच भागधारक बनले. ट्विटरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या (Board of Director)  खुर्चीवर बसण्यासाठी त्यांना बोलावले गेले जे त्यांनी पहिल्यांदा टाळले. पण नंतर त्यांनी कंपनीचे आमंत्रण स्वीकारले. त्यानंतर 14 एप्रिलला इलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी 44 बिलियन डॉलर्सला विकत घेण्याची ऑफर जाहीर केली. ट्विटरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी एकमताने इलॉन मस्क यांची 44 बिलियन डॉलर्सची ऑफर स्वीकारली आणि अखेर 27 ऑक्टोबरला ही डील क्लोज झाली आणि मस्क ट्विटरचे नवीन मालक बनले. ट्विटरचा कारभार हातात आल्यावर लगेचच मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक उच्च अधिकाऱ्यांना फायर केले.

44 बिलिअन डॉलर्स देणार कोण?

इलॉन मस्क आपल्या वैयक्तिक संपत्तीतून 27 बिलियन डॉलर्स दिले आहेत. उरलेल्या पैशांपैकी 17 बिलियन डॉलर्स हे इतर व्यक्ती व संस्थांद्वारे इन्व्हेस्ट केले गेले आहेत. इलॉन यांनी, बँकांकडून कर्ज घेण्यासाठी टेस्लामधल्या 13 बिलियन डॉलर्सच्या शेअर्सचा वापर करण्याचा प्लॅन होता; परंतु तो फसला. त्यामुळे त्यांनी 15.5 बिलियन डॉलर्स किमतीचे टेस्लाचे शेअर्स एप्रिल आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यात विकले. तर लॅरी एलिसन (Larry Ellison), सॉफ्टवेअर व्यवसाय ओरॅकलचे (Oracle) सह-संस्थापक यांनी त्यांच्या अग्रीमेंटनुसार 5.2 बिलियन डॉलर्स चेक स्वरूपात दिले.

कतार होल्डिंगवर नियंत्रण ठेवणाऱ्या कतार इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटीने (Qatar Investment Authority) देखील या डीलमध्ये पैशांचे योगदान दिले आहे. सौदी अरेबियाचे प्रिन्स अलवालीद बिन तलाल (Alwaleed bin Talal) यांच्या मालकीचे जवळपास 35 मिलियन डॉलर्सचे शेअर्स मस्क यांना हस्तांतरित करण्यात आले. योगदानकर्त्यांना त्यांच्या गुंतवणुकीच्या बदल्यात Twitter चे शेअर्स मिळणार आहेत. उरलेले 13 बिलियन डॉलर्स हे बँकांकडून लोन स्वरूपात घेतले गेले आहेत. मॉर्गन स्टॅन्ले (Morgan Stanley), बँक ऑफ अमेरिका (Bank of America), मित्सुबिशी UFJ फायनान्शियल ग्रुप (Mitsubishi UFJ Financial Group), मिझुहो (Mizuho), बार्कलेज (Barclays), सोसायटी जनरल (Society General) आणि फ्रान्समधील BNP परिबास (BNP Paribas) या बँकांनी हे भलेमोठे कर्ज मस्क यांना दिले. एकट्या मॉर्गन स्टॅन्ले (Morgan Stanley) बँकेने 3.5 बिलियन डॉलर्स मस्क यांना दिले आहेत. या कर्जाची खास बात म्हणजे हे कर्ज मस्क स्वतः देणार नसून नव्या ट्विटर द्वारे हे कर्ज फेडले जाणार आहे.

जानेवारीपासून चालू असलेल्या मस्क यांच्या परिश्रमाचे फळ त्यांना आता भेटत आहे. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीने आपल्या कारनाम्यांनी नेहमीच धक्के दिले आहेत व हा एक धक्का सर्वानाच लक्षात राहणार आहे, असे वाटते. मस्क यांनी आधीपासूनच ट्विटरच्या चुका वेळोवेळी दाखवल्या आहेत. पण ट्विटरकडून कसलाच रिस्पॉन्स न मिळाल्याने त्यांनी कंपनीच विकत घेतली की काय असेही काहींना वाटते. इलॉन मस्क ट्विटरमध्ये अनेक नवे फीचर्स ऍड करणार आहेत व नवे प्लॅटफॉर्म्स देखील येणार आहेत. ते ट्विटरचे अल्गोरिदम ओपन-सोर्स्ड (Open Sourced) करणार असून ट्विटरच्या स्पॅमबॉट्सचा (Spambots) प्रश्न देखील सोडवणार आहेत. या सगळ्या बदलांपैकी सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ते ट्विटरवर मुक्त भाषणाच्या (Free Speech) अधिकाराचा प्रचार करणार आहेत. आधीच्या अनेक घटनांमध्ये ट्विटरवर मुक्त भाषणावरून अनेक टीका झाल्या होत्या. आता मस्क काय बदल आणणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.