Health Insurance Port: एकाच कंपनीची आरोग्य विमा पॉलिसी दीर्घकाळ सुरू ठेवल्यास जास्त फायदे मिळतात. मात्र, बाजारात सध्या नवनवीन पॉलिसी येत आहेत. त्याद्वारे मिळणारे फायदे जुन्या पॉलिसींपेक्षा कितीतरी पटींनी चांगले आहेत. त्यामुळे अनेक जण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी पोर्ट करण्याचा निर्णय घेतात. म्हणजेच पूर्वीपासून सुरू असलेली पॉलिसी दुसऱ्या कंपनीच्या नव्या पॉलिसमध्ये हस्तांतरित (पोर्ट) करतात.
पॉलिसी पोर्ट करताना वेटिंग पिरियड आणि नो क्लो क्लेम बोनस बेनिफिट नव्या कंपनीकडून मिळतील का? असा प्रश्न अनेकांना पडतो. सर्व प्रथम वेटिंग पिरियड म्हणजे काय ते समजून घेऊया.
वेटिंग पिरियड म्हणजे काय?
जेव्हा तुम्ही एखादी विमा पॉलिसी खरेदी करता तेव्हा पूर्वीपासून तुम्हाला असलेले आजार विम्याद्वारे कव्हर केले जात नाही. सहसा 3-4 वर्षांचा वेटिंग पिरियड असतो. त्यानंतर तुम्हाला त्या आजारांसाठी विम्याचे संरक्षण मिळेल. तसेच नो क्लेम बोनस म्हणजे जेव्हा तुम्ही विम्याचा दावा एकदाही करत नाहीत. तेव्हा पॉलिसी रिन्यू करताना कंपनी प्रिमियमवर डिस्काउंट किंवा अतिरिक्त कव्हर देते. हे बेनिफिट पॉलिसी पोर्ट केल्यानंतर मिळतात का? ते जाणून घेऊया.
नव्या पॉलिसीत पुन्हा वेटिंग पिरियड लागू होईल का?
समजा, तुमच्या आधीच्या पॉलिसीचा वेटिंग पिरियड आणि पोर्ट करत असलेल्या पॉलिसीचा वेटिंग पिरियड 4 वर्षे आहे. मात्र, तुम्ही तिसऱ्या वर्षी पॉलिसी पोर्ट करत आहात. अशा वेळी नवी कंपनी वेटिंग पिरियडमध्ये फक्त 2 वर्षच सूट देईल. म्हणजेच तुम्हाला नव्या कंपनीच्या नियमानुसार उर्वरित वेटिंग पिरियड पूर्ण करावा लागेल. आधीचे 2 वर्ष वजाकरून आणखी दोन वर्षांचा वेटिंग पिरियड लागू होईल.
मात्र, जर आधीच्या कंपनीत तुम्ही 4 वर्षांचा वेटिंग पिरियड पूर्ण केलेला असेल तर पोर्ट केल्यावर वेटिंग पिरियड पूर्ण करण्याची गरज नाही. तुमचे पूर्वीचे आजारही पहिल्या दिवसापासून कव्हर होतील. विमा कंपनीनुसार नियमांमध्ये बदल होऊ शकतो.
विमा नियामक इर्डाच्या नियमानुसार पोर्ट केल्यानंतर कंपनीने ग्राहकाला आधीच्या पॉलिसीचे बेनिफिट नव्या पॉलिसीतही द्यावे, असे म्हटले आहे. म्हणजेच तर आधीच ग्राहकांना जुन्या पॉलिसीमध्ये वेटिंग पिरियड पूर्ण केला असेल तर त्याला पुन्हा वेटिंग पिरियडची अट लागू करू नये. विमा पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी 45 दिवस आधी पोर्टिंगची प्रक्रिया तुम्हाला सुरू करावी लागेल. नव्या पॉलिसीचे बेनिफिट नीट काळजीपूर्वक पाहूनच निर्णय घ्यावा.
नो क्लेम बोनसचे काय होते?
जर तुम्ही संपूर्ण वर्षभरात विम्याचा दावा केला नसेल तर सहसा कंपनी नो क्लेम बोनस देते. पुढील वर्षीच्या प्रिमियमवर डिस्काउंट किंवा अतिरिक्त कव्हर देते. समजा, तुमचा 5 लाखांचा विमा कव्हर आहे. मात्र, तुम्ही कोणताही क्लेम केला नाही. तर पुढील वर्षी विमा कंपनी 1 किंवा 2 लाख रुपये नो क्लेम बोनस देऊ शकते. किंवा पुढील वर्षीच्या प्रिमियमवर ठराविक टक्के डिस्काउंट देईल. पॉलिसी पोर्ट करताना सहसा विमा कंपन्या हे बेनिफिट सुद्धा ग्राहकांना मिळते.