काही खरेदी करायचे म्हटल्यावर सर्वात आधी त्याची गरज काय हे पाहूनच आपण ती गोष्ट घ्यायची की नाही याची प्लॅनिंग करतो. त्यामुळे या दोन गोष्टीपैकी एक निवडणे खरंच गोंधळात टाकणारे आहे. कारण, दोन्ही प्रकाच्या प्लॅनमध्ये अनेक प्रकारचे फायदे आहेत. यामुळेच काय निर्णय घ्यायचा हे विशेषत: त्या व्यक्तीच्या आर्थिक ध्येयांवर आणि इन्शुरन्स कव्हरेजवर अवलंबून आहे. तरी या दोघात काय विशेष आहे ते जाणून घेऊया.
टर्म प्लॅन म्हणजे काय?
टर्म प्लॅनद्वारे लाईफ इन्शुरन्स घेता येतो, म्हणजेच तुमच्या आयुष्याला संरक्षण मिळते. तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबियांना आर्थिक संकटाना तोंड देण्याची गरज पडू नये. यासाठी टर्म प्लॅन कामी येतो. या पॉलिसी अंतर्गत, इन्शुरन्स घेणाऱ्याला मासिक किंवा वार्षिक एक ठरलेली रक्कम म्हणजेच प्रीमियम भरावा लागतो. तो भरल्यास पॉलिसी धारकाला त्या कालावधीसाठी इन्शुरन्स कव्हरेज मिळतो. टर्म इन्शुरन्स प्लॅनचा कालावधी 10 वर्ष ते 30 वर्षांपर्यंत असू शकतो.
ही पाॅलिसी तुमच्या बजेटमध्ये असून त्यावर तुम्हाला अधिक कव्हरेज मिळणार आहे. तसेच, प्रीमियमची रक्कम देखील अन्य पॉलिसींच्या तुलनेत खूप कमी असते. टर्म इन्शुरन्स पॉलिसी ही फक्त लाईफ इन्शुरन्स देते. त्यामुळे सर्व पगारदारांना टर्म प्लॅन घेण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे कुटुंबाचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होण्यास मदत मिळते. त्यामुळे टर्म प्लॅन निवडणे चांगला पर्याय ठरु शकतो.
मनी बॅक पॉलिसी म्हणजे काय?
टर्म प्लॅनपेक्षा मनी बॅक पॉलिसी खूप वेगळी आहे कारण, यामध्ये पाॅलिसी धारकाला इन्शुरन्स आणि सेव्हिंग्ज या दोन्हींचा लाभ घेता येते. या पाॅलिसीद्वारे एक ठरावीक रक्कम पाॅलिसीच्या संपूर्ण मुदतीमध्ये पाॅलिसी धारकाला ट्रान्सफर करण्यात येते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कमाईचा विश्वासू मार्ग हवा असले तर ही पाॅलिसी सर्वोत्तम आहे. कारण, या पाॅलिसीद्वारे मुलांचे शिक्षण, लग्न आणि इतरही बऱ्याच गोष्टी साध्य करता येतात.
यामुळेच ही पॉलिसी घेण्यासाठी लोक आकर्षित होतात. तसेच, या पाॅलिसीमध्ये मॅच्युरीटीचे बेनिफिट मिळतात, त्यामध्ये तुम्हाला बोनससह इन्शुरन्सच्या रकमेतील शिल्लक रक्कमही ती असल्यास मिळते. तसेच, या पाॅलिसीचा प्रीमियम टर्म प्लॅनपेक्षा अधिक असतो. कारण, एका ठराविक अंतराने यातून पैसे काढले जातात, त्यामुळे याचा प्रीमियम जास्त असतो. याशिवाय इन्शुरन्स कव्हरही टर्म प्लॅनपेक्षा कमीच असते.
खास पर्याय कोणता आहे?
आता तुम्हाला दोन्ही पाॅलिसीविषयी समजलेच असेल. त्यामुळे आपल्या गरजेनुसार पाॅलिसी घेणे सोयीचे ठरु शकते. जर तुम्हाला दीर्घ काळासाठी संरक्षण आणि अधिक कव्हरेज पाहिजे असेल तर टर्म प्लॅन बेस्ट आहे. जर तुम्हाला काही आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करायची असेल आणि कमी अवधीत फायदा हवा असेल तर तुम्ही मनी बॅक पॉलिसी निवडू शकता.