Single-Term Life Insurance: जर तुम्ही लाइफ इन्शुरन्सचा प्रीमियम भरण्यास विसरलात किंवा तुम्हाला भरणे कठीण वाटत असेल, तर तुम्ही सिंगल प्रीमियम टर्म प्लॅनची निवड करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला आयुष्यात एकदाच प्रीमियम भरावा लागेल. ज्याचा लाभ तुम्हाला मिळत राहतो. महत्वाचे म्हणजे तुमच्या सोईनुसार प्लॅन कुठलाही घ्या, परंतु तुमच्याकडे एखादी चांगली जीवन विमा पॉलिसी असणे आवश्यक आहे.
Table of contents [Show]
सिंगल प्रीमियम टर्म प्लॅन
सिंगल प्रीमियम टर्म प्लॅन केवळ जीवन विमा पॉलिसी अंतर्गत येतो. तुम्ही ही पॉलिसी खरेदी करता तेव्हाच तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल. ज्याचा लाभ पॉलिसीनुसार 20 ते 30 वर्षांपर्यंत मिळू शकतो. ज्यामध्ये सर्वात चांगला फायदा म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रीमियम भरावा लागणार नाही.
कुणाकरीता आहे सोईस्कर
असे नागरिक ज्यांचे उत्पन्न शॉट टर्ममध्ये वाढते. सिंगल प्रीमियम योजना त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे. यामध्ये क्रिकेटर्स किंवा फिल्म स्टार किंवा अशा लोकांचा समावेश केला जाऊ शकतो, ज्यांनी अल्पावधीत चांगली कमाई केली आहे. किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या बचतीतूनही या योजनेत गुंतवणूक करू शकता. कारण यामध्ये संपूर्ण प्रीमियम एकाच वेळी भरावा लागतो. ज्याचा लाभ तुम्हाला आयुष्यभर मिळू शकतो. म्हणूनच तुमच्याकडे एकाच वेळी इतके पैसे जमा केले पाहिजेत की सर्व प्रीमियम एकाच वेळी भरले जातील.
टर्म प्लॅन इन्शुरन्स
जर तुमचे उत्पन्न ठराविक कालावधीनंतर येत असेल, तर तुमच्यासाठी नियमित टर्म प्लॅनचा पर्याय योग्य आहे. कारण यामध्ये तुम्हाला ठराविक कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागेल. ज्याचा लाभ तुम्हाला मिळत राहतो. परंतु जर तुमचे अल्प मुदतीचे उत्पन्न असेल तर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय एकल प्रीमियम टर्म प्लॅन असेल.
प्रोफेशन वरुन ठरवा नियम
समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 25 व्या वर्षी नियमित टर्म प्लॅन घेतला असेल, तर वयाच्या 60 वर्षापर्यंत म्हणजेच पुढील 35 वर्षांपर्यंत, तुम्हाला त्याचा प्रीमियम भरावा लागेल. तसेच सिंगल प्रीमियम टर्म प्लॅन घेतला असेल, तर वयाच्या 25 व्या वर्षी तुम्हाला पूर्ण प्रीमियम भरावा लागेल. म्हणजेच तुम्ही कोणत्या प्रोफेशनमध्ये आहात त्यानुसार तुमच्यासाठी कोणती योजना अधिक चांगली असेल, हे ठरवता येईल. पगारदार लोकांसाठी नियमित टर्म प्लॅन हा सर्वोत्तम पर्याय मानला जाईल.