Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Single Premium Or Regular Premium Policy: कोणती पॉलिसी घ्याल, सिंगल प्रीमियम की रेग्युलर प्रीमियम पॉलिसी, जाणून घ्या फरक

Single Premium and Regular Insurance Policies

Single Premium Or Regular Premium Policy: दोन्ही प्रकारच्या पॉलिसीज् जरी भारतीय प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचे फायदे देत असल्या, तरी देखील Single Premium पॉलिसीसाठी ही टॅक्स मधील सूट केवळ ती पॉलिसी खरेदी केलेल्या वर्षासाठी क्लेम करता येत असते. मात्र Regular Premium पॉलिसीधारकाला कर सवलतीचा दावा करण्याचा पर्याय दरवर्षी उपलब्ध असतो.

नवीन वर्ष सुरु झाले की चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या क्वार्टरमध्ये आपला प्रवेश होणार आहे. व्यावसायिक (Business Person) आणि विशेषतः नोकरदार वर्गासाठी (salaried) गुंतवणुकीचा निर्णय घ्यायला भाग पाडणारा “31 मार्च” अचानक कधी समोर दिसायला लागेल, समजणार देखील नाही. मार्चची चाहूल लागली की, टॅक्स वाचविण्यासाठी इन्शुरन्स पॉलिसीज् मध्ये गुंतवणूक होऊ शकेल काय? याची चाचपणी सुरु होऊ लागते. इन्शुरन्स पॉलिसीसाठीची गुंतवणूक केव्हाही एक “सेफ बेट” मानली जाते. पण मग प्रश्न पडतो तो, एकल प्रीमियम लाईफ इन्शुरन्स पॉलिसी (Single Premium)  आणि  नियमित प्रीमियम लाईफ इन्शुरन्स पॉलिसी (Regular Premium) या दोन उपलब्ध पर्यायांपैकी आपल्याला योग्य ती पॉलिसी निवडण्याचा!

Single Premium म्हणजे एकल प्रीमियम लाइफ इन्शुरन्स पॉलिसी सुरू होण्यापूर्वी पॉलिसी-इच्छूकाला एकदाच एकरकमी रक्कम ”प्रीमियम” म्हणून भरावी लागते. सहसा या पॉलिसीज् किमान 110% रिटर्न्स प्रदान करतात. आणि जास्तीत जास्त मिळणारी रक्कम ही सुरुवातीच्या रकमेच्या सुमारे दहा पटीने मिळू शकणार असते. याउलट Regular Premium म्हणजे नियमित प्रीमियम पॉलिसीच्या संपूर्ण पॉलिसी टर्ममध्ये पॉलिसीधारक व्यक्ती नियमित वेळेच्या अंतराने प्रिमिअमची रक्कम इन्शुरन्स कंपनीकडे अदा करत असतो. प्रीमियम भरण्याची वारंवारता monthly (मासिक), quarterly (त्रैमासिक), semi-annually (अर्ध-वार्षिक) किंवा annually (वार्षिक) असू शकते.

Single Premium पॉलिसी प्रकारच्या पॉलिसीमध्ये सुरुवातीला एकदा संपूर्ण प्रीमियमची रक्कम अदा केली की, नंतर पॉलिसीधारकावर कोणतेही ऑब्लिगेशन राहत नाही. त्याची जबाबदारी संपलेली असते. ना त्याला प्रीमियम भरायचा दिनांक (Premium Due Date) लक्षात ठेवावा लागत ना पॉलिसी लॅप्स होण्याची भीती राहत !!!  Regular Premium पॉलिसीच्या सक्रिय राहण्याकरिता मात्र पॉलिसीधारकाला नियमितपणे “न चुकता / न विसरता” प्रीमियम भरत राहावा लागतो. अर्थात ECS (electronic clearance) सिस्टम सुरु झाल्यापासून “Regular Premium” पॉलिसीच्या प्रीमियमच्या तारखा लक्षात ठेवण्यापासून रिलीफ मिळाला आहे, हे निश्चित!

Regular Premium प्रकारची पॉलिसी सामान्य पगारदार व्यक्ती किंवा लहान व्यावसायिकांसाठी आर्थिक नियोजन करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. प्रीमियमची रक्कम वर्षे किंवा महिन्यांमध्ये विभागली गेली असल्याने सर्वसामान्य व्यक्तीला देखील प्रीमियमचा दर परवडू शकतो. पण याउलट Single Premium पॉलिसी निवडताना वॉलेटवर एकाचवेळी मोठी रक्कम भरण्याचा ताण येतो. मात्र असे पेमेंट आपले बजेट एखाद्द्या विशिष्ट वर्षासाठीच बिघडवू शकते.

वरवर पाहता Single Premium पॉलिसीज् नेहमीच किफायतशीर वाटतात. परंतु, आपण  महागाईचा दर (सद्यस्थितीमधील दर 6%) आणि त्याचे दीर्घ कालावधीमधील मूल्य लक्षात घेतले तर, एकाच वेळी फार मोठी रक्कमेचा प्रीमियम तर भरावा लागतोच, परंतु पॉलिसीधारकाने या प्रॉडक्टमध्ये जास्त मूल्याच्या रक्कमेची गुंतवून केलेली असते.  याउलट Regular Premium पॉलिसी पॉलिसीधारकाला रुपयाच्या  “कॉस्ट ऑफ ऍव्हरेजिंग”चा फायदा तर देतेच आणि बाजारातील जोखमीपासून देखील वाचवते.

सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही प्रकारच्या पॉलिसीज् जरी भारतीय प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचे फायदे देत असल्या, तरी देखील Single Premium पॉलिसीसाठी ही टॅक्स मधील सूट केवळ ती पॉलिसी खरेदी केलेल्या वर्षासाठी क्लेम करता येत असते. मात्र Regular Premium पॉलिसीधारकाला कर सवलतीचा दावा करण्याचा पर्याय दरवर्षी उपलब्ध असतो.

Regular Premium पॉलिसीज अनेकदा अतिरिक्त लाभांसह येतात. त्यामध्ये अपघात, आजार इ. कव्हर करणारे किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास मिळणारा “WOP - Waiver of Premium” सारखे रायडर्स समाविष्ट असतात. मात्र Single Premium पॉलिसीसाठी आधीच प्रीमियमची रक्कम भरल्याने असे अतिरिक्त बेनिफिट्स उपलब्ध नसतात.  

थोडक्यात काय तर, आपण आपली जोखीम घेण्याची क्षमता, आर्थिक शिस्त आणि खिशाला परवडण्याच्या गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेतला तर दीर्घकालीन फायदा होऊ शकतो. आणि ही गोष्ट संपूर्णपणे व्यक्तिनिष्ठ (subjective) स्वरूपाची असेल.