Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cheap Rate in Mobile: जाणून घ्या, कमी बजेटमध्ये कोणते मोबाईल खरेदी करता येईल?

Which is Best Mobile in Low Price

Which is Best Mobile in Low Price: शाळेसाठी मुलांना मोबाईल खरेदी करायचं आहे, कमी किंमतीत मोबाईल घ्यायचा, आता बजेट नाही त्यामुळे साधाच मोबाईल घ्यायचयं असे एक ना एक वाक्य कानावर पडतात, अशाच ग्राहकांसाठी एकदम स्वस्तातील तीन मोबाईल कोणते आहेत, ते जाणून घेवुयात.

Low Price in Mobile: एक चांगला स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, पण सध्या बजेट नाही. अशाच ग्राहकांसाठी ब्रॅंडेड कंपनीचे अगदी स्वस्तातील तीन मोबाईल सांगणार आहोत. हे मोबाईल तुम्ही बिलकुल कमी किंमतीत खरेदी करू शकता. तुम्हाला परवडेल अशाच दरात हे स्मार्टफोन आहेत. त्यामुळे त्यांच्या किंमती व फिचर्स जाणून घेवुयात.

पोको M5 (POCO M5)

पोको हा मोबाईल बाजारात अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहे. याची किंमत जवळपास 12,499 रू. इतकी आहे. विशेष म्हणजे फ्लिपकार्टवर या दरात तुम्हाला डिस्काउंट मिळण्याची शक्यता आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत 12000 रूपयांपेक्षा कमी होणार आहे. 1080x2800 पिक्सेल रिझोल्यूशनसोबत हा मोबाईल 6.68 इंच असून फुल एचडी + IPS डिस्प्लेचा आहे. हा डिस्प्ले 90 Hz पर्यंतच्या व्हेरिएबल रिफ्रेश रेटला सपोर्ट देतो. वॉटरड्रॉप नॉच डिझाइनसह या डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट 240Hz आहे. डिस्प्ले संरक्षणासाठीचा ग्लास ही जबरदस्त आहे.

POCO M5
http://www.notebookcheck.net/

सॅमसंग गॅलेक्सी F13 (Samsung Galaxy F13)

हा Galaxy F13 मोबाईल तुम्ही फक्त 11999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये 6.6 -इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. 4 GB रॅम असून 128 GB इंटर्नल स्टोरेजसोबत Exynos 850 प्रोसेसर मिळतो. 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000 mAh बॅटरी आहे. याव्यतिरिक्त मोबाईलमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टमदेखील आहे. मोबाईला 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सरसुद्धा आहे.

Samsung Galaxy F13
http://www.smartprix.com/

लावा ब्लेझ 5G (Lava Blaze 5G)

Lava Blaze 5G हा मोबाईल एकदम स्वस्तात उपलब्ध आहे. याची किंमत फक्त 6999 रूपये आहे. हा मोबाईल 6.51 इं असून HD Plus डिस्प्ले आहे. याचे रिझोल्यूशन 720 x 1600 पिक्सेल आणि 90 Hz रीफ्रेश आहे. यामध्ये 4 GB रॅम असून 3 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅमदेखील उपलब्ध आहे. 128 GB स्टोरेजचा सपोर्टसुद्धा आहे.  

Lava Blaze 5G (1)
http://www.lavamobiles.com/