Home Loan Offers : घर घेण्याचं किंवा घर बांधण्याचं आपलं स्वप्नं प्रत्यक्षात उतरावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. घर खरेदी करतांना किंवा विकत घेतांना गृहकर्ज आपल्याला फार मदत करते. देशातील अनेक बँका आणि वित्तीय संस्था गृहकर्ज देतात. आरबीआय ने रेपो दर कायम ठेवल्यामुळे आता, गृहकर्ज घेणे अधिक सोपे झाले आहे. कारण गृहकर्जावर आता अधिक व्याजदर द्यावा लागणार नाही. ही गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आता आपण कोणती बँक किंवा वित्तीय संस्था, कमीत कमी किमतीत गृहकर्ज उपलब्ध करुन देते, ते बघुया.
Table of contents [Show]
एलआयसी हाऊसिंग फायनान्स
LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LICHF) वार्षिक ८.४५ % दराने गृहकर्ज देत आहे. LIC हाऊसिंग फायनान्स 30 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी गृहकर्ज देत आहे. इतर कुठल्या वित्तीय संस्थेमधून आधीच गृहकर्ज घेतले असणारे ग्राहक देखील त्यांचे कर्ज येथे हस्तांतरित करू शकतात. LICHFL गृह वरिष्ठ होम लोन योजनेअंतर्गत पेन्शनसारखे फायदे उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्ही वयाच्या 80 वर्षापर्यंत कर्ज घेऊ शकता.
एचडीएफसी लिमिटेड
होम फाइनेंसिंग मध्ये HDFC ही गृह कर्ज देणारी बँक देखील आहे. ही बँक वार्षिक ८.५ % दराने कर्ज देत आहे. यामध्ये 30 वर्षांपर्यंत 10 कोटी रुपयांपर्यंतचे गृहकर्ज दिले जात आहे. कंपनी होम लोन बॅलन्स ट्रान्सफरची सुविधाही देत आहे. ही सुविधा कर्जदारांना त्यांचे कर्ज इतर बँकांकडून किंवा गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडून हस्तांतरित करण्यात मदत करते.
बजाज हाऊसिंग फायनान्स
Bajaj हाउसिंग फायनान्स कंपनी वार्षिक ८.५ % दराने गृहकर्ज देत आहे. ही कंपनी 30 वर्षांच्या कालावधीसाठी 5 कोटी रुपयांपर्यंतचे गृहकर्ज देत आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स शिल्लक हस्तांतरणाच्या सुविधेशिवाय 1 कोटी रुपया पर्यंतचे गृहकर्ज टॉप-अप पर्याय देखील देत आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स मध्ये 10 मिनिटांत ऑनलाइन गृहकर्ज अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा ग्राहकांना देण्यात आली आहे. यामध्ये निवडक ग्राहकांना पूर्व-मंजूर गृहकर्ज देखील दिल्या जाते.
टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स
Tata Capital हाऊसिंग फायनान्स वार्षिक 8.6% दराने व्याज देत आहे. हे 30 वर्षांच्या कालावधीसाठी कमाल 5 कोटी रुपयांपर्यंतचे गृहकर्ज देत आहे. गृहकर्ज घेण्यास वयोमर्यादा 24 ते 65 वर्षे दरम्यान असावी. तसेच, तुमचा किमान CIBIL (क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड) स्कोअर 750 पर्यंत असावा.