• 08 Jun, 2023 01:37

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Wheat Prices: गव्हाच्या होलसेल किंमतीत वाढ; किरकोळ बाजारातही दरवाढीची शक्यता

Wheat Prices Rise

देशातील प्रमुख शहरांतील घाऊक बाजारात गव्हाचे दर 4% वाढले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत किरकोळ बाजारात दरवाढ होण्याची शक्यता आहे. बाजार समित्यांमध्ये नव्या गव्हाची आवक रोडावल्याने भाववाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Wheat Prices Rise: मागील वर्षी रब्बी हंगामात गव्हाचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे किरकोळ बाजारात गव्हाचे दर 4000 क्विंटलच्याही पुढे गेले होते. यंदा गव्हाचे उत्पादन देशभरात चांगले झाले असले तरी अवकाळी पावसाने पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेशात उभ्या पिकाचे नुकसाने झाले. सरकारनेही गव्हाची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली आहे. मात्र, आता घाऊक बाजारात गव्हाचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम लवकरच किरकोळ बाजारातही होऊ शकतो.

घाऊक बाजारात 4% दरवाढ

देशातील प्रमुख शहरांतील घाऊक बाजारात गव्हाचे दर 4% वाढले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत किरकोळ बाजारात आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्ली शहरात सर्वप्रथम दरवाढ दिसून आली आहे.  (Wheat Prices in Maharashtra) एप्रिल ते जून दरम्यान रब्बी हंगाम असतो. या काळात नव्या गव्हाची आवक बाजारात होत असते. पुरवठा जास्त असतानाही दरवाढ नक्की कशामुळे होतेय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

दरवाढीमागे कारण काय?

चांगला भाव मिळावा म्हणून शेतकरी घरीच गहू ठेवत असून बाजारात आणत नाहीत. शेतकऱ्यांची साठेबाजी दरवाढीचं कारण असल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात साठेबाजी सुरू असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणे आहे. दरम्यान, संपूर्ण भारताला या राज्यांतून गव्हाचा पुरवठा होता. त्यामुळे येत्या काळात किरकोळ बाजारात गव्हाच्या किंमती चढ्या राहण्याची शक्यता आहे.

wheat-prices-in-maharashtra-1.jpg

मोठ्या बाजार समितीमध्ये गव्हाचा पुरवठा थांबला आहे. पंजाब आणि हरियाणा राज्यातून सरकारने पुरेसा गहू खरेदी केला आहे. मात्र, मध्यप्रदेश राज्यात सरकारला जेवढा गहू खरेदी करायचा होता तेवढा कोटा पूर्ण झाला नाही. मात्र, आता बाजारात नवा गहू येतच नसल्याने दरवाढ होऊ लागली आहे, असे शिवाजी फ्लोअर मिलचे प्रमुख अजय गोयल म्हणाले. मागील वर्षी गव्हाचा तुटवडा जाणवल्याने मिलसुद्धा बंद ठेवण्यात आल्या होत्या.

2022-23 आर्थिक वर्षातील रब्बी हंगामामध्ये फूड कार्पोरेटशन ऑफ इंडियाने 18.8 मेट्रिक टन गहू खरेदी केला होता. त्यात चालू वर्षी 43% वाढ होऊन 25 मिलियन टनवर खरेदी गेली आहे. दरम्यान, मागील वर्षी उष्णतेच्या लाटेमुळे गहू पिकाचे नुकसान झाल्याने गव्हाचे उत्पादन कमी झाले होते.

अवकाळी पावसाचा गव्हावर परिणाम

यंदा अवकाळी पावसाने अनेक राज्यात धुमाकूळ घातला. रब्बी हंगामातील गहू काढणीला आला असताना अनेक ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे गव्हावर पांढरे डाग पडले आहेत. असा डागाळलेला गहू सरकारनेही खरेदी केला आहे. त्यामुळे सरकारी राशन दुकानात मिळालेल्या गव्हावर पांढरे डाग दिसले तर ते अवकाळी पावसाचे आहेत, असे समजून घ्या. गव्हाची गुणवत्ता कमी झाली नसून फक्त डाग पडल्याचे सरकारने म्हटले होते. तसेच किती प्रमाणात डागाळलेला गहू खरेदी करायचा हे सुद्धा ठरवले होते.