What should I look for in a personal accident policy: आरोग्य विमा कवच याप्रमाणेच वैयक्तिक अपघात विमा म्हणजेच Personal accident policy खरेदी करणे महत्वाचे मानले जाते. या प्रकारची पॉलिसी घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे, पॉलिसीमध्ये काय तपासले पाहिजे ते आता बघूया.
पॉलिसी कव्हर, प्रीमियमची रक्कम (Policy coverage and premium)
आपल्या पॉलिसीमध्ये काय काय कव्हर होते ते बघावे. आपल्या दिनक्रमाचा विचार करून त्यासंबंधित अपघाताच्या घटना कव्हर होतात का ते पहावे. तुम्ही नियमित आंतरराष्ट्रीय प्रवास करत असाल तर त्या सर्व गोष्टी यात कव्हर होतात का तेदेखील पहावे. प्रीमियम रक्कम किती आहे, याचे विचार करणेदेखील महत्वाचे आहे. तुमच्या बजेटचा विचार करा. यातून स्वस्त आणि अपेक्षापूर्ती करणारी personal accident policy तुम्हाला घेता येईल. या प्रकारच्या पॉलिसी तुलनेने स्वस्त असल्याचेही दिसून येते.
विमा रक्कम, क्लेम सेटलमेंट प्रोसेस (Sum Assured, policy claim)
ही पॉलिसी खरेदी करताना विम्याच्या रकमेचाही विचार करणे गरजेचे आहे. विम्याची रक्कम पुरेशी असणे आवश्यक आहे. यसाठी तुमचे उत्पन्न किती आहे, याचा देखील विचार करता येईल. त्याचप्रमाणे आपल्या आरोग्यसंबंधित गरजांचा विचार देखील महत्वाचा आहे.
आपण घेऊ इच्छित असलेली पॉलिसी तपासताना क्लेम सेटलमेंट प्रोसेस बघणे देखील आवश्यक आहे. TPA म्हणजेच थर्ड पार्टी अॅडडमिनिस्ट्रेटर समाविष्ट आहे का आणि क्लेम हिस्ट्री काय आहे, हे बघणे देखील महत्वाचे आहे.
याचप्रमाणे पॉलिसीचा कालावधी आणि अटी बारकाईने तपासणे आवश्यक आहे. जर भारताबाहेर सातत्याने प्रवास करत असाल तर पॉलिसी ते कवर करते का, हे नीट समजून घेणे आवश्यक आहे. यांसारख्या सर्व बाबींचा खरेदी करत असलेल्या पॉलिसीच्या संबंधात बारकाईने तपासून बघणे आवश्यक असते.
एखादी आकस्मिक दुर्घटना एखाद्या कुटुंबाची घडी विस्कटू शकते. या धोक्यावर उपाय म्हणून personal accident policy हा पर्याय समोर येतो. ही पॉलिसी स्वस्तही मानली जाते. आपघातांच्या बाबतीत भारताचे जगामध्ये खूप वरचा क्रमांक लागतो. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या नोंदीनुसार भारतात दरवर्षी लाखोंच्या संख्येने अॅक्सिडेंट डेथ होतात. सरासरी अगदी काही मिनिटात एक मृत्यू होतो. अपघाती मृत्यू झाल्यास विमछत्राची रक्कम संबंधित व्यक्तीच्या वारसाला दिली जाते. हेल्थ इन्शुरन्समध्ये हॉस्पिटल खर्चासारख्या बाबींविषयी तरतूद असते. पण, आपघातांमध्ये व्यंगत्व, विकलांगता यामुळे कमाई करण्याची क्षमतेवर परिणाम झाल्यास काय करावे, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यावर personal accident policy हा एक प्रभावी पर्याय ठरतो. यामुळे ही पॉलिसी घेताना तपशील तपासणे आवश्यक ठरते.