Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Health Insurance: आरोग्य विम्याचा प्रिमियम तुमच्या शहरावरही अवलंबून असतो; झोन बेस्ड हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय?

Zone Based Health Insurance

आरोग्य विमा खरेदी करताना वय, आरोग्याची स्थिती आणि कव्हर अमाउंट यावरुनच फक्त प्रिमियम ठरतो, असे तुम्हाला वाटत असेल तर हे पूर्णत: बरोबर नाही. यामध्ये आणखी एक घटक आहे, ज्यावरुन तुम्हाला किती प्रिमियम भरावा लागेल हे ठरते. तसेच यामुळे तुमचा क्लेम रद्दही होऊ शकतो. त्यामुळे झोन बेस्ड इन्शुरन्स काय आहे, हे जाणून घ्या.

Zone Based Health Insurance: आरोग्य विमा खरेदी करताना वय, आरोग्याची स्थिती आणि कव्हर अमाउंट यावरुनच फक्त प्रिमियम ठरतो, असे तुम्हाला वाटत असेल तर हे बरोबर नाही. यामध्ये आणखी एक घटक आहे, ज्यावरुन तुम्हाला किती प्रिमियम भरावा लागेल हे ठरते. विमा कंपन्यांकडून तुम्ही कोठे राहता, म्हणजेच शहरात की ग्रामीण भागात यावरुन प्रिमियम आकारला आहे. देशातील शहरांची झोननुसार विभागणी केलेली आहे. त्यानुसार तुम्हाला विमा काढताना खर्च येतो. ते कसे पाहूया.

देशातील मेट्रो शहरे झोन 1 मध्ये येतात. तर टियर 1 शहरांची गणना झोन-2 मध्ये होते. या दोन्ही झोनमध्ये ज्यांची गणना होत नाही, त्यांना झोन 3 समजले जाते. सहाजिकच मेट्रो शहरांमधील कॉस्ट ऑफ लिव्हिंग जास्त असते. त्यामुळे रुग्णालयातील ट्रिटमेंटही महाग असेल. या कारणाने कंपन्यांकडून प्रिमियम आकारला जातो.

मेट्रो शहरांसाठी सर्वाधिक प्रिमियम (High premium for metro cites)

जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर तुम्हाला जास्त प्रिमियम (Zone Based Health Insurance premium) भरावा लागेल. कारण मुंबई झोन 1 मध्ये येते. उदाहरणार्थ, तुमचे वय 30 वर्ष असेल तर 10 लाख रुपयांच्या कव्हरसाठी तुम्हाला मुंबईत 15 हजार रुपये प्रिमियम भरावा लागेल. मात्र, जर तुम्ही नाशिक सारख्या शहरात राहत असाल तर तेथे तुम्हाला सुमारे 12 हजार प्रिमियम भरावा लागेल. 10 ते 20% प्रिमियमच्या रकमेत फरक पडू शकतो.

टीप - झोनमध्ये निवडक शहरांची नावे दिली आहेत. यादीमध्ये बदल होऊ शकतो, विमा घेण्यापूर्वी सखोल माहिती घ्या. 

झोन बदलल्यास क्लेम मिळेल का? (Will claim get passed if zone changed) 

तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल आणि चांगल्या आरोग्य सुविधांसाठी पुण्यासारख्या शहरी भागात येत असाल तर तुम्हाला प्रिमियम जास्त भरावा लागेल. हे सुद्धा आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ. जर तुम्ही सातारा जिल्ह्यातील एखाद्या खेडेगावात राहत असाल आणि तेथेच तुम्ही आरोग्य विमा काढला असेल तर तुमची पॉलिसी झोन 3 मध्ये असेल. मात्र, जर तुम्हाला रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आणि चांगल्या आरोग्य सेवांसाठी तुम्ही पुण्यातील रुग्णालयात अॅडमिट झालात तर विमा कंपनी तुम्हाला को-पेमेंट क्लॉज लावू शकते. म्हणजेच रुग्णालयाच्या एकूण बिलापैकी काही टक्के रक्कम तुम्हाला भरावी लागू शकते.

तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात (Health Insurance zone) जात असाल तर आरोग्य विमा काढताना कंपनीला याची माहिती द्या. तसेच झोन नुसार को-पेमेंटचे काय नियम आहेत याची सविस्तर माहिती घ्या त्यानंतर पॉलिसी घ्या. अन्यथा ऐनवेळी तुम्हाला खिशातून पैसे भरायची वेळ येईल. काही विमा कंपन्या झोनचा विचार न करता पॉलिसी देतात. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातून मेट्रो शहरात जरी उपचारासाठी गेलात तरी को-पेमेंट क्लॉज लागू होणार नाही. अशी विमा पॉलिसी तुमच्या फायद्याची ठरू शकते.