Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Wedding Insurance: लग्नाचा इन्शुरन्स म्हणजे काय? त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?

Wedding Insurance

Wedding Insurance India: लग्न समारंभाच्या मंगलप्रसंगी अशा गोष्टी झाल्या तर लग्नाचा इन्शुरन्स यासाठी उपयुक्त ठरू शकतो. लग्नाचा विमा म्हणजे अचानक उद्भवलेल्या संकटावर नुकसान भरून काढणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.

डिसेंबर महिना सुरु झाला की लगीनघाई सुरु होते. लग्न असेल तर खरेदीचा विषय मुख्य मानला जातो. प्रत्येक विधीनुसार सामग्री, कपडे, लग्नपत्रिका, मंडप, जेवण अशा एक न अनेक गोष्टींची यादी तयार होत असते.  सर्व वस्तूंचा बजेट ठरवून त्यानुसार खरेदी केली जाते. लग्नविधी सुरु होण्यापासून ते पूर्ण होईपर्यंत प्रत्येक गोष्ट सुरळीत व्हावी, या दृष्टीने कुटुंबाचे प्रयत्न सुरु असतात. अशावेळी, अचानक एखादी अडचण येऊन लग्न रद्द झाले तर? किंवा अज्ञात व्यक्तीकडून लग्नात चोरी झाली तर? एखाद्या कारणामुळे आग किंवा भूकंप यासारखी नैसर्गिक आपत्ती ओढवली तर? जर या घटना घडल्या तर लग्नासाठी केलेल्या खर्चाचे काय? झालेली नुकसान भरपाई कोण करून देणार? (Is Wedding Insurance Necessary) या प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात घेणार आहोत.

लग्न समारंभाच्या मंगलप्रसंगी अशा गोष्टी झाल्या तर लग्नाचा विमा यासाठी उपयुक्त ठरू शकतो. लग्नाचा इन्शुरन्स (Wedding Insurance) म्हणजे अचानक उद्भवलेल्या संकटावर नुकसान भरून काढणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.  लॉकडाऊनच्या काळात झालेल्या लग्नानंतर भारतात (Wedding Insurance India) या संकल्पनेची मागणी वाढली आहे. ICICI Lombard General Insurance, Future General आणि HDFC ERGO या नामांकित कंपन्यांमार्फत लग्नाचा विमा दिला जातो.

लग्नाच्या विम्यात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? What does wedding insurance cover?

  1. घटनास्थळी भूकंप, आग किंवा संबंधित धोके 
  2. कार्यक्रमाच्या ठिकाणी घरफोडी आणि चोरी 
  3. काही कारणामुळे लग्न रद्द झाल्यास
  4. लग्नाच्या तारखेत बदल झाल्यास
  5. मालमत्तेचे भौतिक नुकसान झाल्यास
  6. कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व
  7. कायमचे अंशत: अपंगत्व
  8. अपघाती मृत्यू

लग्नाच्या विम्यात कोणत्या गोष्टींचा खर्च कव्हर केला जाईल? What will be covered in wedding insurance?

  • लग्न पत्रिकांची छपाई
  • केटरर्सला केलेला खर्च 
  • मंडप आणि सजावट 
  • हॉटेल बुकिंग खर्च 
  • बस-कार बुकिंगचा खर्च 
  • लग्न स्थळाला दिलेली आगाऊ रक्कम 


लग्नाच्या विम्यात कोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही? What is not covered in wedding insurance?

  1. लग्नाच्या दिवशी कोणताही संप किंवा बंद असेल
  2. दहशतवादी हल्ला झाला असेल
  3. वधू किंवा वराचे अपहरण झाले असेल
  4. ट्रेन किंवा फ्लाइट चुकली असेल
  5. वाहनाची किंवा वाहतूक सेवेत बिघाड असेल

वर नमूद केलेल्या कारणांमुळे जर लग्न रद्द झाले तर इन्शुरन्स कंपनी नुकसान भरपाई देत नाही. पण इन्शुरन्स कंपन्यांकडून मान्य करण्यात आलेल्या नियमानुसार, अचानक आलेल्या अडचणींवर नुकसान भरपाई मिळावी यासाठी लग्नाचा इन्शुरन्स असणे आवश्यक आहे.