असे म्हटले जाते की, कमी जोखीम आणि कमी नफा म्हणजे "व्यापार", जास्त जोखीम आणि जास्त नफा म्हणजे "जुगार / सट्टा" (gambling). पण कमी जोखीम आणि जास्त नफा म्हणजे "संधी" (chance). ULIP (युलिप) अर्थात “युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन” ही एक अशीच संधी असते. एकाच वेळी "लाईफ कव्हर" सोबतच "कॅल्क्युलेटेड रिस्क" घेऊन कॅपिटल मार्केटमध्ये केलेली आर्थिक गुंतवणूक आणि कर-बचत (अर्थात टॅक्स बेनिफिट्स) या उद्दिष्टांचा त्रिवेणी संगम.
Table of contents [Show]
इन्शुरन्स आणि गुंतवणूक यांचे मिश्रण
ULIP हे “विमा + गुंतवणूक” (Insurance + Investment) यांचे मिश्रण आहे. आपण जो प्रिमिअम दर-महिना किंवा दरवर्षी भरत असतो, त्या गुंतवलेल्या पैशाचा एक छोटासा भाग आपले लाईफ-कव्हर म्हणून काम करतो. आणि बाकीचा फंड मार्केट मध्ये गुंतवले जातात. अर्थातच ULIP मध्ये, केलेली गुंतवणूक ही भांडवली बाजाराशी (कॅपिटल मार्केट) संबंधित असल्याने जोखीम अर्थात Risk हा घटक अनिवार्य असतो. तेव्हा आपली जोखीम घेणायची क्षमता आणि आवश्यकता यांचा सखोल विचार करून मगच ULIP मध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलेला चांगला.
कव्हरसह स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीचा पर्याय
भारतामध्ये ULIP प्लॅन्सची सर्वप्रथम 1971 साली “मार्केट-इन्स्ट्रुमेंट” म्हणून ओळख करून देण्यात आली. सन 2010 पासून ULIP फंडाचे नियमन आणि व्यवस्थापन IRDAI (ईरडा) म्हणजे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे करण्यात येऊ लागले. तत्पूर्वी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या पॉलिसीधारकांना एकतर स्वत: स्टॉक खरेदी करावे लागत असत किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी लागत असे. ULIP प्लॅन सुरू केल्यामुळे, आपण एकाच वेळीच स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीचा option तर ट्राय करू शकतोच आणि सोबत लाईफ इन्शुरन्सचे फायदे देखील उपभोगू शकतो.
वैविध्यपूर्ण प्रीमियम पेमेंट मोड
युलिपचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला मिळणारी "वैविध्यपूर्ण प्रीमियम पेमेंट मोड". ज्या गुंतवणूकदाराकडे चांगला फंड आहे, तो पॉलिसी-टर्मच्या सुरुवातीलाच संपूर्ण प्रीमियम रक्कम एकरकमी म्हणून भरु शकतो. अथवा त्याला जसे शक्य होईल, तसे वार्षिक (annual), अर्धवार्षिक (semi-annual) किंवा अगदी मासिक (monthly) प्रीमियम पेमेंट करू शकतो. ULIP प्लॅन्स एकतर आपल्याला मार्केट लिंक्ड रिटर्न्स मिळवण्याची संधी देतात. कारण आपण भरलेल्या प्रीमियमचा एक भाग मार्केट लिंक्ड फंड्समध्ये म्हणजे डेब्ट-मार्केट, इक्विटी-मार्केटसह अनेक मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये वेगवेगळ्या प्रमाणात गुंतवला जातो. साहजिकच मार्केट-उलाढालींमधून परतावा (रिटर्न्स) अधिक मिळण्याची शक्यता पण निर्माण होते.
कर सवलत
आपल्या गरजा, आवश्यकता आधीच स्थिर नसतात. त्या नेहमी कालानुरूप बदलत असतात. मग अशा वेळी स्थिर परतावा देणाऱ्या प्लॅन्सपेक्षा आपल्या इन्व्हेस्टमेंट फंडमध्ये देखील लवचिक परतावा (flexible returns) देणारे ULIP प्लॅन्स केव्हाही जास्त काल-सुसंगत वाटतात. याशिवाय उच्च परतावा मिळविण्यासोबतच इन्शुरन्स-कव्हर देखील प्राप्त होत असतेच. ULIP प्लॅन्समध्ये गुंतवणूक केल्याने बचत आणि गुंतवणुकीची नियमित सवय लावण्यास मदत होते, जी दीर्घकालीन संपत्ती (long term corpus) निर्माण होतो, तो वेगळा! याव्यतिरिक्त केलेल्या गुंतवणुकीवर इन्कम टॅक्स अॅक्ट, 1961 च्या कलम 80C अंतर्गत टॅक्स वजावट (deduction) म्हणून आपण क्लेम करू शकतो.
ULIP प्लॅन्समध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ कोणती? खरे तर, गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही वेळ ही चांगलीच असते. तरी देखील सांगायचे झाले तर, "early bird catches the worm" या न्यायाने "जितक्या लवकर आपण कॉर्पस क्रिएट करायला सुरुवात करू, तितके अधिक फायदेशीर असू शकेल. कारण आपले पैसे वाढवण्यासाठी आपल्याकडे वेळ देखील पर्याप्त असेल. आपले वय, जोखीम घेण्याची क्षमता (Risk Appetite) आणि आपल्याला आवश्यक असलेला फंड, डोळ्यांसमोर ठेवून आपण तसे "इन्व्हेस्टमेंट फंडस" निवडू शकतो.