आजार होणाऱ्या अनिश्चित खर्चांसारखा आहे तो कधी येईल सांगता येत नाही. त्यामुळे त्यासाठी आधीच तयारीत राहणे कधीही चांगलेच ठरते. यासाठी बाजारात हेल्थ इन्शुरन्स उपलब्ध आहेत. जे तुम्हाला आजारात उपयोगी पडतात. पण, त्यातही इन्शुरन्स एजंट हेल्थ इन्शुरन्सच्या नावाखाली मेडिक्लेम विकतात. त्यामुळे नंतर लोकांचा गोंधळ होतो. कारण, लोक या दोघांनाही एकच समजण्याची चूक करतात. त्यामुळे समोर त्यांना खिशातून पैसे टाकावे लागतात. यासाठीच या दोन्हीविषयी माहिती असणे गरजेचे आहे.
हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय?
आधी सांगितल्याप्रमाणे या टर्म गोंधळात टाकतात. कारण, सामान्यांना याविषयी काही माहिती नसते. पण, जेव्हा आपण हेल्थ इन्शुरन्स म्हणतो, तेव्हा यात मेडिकल आणि सर्जिकल या दोन्हींना कव्हर केले जाते. त्याचबरोबर याद्वारे कॅशलेस उपचाराची देखील सुविधा असते. यामध्ये पाॅलिसीधारकाला हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्याआधीपासूनचा खर्च आणि त्यानंतरचे सर्व खर्च यामध्ये कव्हर केले जातात. विशेष म्हणजे, तुमच्याजवळ हेल्थ इन्शुरन्स असल्यास यात सर्व आजार कव्हर केले जातात. जसे की, कॅन्सर, ह्रदयरोग, किडनीचे आजार यासारख्या अनेक आजारावर या पाॅलिसीद्वारे तुम्हाला कव्हर मिळतो. त्यामुळे आजाराचे निदान झाल्यास तुम्हाला एक ठोक रक्कम दिली जाते. त्यासाठी तुम्हाला बिल जमा करायची गरज पडत नाही.
मेडिक्लेम म्हणजे काय?
या टर्म सामान्यांना गोंधळात टाकतात, त्यामुळे एजंट त्याचा फायदा घेतात. त्यांना पुरेशी माहिती न देता इन्शुरन्स विकून मोकळे होतात. त्यामुळे आधी मेडिक्लेम विषयी जाणून घेऊया. मेडिक्लेम एका प्रकारचा इन्शुरन्स प्लॅन असतो, ज्यामुळे पाॅलिसीधारकाला हेल्थ इमरर्जन्सी वेळी आर्थिक मदत होते. पण, यात ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हाॅस्पिटल आणि ठरलेल्या आजारांवर उपचार केले जातात. तसेच यात दोन पद्धतीने मेडिकल खर्च देण्यात येतो, पहिला कॅशलेस तर दुसरा रिम्बर्समेंट. तुमच्याकडे कॅशलेस सुविधा असल्यास तुम्हाला पैसे देण्याची गरज पडत नाही. तुमच्याकडे ही सुविधा नसल्यास तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. जे तुम्हाला नंतर सर्व बिल जमा केल्यावर, जेवढी तुमची मर्यादा आहे तेवढे परत मिळतील. हेल्थ इन्शुरन्सपेक्षा मेडिक्लेमची रक्कम कमी असते.
दोघातील फरक
- मेडिक्लेममध्ये फक्त हाॅस्पिटलच्या खर्चाचा समावेश असते, मात्र, हेल्थ इन्शुरन्समध्ये इतर खर्च ही कव्हर केले जातात.
- मेडिक्लेममध्ये अॅड-ऑन कव्हर नाही मिळत,तेच हेल्थ इंन्शुरन्समध्ये क्रिटिकल इलनेस आणि अजूनही इतर अॅड-ऑन कव्हर मिळतात.
- मेडिक्लेममध्ये एका मर्यादेपर्यंत आजार कव्हर केले जातात, त्याची मर्यादा पाच लाखांपेक्षा अधिक नसते. तेच हेल्श इन्शुरन्सचा कव्हर तुमच्या प्रीमियमनुसार ठरतो आणि तो कोटींपर्यंत जाऊ शकतो.
- कव्हरेजची मर्यादा कमी असल्याने मेडिक्लेम स्वस्त असतो. तर हेल्थ इन्शुरन्ससाठी जास्त प्रीमियम भरावा लागतो. त्यामुळे ते जास्त महाग असतात.
- मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्ससाठी तुम्हाला करात सवलत मिळते, त्यामुळे तुमचा फायदा होऊ शकतो.
- या दोन्ही पैकी एक निवडायचा असल्यास, तुमचे वय, तुमच्यावर किती जण अवलंबून आहेत. तसेच प्रीमियम किती आहे. याचा विचार करून तुम्ही खरेदी करू शकता.
- विशेष म्हणजे दोन्ही जेव्हा मेडिकल इमरर्जन्सीची गरज असते तेव्हा उपयोगी येतात.