आपल्या सर्व अत्यावश्यक गरजा या पैशांमुळे पूर्ण होत असतात. या पैशांना बांधून ठेवणाऱ्या आर्थिक संस्थांचा यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे. पैशांचा फक्त व्यक्तींवरच नाही तर व्यवसाय आणि सरकारवरही परिणाम होत असतो. सध्या आपल्याकडे बॅंक आणि नॉन-बॅंकिंग वित्तीय कंपन्या हा प्रचलित असलेल्या आर्थिक संस्था आहेत. ज्या लोकांची आर्थिक गरज पूर्ण करत आहेत. पण बॅंक आणि नॉन-बॅंकिंग कंपन्या या एकमेकांपेक्षा कशा वेगळ्या किंवा समान आहेत. हे आपण जाणून घेणार आहोत.
बॅंक आणि नॉन-बॅंकिंग फायनान्शिअल कंपनी (NBFC) या दोन युनिक आर्थिक संस्था आहेत. त्यांची कामाची पद्धत, व्यावसायिक मॉडेल आणि त्यांना घालून दिलेले नियम यामध्ये खूप वेगळेपण आहे. बॅंक ही सरकारची अधिकृत आर्थिक संस्था मानली जाते. तर नॉन-बॅंकिंग वित्तीय संस्था ही एक प्रकारची फायनान्शिअल कंपनी आहे; तिच्या कामाचे स्वरूप बॅंकेप्रमाणेच चालते. पण तिला बॅंकेचा दर्जा न देता ती कामे करण्याची परवानगी दिली गेली आहे.
बॅंकांमध्ये पैशांची बचत केली जाते आणि गरज पडल्यास बॅंकेकडून कर्जही घेता येते. तर नॉन-बॅंकिंग कंपन्या या लहान-मोठ्या उद्योगांना आणि वैयक्तिक व्यावसायिकांना कर्ज देतात. तसेच क्रेडिटची सुविधा सुद्धा देतात.
बँक म्हणजे काय? What is Bank?
बँक ही एक अधिकृत आणि परवानाधारक वित्तीय संस्था (Financial Institute) आहे. बॅंकेमध्ये आपण पैसे ठेवू शकतो, काढू शकतो. तसेच गरज पडल्यास बॅंकेकडून कर्ज ही घेता येते. याशिवाय बँका लॉकर्स, चलन विनिमय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देतात. भारतातील सर्व बॅंका रिझर्व्ह बँकेकडून (RBI) नियंत्रित केल्या जातात. आरबीआय ही बॅंकिंग क्षेत्रातील भारताची केंद्रीय आणि नियामक संस्था आहे.
नॉन-बॅंकिंग वित्तीय कंपनी म्हणजे काय? What is NBFC?
NBFC याचा फुलफॉर्म नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (Non-Banking Financial Company-NBFC) असा आहे. या कंपन्यांना बॅंकिंगचा परवाना नसतानाही त्या लोकांना आर्थिक सेवा देऊ शकतात. या कंपन्या रिझर्व्ह बँकेद्वारे (RBI) नियंत्रित असतात. तसेच अशा कंपनीसाठी 1956 च्या कंपनी कायदा अंतर्गत RBI मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.
आपल्या समाजातील वेगवेगळ्या घटकातील लोकांना आर्थिक मदत लागत असते. ही मदत बॅंका आणि नॉन-बॅंकिंग कंपन्या आपापल्या पद्धतीने करत असतात. बॅंक आणि नॉन-बॅंकिंग कंपन्यांमध्ये काही प्रमाणात फरक आहे. तर काही प्रमाणात साम्य देखील आहे. तर या दोन संस्थांमध्ये काय साम्य आणि फरक आहे हे आपण समजून घेऊ.