• 31 Mar, 2023 08:51

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Quiet Quitting : क्वाईट क्विटिंग म्‍हणजे काय? कसे झाले 3.3 कोटीचे नुकसान?

Quiet Quitting

Image Source : www.blog.hubspot.com

न्यूयॉर्क स्थित एक लॉ फर्म नेपोली श्कोल्निकने त्यांची माजी कर्मचारी हीदर पाल्मोर हिच्याविरोधात ‘क्वाईट क्विटिंग’ चा आरोप करत कमीतकमी $ 400,000 (₹ 3.3 कोटी) साठी खटला दाखल केला आहे. या प्रकरणामुळे आता ‘क्वाईट क्विटिंग’ म्हणजे काय? कर्मचारी त्याचा वापर का करतात? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

न्यूयॉर्क स्थित एक लॉ फर्म नेपोली श्कोल्निकने त्यांची माजी कर्मचारी हीदर पाल्मोर हिच्याविरोधात ‘क्वाईट क्विटिंग’ चा आरोप करत कमीतकमी $ 400,000 (₹ 3.3 कोटी) साठी खटला दाखल केला आहे. हीदर पाल्मोरने नेपोलीसाठी काम करत असताना गुप्तपणे तिच्या स्वत: च्या लॉ फर्मची जाहिरात करण्यासाठी रिमोट वर्किंगचा फायदा घेतल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे आता ‘क्वाईट क्विटिंग’ म्हणजे काय? कर्मचारी त्याचा वापर का करतात? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

क्वाईट क्विटिंग म्हणजे काय?

क्वाईट क्विटिंग (Quite Quitting) म्हणजे राजीनामा दिल्याप्रमाणे नोकरी सोडणे नाही. सोप्या शब्दात हा ट्रेंड म्हणजे पगार मिळेल तेवढे काम करणे. यामध्ये नोकरीवर घेताना ज्या पदावर घेण्यात आले आहे त्या पदासाठी आखून देण्यात आलेल्या कामाव्यतिरिक्त इतर कोणतंही काम न करणं. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी न स्विकारणं, जास्तीचं काम न करणं आदिंचा समावेश आहे. थोडक्यात निर्धारित तासांइतकेच काम करणे ही या ट्रेंडची वैशिष्ट्ये आहेत.

क्वाईट क्विटिंगचा उद्देश काय आहे?

कंपन्यांची खराब कार्यसंस्कृती, वाढत्या महागाईनुसार कमी पगार, ठरलेल्या तासांपेक्षा जास्त काम यामुळे कर्मचारी हळूहळू नैराश्याला बळी पडत आहेत. कर्मचारी बर्नआउटला बळी पडत आहेत. या संस्कृतीच्या निषेधार्थ, क्वाईट क्विटिंगचा ट्रेंड उदयास आला आहे.

क्वाईट क्विटिंगचा ट्रेंड का सुरु झाला?

गेल्या काही वर्षात अमेरिका, चीन, ब्रिटन, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांसारखे देश या ट्रेंडने प्रभावित झाले आहेत आणि या ट्रेंडचा भारतावरही परिणाम झाला आहे. भारतासह अनेक देशांमध्ये लोकांना कामाचा जास्त ताण घ्यायचा नाही, तरुणांना वर्क-लाइफ बॅलन्स हवा आहे, त्यांना कामासोबतच त्यांचे आयुष्य आनंददायी हवे आहे, जगभरातील तरुणांचा असा विश्वास आहे की वर्क-लाइफ बॅलन्समुळे त्यांना खूप मदत झाली आहे. त्या लोकांना स्वतःला कामाच्या ताणतणावात थकवा जाणवत नाही. कामाच्या ओझ्यामुळे हा (Quite Quitting) ट्रेंड सुरू झाला आहे.

News Source : What is quiet quitting and why is it happening | World Economic Forum (weforum.org) 

विश्लेषण: राजीनामा की नाराजीनामा? कमी काम करणं हे कर्मचारी आणि कंपनीच्याही भल्याचं, कसं ते समजून घ्या (msn.com)