Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Product Warranty Insurance: प्रॉडक्ट वॉरंटी इन्शुरन्स म्हणजे काय ?

What Is Product Warranty Insurance

आता काही वेळा वस्तूची उत्पादक कंपनी तिच्या उत्पादनाची अधिकाधिक विक्री व्हावी तसेच तिचे प्रतिमा-संवर्धन व्हावे, या उद्देशाने ठराविक लहान कालावधीसाठीच्या वॉरंटीऐवजी अतिरिक्त कालावधीकरिता आपल्या उत्पादित वस्तूची दुरुस्ती, मेंटेनन्स किंवा प्रसंगी वस्तू बदलून देण्यासंबंधी वॉरंटी देत असते. वॉरंटी तर समजल पण आता प्रॉडक्ट वॉरंटी इन्शुरन्स म्हणजे काय ते जाणून घेऊया.

तिसऱ्या औद्योगिक क्रातीनंतरच्या प्रचंड स्पर्धात्मक आणि ग्राहककेंद्रित (customer-centric) झालेल्या बाजार-जगात प्रत्येक व्यक्ती ही  एकाच वेळी ग्राहक (customer) आणि उत्पादन  (product) झाली आहे. ग्राहक जेव्हा विक्रेत्याकडून वस्तू विकत घेतो, तेव्हा तो त्याच्यासोबत त्या वस्तूबाबत एक वचन, विश्वास विकत घेत असतो, आणि त्या वस्तूचे उत्पादन करणारा उत्पादक (manufacturer) हा जेव्हा ग्राहकाला लिखित स्वरूपात त्या वस्तूच्या दर्जाची आणि क्षमतेची (quality and capacity) खात्री देत असतो, तेव्हा त्या दिल्या जात असलेल्या हमीला “वॉरंटी” म्हणतात. (what is warranty

उदाहरणार्थ 
आपण दुकानदाराकडून एखादा मोबाइल खरेदी करतो, तेव्हा त्या मोबाईलला तीन महिने, सहा महिने किंवा एका वर्षाची वॉरंटी मिळते. म्हणजे त्या निर्धारित केलेल्या गेलेल्या कालावधीमध्ये त्या मोबाईलला काहीही झाले  तरी त्याला दुरुस्त करण्याची किंवा तो बदलून देण्याची म्हणजेच मोबाईलची दुरुस्ती किंवा त्याच्या मेंटेनन्सची जबाबदारी त्या मोबाईलची निर्मिती करणारी कंपनी घेत असते.

प्रॉडक्ट वॉरंटी इन्शुरन्स म्हणजे काय ? What is Product Warranty Insurance?

आता काही वेळा वस्तूची उत्पादक कंपनी तिच्या उत्पादनाची (product) अधिकाधिक विक्री व्हावी तसेच तिचे प्रतिमा-संवर्धन (अर्थात image-building) व्हावे, या उद्देशाने ठराविक लहान कालावधीसाठीच्या वॉरंटीऐवजी वाढीव / अतिरिक्त कालावधीकरिता आपल्या उत्पादित वस्तूची दुरुस्ती, मेंटेनन्स किंवा प्रसंगी वस्तू बदलून देण्यासंबंधी (replacement) वॉरंटी देत असते. मग अशा वेळी वॉरंटीचा कालावधी वाढवल्याने उत्पादक कंपनीवर (manufacturer) पडू शकणाऱ्या अतिरिक्त आर्थिक भाराची जोखीम (म्हणजे risk) ती कंपनी इन्शुरन्स कंपनीकडे ट्रान्सफर करते. अशा प्रकारच्या इन्शुरन्सला “product warranty insurance” अर्थात उत्पादन हमी विमा म्हणतात.

कोणकोणत्या वस्तूवर मिळतो इन्शुरन्सचा लाभ?

कम्प्युटर्स, मोबाईल तंत्रज्ञान (फोन, टॅबलेट्स इत्यादी), ऑटोमोबाईल उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, दागिने, घड्याळे, संगीतासंबंधीची वाद्ये-उपकरणे, LED लाईट्स, इतकेच नव्हे तर बोटी, GPS, सॅटलाईट्स सारखी सागरी उत्पादने यांसारख्या अतिशय नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार होणाऱ्या उत्पादनांसंबंधीच्या कंपनीज, त्या वस्तूंचे विक्रेते या प्रॉडक्ट वॉरंटी इन्शुरन्सचा लाभ घेतात. यामुळे उत्पादक कंपनीला आपली वॉरंटी-काळातील खर्चाची जोखीम इन्शुरन्स कंपनीकडे ट्रान्सफर केल्याने तिच्या उत्पादनाच्या नवनवीन डिसाईन्स आणि फिचर्सच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करता येणे शक्य होते.

किती वर्षासाठी इन्शुरन्स कव्हर घेऊ शकतात?(Terms and conditions for purchase order) 

प्रॉडक्ट वॉरंटी इन्शुरन्सच्या अंतर्गत उत्पादक कंपनीज्  तसेच उत्पादन विक्रेते उत्पादनाच्या वेगवेगळ्या भागांकरिता अगदी महिन्यापासून ते अगदी १० वर्षांपर्यंतचे इन्शुरन्स कव्हर घेऊ शकतात. कम्पनीला देखील यामुळे तिच्या उत्पादनाच्या निर्मिती आणि प्रदर्शन (manufacturing & performance) यांचे पुनरिक्षण (review) करता येते आणि आवश्यक भासल्यास सुधारणा करून आणणे शक्य होत असते.  कंपनीला तिच्या ग्राहकांना अगदी १० वर्षे इतक्या दीर्घ कालावधीकरिता देखील उत्पादनाच्या दर्जा आणि क्षमतेची वॉरंटी देता येणे शक्य होते. वॉरंटी-कालावधी संदर्भात अधिकाधिक स्पर्धात्मक सेवा प्रदान करून कंपनींना त्यांचा नफा वाढवण्यास मदत होते, तर ग्राहकाला तो वापरत असलेल्या वस्तूच्या निश्चिन्त वापराबाबत अधिक  शाश्वती आणि दीर्घकालावधीकरिता समाधान मिळत असते.