Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pre-approved Loan: प्री-अप्रूव्ह लोन म्हणजे काय? लोन ऑफर स्वीकारताना काय काळजी घ्यावी?

Loan

Image Source : www.vistaresidences.com

प्री अप्रूव्ह्ड लोन हे इतर सर्वसामान्य कर्जाप्रमाणेच असते. मात्र, हे कर्ज घेण्यासाठी तुम्ही वित्तसंस्थेकडे जात नाहीत. तर वित्तसंस्था तुमच्यापर्यंत कर्जाची ऑफर घेऊन येते. प्री अप्रूव्ह्ड म्हणजेच बँक तुम्हाला कर्ज देण्यास तयार असते. मात्र, कोणालाही प्री अप्रूव्ह्ड लोन ऑफर मिळत नाही.

Pre-approved Loan: प्री अप्रूव्ह्ड लोन हे इतर सर्वसामान्य कर्जाप्रमाणेच असते. मात्र, हे कर्ज घेण्यासाठी तुम्ही वित्तसंस्थेकडे जात नाहीत. तर वित्तसंस्था तुमच्यापर्यंत कर्जाची ऑफर घेऊन येते. प्री अप्रूव्ह्ड म्हणजेच बँक तुम्हाला कर्ज देण्यास तयार असते. मात्र, कोणालाही प्री अप्रूव्ह्ड लोन ऑफर मिळत नाही. ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर आणि आधीचे व्यवहार चोख असतात त्यांनाच अशी ऑफर मिळू शकते.

बँका आणि इतरही वित्तसंस्था ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा ऑफर्स पाठवत असतात. (What is pre approved loan) अशा ऑफर्सद्वारे इतर लोनपेक्षा व्याजाचा दर कमी असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मासिक हफ्ताही (EMI) कमी पडेल. पर्सनल, होम, कार, ट्रॅव्हल किंवा इतर लोन प्री अप्रूव्ह्ड असू शकते. ज्या ग्राहकांनी आधीच बँकेकडून कर्ज घेतले आहे आणि वेळेत कर्जफेड केली आहे. अशा ग्राहकांनाही ऑफर्स येतात. 

प्री अप्रूव्ह्ड लोन ऑफर का घ्यावी? 

वर म्हटल्याप्रमाणे प्री अप्रूव्ह्ड लोनसाठीचा व्याजदर इतर कर्जांच्या तुलनेत थोडा कमी असू शकतो. प्री अप्रूव्ह्ड लोन कमीत कमी वेळात ग्राहकाला मिळू शकते. कारण, बँकेने तुमची क्रेडिट हिस्ट्री आधीच तपासलेली असते. कर्जासाठी अप्लाय केल्यानंतर तत्काळ तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. कागदपत्रांची पडताळणी फक्त बँकेकडून केली जाईल. तसेच प्री अप्रूव्ह्ड लोन घेताना कर्जाचा कालावधी तुम्ही तुमच्या सोईनुसारही घेऊ शकता.   

प्री अप्रूव्ह्ड लोन ऑफर स्वीकारताना काय काळजी घ्यावी? 

बँक किंवा वित्तसंस्था कर्ज देण्यास स्वत: हून तयार असते तेव्हा लगेच कर्ज घेणे टाळावे. तुम्हाला गरज असेल तरच कर्ज घ्या. कारण, हे कर्ज व्याजासहित तुम्हाला फेडावे लागेल. बरेच जण, प्री अप्रूव्ह कर्ज मिळत असेल तर पुढचा विचार न करता कोणत्याही बाबीसाठी कर्ज घेतात. त्यापेक्षा तुम्ही अत्यंत निकड असेल अशाच परिस्थितीत प्री अप्रूव्ह्ड लोन घ्या. 

ऑफर बारकाईने तपासा

प्री अप्रूव्ह्ड लोनचा व्याजदर थोडा कमी असेल तर बेफिकीर राहू नका. कारण, बँक इतर शुल्क जास्त घेऊ शकते. त्यामुळे एकाचवेळी अनेक बँकांच्या ऑफर्स असतील तर त्याही पाहा. त्यामुळे नियम अटींसोबत कर्ज आधीच बंद करण्याचे शुल्क (फोरक्लोजर चार्ज), दंड, हफ्ता थकल्यानंतरचे शुल्क किती याची संपूर्ण माहिती घ्या. 

लोन ऑफरचा फायदा घेण्यासाठी कागदपत्रे

मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट
मागील तीन महिन्यांची सॅलरी स्लीप
पॅन कार्ड
रहिवासी पुरावा (आधार, पासपोर्ट, रेशनकार्ड)