Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय?

ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय?

Image Source : www.dollarsandsense.sg

जर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमधील स्टॉक्स, म्युच्युअल फंड किंवा बाँड्सच्या पलीकडे जाऊन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ऑप्शन ट्रेडिंग (Option Trading) हा पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो.

शेअर बाजारातील ऑप्शन ट्रेडिंगबद्दल बोलताना, आपल्याकडे  शेअर बाजारात व्यापार करण्यासाठी फक्त दोन पर्याय असतात. एक खरेदी (buyer) आणि दुसरा विक्री  (Seller) याशिवाय ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तिसरा पर्याय नाही. गुंतवणूकदाराला खरेदी आणि विक्री अशा दोन्ही पर्यायांमध्ये गुंतवणूक करता येते. पण बरेच गुंतवणूकदार यापैकी एकच पर्याय निवडून त्यावर अधिक निर्णय क्षमतेने ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करत असतात. ऑप्शन खरेदी करणाऱ्या ट्रेडर्सना Option Buyers तर ऑप्शन विक्री करणाऱ्या ट्रेडर्सना Option Seller किंवा Option Writer म्हणतात.

एखादी मोटार उत्पादन करणारी कंपनी येत्या काही दिवसात नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. त्यामुळे त्याच्या शेअरची किंमत 500 ते 600 रुपयांपर्यंत वाढू शकते. अशावेळी त्या मोटार कंपनीचे प्रत्यक्ष शेअर्स खरेदी न करता त्याच्या प्रिमियमचे ऑप्शन्स विकत घेतले. तर ते कमी किमतीत मिळतात. त्याऐवजी शेअर्स विकत घेण्यासाठी अधिकचे भांडवल लागते व त्यात पैसे गुंतून राहतात. अशावेळी ऑप्शन ट्रेडिंगद्वारे गुंतवणूकदाराला कंपनीच्या प्रिमिअमचे ऑप्शन खरेदी किंवा विक्री करण्याचा पर्याय असतो. हे पर्यात जोखमीचे किंवा चांगला परतावा देणारे असे दोन्ही प्रकारचे असू शकतात. यात गुंतवणूकदाराचा शेअर बाजारातील अभ्यास, मेहनत आणि झटपट निर्णय घेण्याची क्षमता या खूप महत्त्वाच्या असतात.

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, जेव्हा शेअरची किंमत वाढत असते तेव्हा तुम्ही तो विकत घेऊन अधिकच्या किमतीला विकू शकता. तसेच जेव्हा शेअरची किंमत घसरत असेल तेव्हा ही तुम्ही ते विकत घेऊन अधिक नफा मिळवू शकता. असा पर्याय फक्त ऑप्शन ट्रेडिंगमध्ये उपलब्ध आहे. इथे ट्रेडिंग करताना तुम्हाला प्रिमिअमची खरेदी-विक्री ही कॉल (Call) आणि पूट (Put) या दोन पर्यायांमधून करावी लागते. हे Call आणि Put काय असतात हे समजून घेऊ.

कॉल ऑप्शन म्हणजे काय? What is call option
ऑप्शन ट्रेडिंग करताना काही गृहितकं मांडावी लागतात. जसे की, मार्केट खाली जाईल किंवा वर जाईल. जेव्हा मार्केट वर जाईल असा अंदाज व्यक्त केला जातो तेव्हा ऑप्शन किंवा शेअर्सचा कॉल हा पर्याय खरेदी केला जातो. उदाहरणार्थ तुम्ही बॅंक निफ्टीमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करत आहात. बॅंक निफ्टीची किंमत 37300 आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की बॅंक निफ्टी 38000 हजाराचा टप्पा गाठेल. तेव्हा कॉल ऑप्शन विकत घेतला जातो.

पूट ऑप्शन म्हणजे काय? What is put option
कॉल ऑप्शन समजून घेताना आपण बॅंक निफ्टी 38000 हजाराचा टप्पा गाठेल असे गृहित धरले होते. आता आपण असे समजूया की, बॅंक निफ्टी 38000 हजारावरून खाली घसरू लागला आहे. अशावेळी 38000 हजारच्या खालील कोणतीही स्ट्राईक जसे की, 37500 चा पूट खरेदी केला जातो.

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एक्सपायरी काय असते?
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये दोन प्रकारची एक्सपायरी असते. एक आठवड्याची आणि दुसरी महिन्याची असते. प्रत्येक गुरूवारी निफ्टी 50 आणि बॅंक निफ्टी यांची एक्सपायरी असते. तर महिन्याच्या शेवटच्या गुरूवारी ऑप्शन ट्रेडिंगमधील शेअर्सची समाप्ती असते.