Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Property Certificate: गैर-भार प्रमाणपत्र म्हणजे काय? घर विकत घेताना त्याची आवश्यकता का असते?

Non Encumbrance Certificate

Image Source : housing.com

Property Certificate: जर तुम्ही लाखो- कोट्यावधी रुपये गुंतवून मालमत्ता खरेदी करणार असाल, तर गैर-भार प्रमाणपत्र (Non Encumbrance Certificate) बिल्डरकडून घ्यायला विसरू नका. घर विकत घेताना या प्रमाणपत्राची का आवश्यकता असते? जाणून घेऊयात.

घर खरेदी करणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक गुंतवणूक असते. स्वतःच्या घराची स्वप्नपूर्ती करण्यासाठी लोक लाखो- कोटी रुपये  खर्च करतात. सध्या घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. गृहकर्जाच्या मदतीने लोक स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करू शकतात. त्यामुळे बिल्डरकडून घर खरेदी करण्यापूर्वी मालमत्ते संदर्भातील महत्त्वाच्या कागदपत्रांची पडताळणी करणे आणि ती कागदपत्रे बिल्डरकडून घेणे अतिशय गरजेचे आहे. अन्यथा मोठी फसवणूक होऊ शकते. अशाच महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक म्हणजे 'गैर-भार प्रमाणपत्र' (Non Encumbrance Certificate).  

कोणत्याही मालमत्तेच्या खरेदीसाठी रजिस्टेशन आणि म्युटेशनची कागदपत्रे जितकी महत्त्वाची असतात, तितकेच महत्त्व गैर-भार प्रमाणपत्रही असते, असे तज्ज्ञांचे मत आहे. दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरांतील गुंतवणूकदारांसाठी हे प्रमाणपत्र अधिक महत्त्वाचे असते. बिल्डरकडून घर खरेदी करताना, गैर-भार प्रमाणपत्र का घ्यायला हवे, जाणून घेऊयात.

गैर-भार प्रमाणपत्र म्हणजे काय?

गैर-भार प्रमाणपत्र (Non Encumbrance Certificate) हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे. ज्यामध्ये तुमच्या मालमत्तेसंदर्भातील आर्थिक तपशील नोंदवलेले असतात. हे प्रमाणपत्र देण्यामागे कारण की, तुमच्या मालमत्तेवर कोणत्याही स्वरूपाचे कर्ज नाही. एकदा का तुम्ही गृहकर्जाची संपूर्ण रक्कम चुकवली की तुम्हाला गैर-भार प्रमाणपत्रामध्ये रिपेमेंट डिटेल्स पाहायला मिळतील.  या प्रमाणपत्रामध्ये मालमत्तेचे 12 वर्षातील व्यवहारांचे तपशील पाहायला मिळतात. थोडक्यात काय, तर मालमत्तेच्या आर्थिक व्यवहारांचा लेखचोखा यामध्ये पाहायला मिळतो.  मालमत्ता कोणी खरेदी केली, कधी खरेदी केली, त्याची किंमत काय होती आणि कोणाला विकली किंवा या मालमत्तेवर किती कर्ज आहे, हे गैर-भार प्रमाणपत्राच्या (Non Encumbrance Certificate) माध्यमातून समजून येते.

प्रमाणपत्राची गरज का आहे?

जर तुम्हाला मालमत्ता खरेदी करायची असेल, तर त्यासाठी कर्ज काढावे लागते. हे कर्ज काढण्यासाठी बँकेत गैर-भार प्रमाणपत्राची (Non Encumbrance Certificate) आवश्यकता असते. याशिवाय भविष्यात तुम्ही मालमत्ता विक्रीसाठी काढल्यावर देखील तुम्हाला या प्रमाणपत्राची गरज पडणार आहे.

गैर-भार प्रमाणपत्र कसे बनवायचे?

गैर-भार प्रमाणपत्र (Non Encumbrance Certificate) काढण्यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी नॅशनल गव्हरमेंट सर्व्हिस पोर्टलवर अर्ज करावा लागेल.

ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्ही तहसीलदार कार्यालयात जाऊ शकता. त्याठिकाणी  यासंदर्भातील एक फॉर्म भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जसे की, मालमत्तेची डिड कॉपी, रहिवासी पत्ता आणि इतर कागदपत्रे जमा करून सबमिट करावी लागतील. ही सर्व कागदपत्रे जमा केल्यावर 15 ते 30 दिवसांच्या कालावधीत गैर-भार प्रमाणपत्र (Non Encumbrance Certificate) तुम्हाला मिळेल. तुम्ही 12 ते 30 वर्षाच्या काळातील गैर-भार प्रमाणपत्र बनवू शकता. नवीन मालमत्ता खरेदी करताना हे प्रमाणपत्र बिल्डरकडून घ्यायला विसरू नका.

Source: hindi.moneycontrol.com