Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Loan against mutual funds: म्युच्युअल फंडावर कर्ज कसे घेऊ शकता?

Loan against mutual funds

अचानक उद्भवलेली आणीबाणी, वैद्यकीय खर्च, नुकसान भरून काढण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडावरती कर्ज काढू शकता. तुमची म्युच्युअल फंडाची गुंतवणूक पूर्णपणे काढून घेण्यापेक्षा त्यावर कर्ज घेणे हा पर्याय चांगला आहे. तसेच हे कर्ज सुरक्षितही आहे.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. दीर्घकाळ गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. मात्र, तुम्हाला अल्प काळासाठी पैशांची गरज पडली तर तुम्ही म्युच्युअल फंडावरती कर्जही घेऊ शकता. अचानक उद्भवलेली आणीबाणी, वैद्यकीय खर्च, नुकसान भरून काढण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडावरती कर्ज काढू शकता. तुमची म्युच्युअल फंडाची गुंतवणूक पूर्णपणे काढून घेण्यापेक्षा त्यावर कर्ज घेणे हा पर्याय चांगला आहे. तसेच हे कर्ज सुरक्षितही आहे.

म्युच्युअल फंडावर कर्ज कधी घ्यावे?

जेव्हा तुम्हाला अल्प काळासाठी म्हणजेच 3 महिने ते 1 वर्षापर्यंतच्या काळासाठी पैशांची गरज आहे, अशा परिस्थितीत तुम्ही कर्ज घेऊ शकता. वैयक्तिक किंवा कंपनीलाही हे कर्ज मिळू शकते. जेव्हा तुम्ही बँकेकडून म्युच्युअल फंडावरुन कर्ज घेता आणि कर्जाची परतफेड करत नाही. तेव्हा बँक म्युच्युअल फंडला याबाबत माहिती कळवते. त्यामुळे तुमच्या म्युच्युअल फंडातून कर्जाच्या रकमे एवढे युनिट्स काढून घेतले जातील. 25 हजार ते 2 लाखांपर्यंत कर्ज तुम्ही याद्वारे मिळवू शकता. तुम्ही गुंतवलेली रक्कम आणि फंड्सचा प्रकार यानुसार कर्जाची रक्कम बदलू शकते. 

म्युच्युअल फंडांवर कर्ज घेण्याचे फायदे?

इक्विटी, हायब्रीड, एक्सजेंज ट्रेडेड फंड कोणत्याही प्रकारची गुंतवणूक असेल तर त्यावर तुम्ही कर्ज घेऊ शकता. एचडीएफसी आणि आयसीआयसीआय सारख्या बँका तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंडाच्या बाबतीत नेट अॅसेट व्हॅल्यूच्या (NAV) 50 टक्के आणि डेब्ट म्युच्युअल फंडाच्या बाबतीत 80 टक्क्यांपर्यंत कर्ज देऊ शकतात. अॅक्सिस बँक तुमच्या डेट म्युच्युअल फंड योजनेच्या मूल्याच्या 85 टक्क्यांपर्यंत आणि तुमच्या इक्विटी म्युच्युअल फंड योजनेच्या मूल्याच्या 60 टक्क्यांपर्यंत कर्ज देऊ शकते.

निवडक म्युच्युअल फंड्सवर कर्ज

अनेक बँका केवळ त्यांनी निवडलेल्या म्युच्युअल फंड योजनांवरच कर्ज देतात. उदाहरणार्थ, स्टेट बँक ऑफ इंडिया फक्त त्यांनी बाजारात आणलेल्या म्युच्युअल फंड योजनांवर कर्ज देते. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक देखील काही ठराविक योजनांच्या आधारावर कर्ज देतात. या दोन्ही खासगी बँका CAMS मध्ये नोंदणीकृत मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांकडून व्यवस्थापित म्युच्युअल फंड योजनांवर कर्ज देतात.