Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mobile Banking : IMPS म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?

Mobile Banking : IMPS म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?

तत्काळ पेमेंट सेवा (IMPS) ही बँकांद्वारे प्रदान केलेली रिअल-टाइम इंटरबँक मनी ट्रान्सफर सेवा आहे. IMPS च्या माध्यमातून तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात तत्काळ पैसे पाठवू शकता. या सुविधेच्या माध्यमातून ग्राहक बँकेच्या सुट्टीदिवशी देखील (24×7) निधी हस्तांतरित करू शकतो. थोडक्यात या सुविधेच्या माध्यमातून तुम्हाला पैशाचे कधीही, कुठेही आणि त्वरित हस्तांतरण करता येते.


इंटरनेट आणि मोबाईल बँकिंगमुळे आर्थिक व्यवहार गतिमान झाले आहेत. RTGS, NEFT, UPI IMPS या बँकिंगमधील सुविधांमुळे पैशांचे व्यवहार अधिक गतिमान झाले. त्यामध्ये IMPS (immediate payment service)ही एक तत्काळ पैसे ट्रान्सफर करणारी सेवा म्हणून अधिक प्रचलित आहे. आज आपण IMPS ही सेवा कशी वापरली जाते, त्याचे फायदे आणि वैशिष्टे काय आहेत? याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

तत्काळ पेमेंट सेवा (IMPS) ही बँकांद्वारे प्रदान केलेली रिअल-टाइम इंटरबँक मनी ट्रान्सफर सेवा आहे. IMPS च्या माध्यमातून तुम्ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात तत्काळ पैसे पाठवू शकता. या सुविधेच्या माध्यमातून ग्राहक बँकेच्या सुट्टीदिवशी देखील (24×7) निधी हस्तांतरित करू शकतो. थोडक्यात  या सुविधेच्या माध्यमातून तुम्हाला पैशाचे कधीही, कुठेही आणि त्वरित हस्तांतरण करता येते. पैसे हस्तातरणाची ही सुविधा RTGS प्रमाणेच कार्य करते.  IMPS च्या सुविधेच्या माध्यमातून ग्राहक खरेदी करू शकतो, बिल भरू शकतो किंवा कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांना सहज आणि काही क्षमाण पैसे ट्रान्सफर करू शकतो. याची सुरुवात 2010 पासून झाली आहे.

मोबाईलद्वारे IMPS सुविधेचा वापर-

मोबाईलच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार आणखी सोपे झाले आहेत. मोबाईल बँकिंगमध्ये फंड ट्रान्सफर करण्याचा आयएमपीएसच्या (IMPS)हा सर्वात लोकप्रिय पर्याय झाला आहे. हे केवळ मोबाईल फोनच्या वापराद्वारे केले जाऊ शकते. IMPS सामान्यत: मोबाइल बँकिंगसाठी तयार केले गेले आहे. आयएमपीएसचा वापर एसएमएस,मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हालाी तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. तसेच तुम्हाला ही सुविधा वापरण्यासाठी लाभार्थीच्या बँक खाते क्रमांक, IFSC कोड इत्यादीची आवश्यकता पडते. इंटरनेट बँकिंगच्या च्या माध्यमातून देखील तुम्ही या आयएमपीडी सुविधेचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला एमएमआयडी (MMID) किंवा मोबाईल मनी ओळखकर्ता हा 7-अंकी क्रमांक गरजेचा आहे. यासाठी तुम्हाला इंटरनेट बँकिंगमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर सुविधा वापरता येते.

IMPS  कसे केले जातात पैशांचे हस्तांतरण?

  • तुमच्या बँकेच्या मोबाईल अथवा इंटरनेट बँकिंगच्या पोर्टलमध्ये लॉग-इन करा
  • IMPS पर्याय निवडा आणि MMID आणि मोबाईल नंबर एटर करा
  • तुम्ही लाभार्थ्याचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड टाका 
  • तुम्हाला ट्रान्सफर करायची आहे ती एकूण रक्कम अपडेट करा
  • त्यानंतर PIN एन्टर करा आणि OTP एन्टर करून प्रमाणीकरण प्रक्रिया समाप्त करा. 
  • ट्रान्झॅक्शनच्या पुष्टीनंतर, लाभार्थीच्या अकाउंटमध्ये फंड त्वरित ट्रान्सफर केले जातात.