Gopinath Munde Farmer Scheme Update: स्वतःचा जीव धोक्यात ठेवून बळीराजा इतरांसाठी अन्नधान्य पिकवत असतो. शेती करताना वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का बसणे, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य काही अपघात शेतकऱ्यांवर ओढवत असतात. त्यामुळे शेतकऱ्याला शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व येते.
शेतकरी हा घरातील कर्ता पुरुष असतो. त्याच्यावर ओढवलेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचा स्त्रोत बंद होऊन कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या परिस्थितीमधून सावरण्यासाठी सन 2009-10 पासून एक योजना राबविली जात आहे. तिला शेतकरी जनता अपघात विमा योजना म्हणून ओळखले जाते. तीच योजना 2015-16 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना म्हणून कार्यान्वित करण्यात आली.
Table of contents [Show]
कोणाला मिळेल या योजनेचा लाभ?
शेती व्यवसाय करताना होणारे अपघात रस्ता किंवा रेल्वे अपघात, कीडनाशके हाताळताना किंवाअन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, आकस्मिक दुदैवी अपघातामुळे होणारे मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या वारसदाराला या योजनेतून लाभ देण्यात येईल.
लाभार्थी पात्रता
राज्यातील 10 ते 75 वयोगटांतील वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य घटनेनंतर या योजनेचा लाभ घेऊ शकतो. उदा. आई-वडील, शेतकऱ्याची पती,पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती.
योजनेअंतर्गत मिळणारे लाभ
अपघाताची बाब | नुकसान भरपाई |
अपघाती मृत्यू | 2,00,000 रुपये |
अपघातामुळे दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी होणे | 2,00,000 रुपये |
अपघातामुळे एक डोळा किंवा एक अवयव निकामी होणे | 1,00,000 रुपये |
आवश्यक कागदपत्रे
- 7/12 उतारा
- मृत्यूचा दाखला
- गाव नमुना नं. 6- क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद
- शाळा सोडल्याचा दाखला
- आधार कार्ड
- निवडणूकओळखपत्र
- ओळखआणि वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्र
- स्थळ पंचनामा
- पोलिस पाटील माहिती अहवाल
अर्ज कसा करावा?
अशी घटना घडल्यानंतर अपघातग्रस्त शेतकरी किंवा शेतकऱ्याचे वारसदार यांनी सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे 30 दिवसांच्या आत सादर करणे आवश्यक आहे. तालुका कृषी अधिकारी हे या यांनी प्रस्तावांची छाननी करून पात्र विमा प्रस्ताव संबंधित तहसीलदार यांचे समिती समोर मंजुरीसाठी ठेवतात आणि मग त्यांच्या समंतीनंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.