Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Export Promotion Capital Goods योजना नक्की काय आहे? तुमच्या व्यवसायासाठी कसा होईल फायदा? जाणून घ्या

Export Promotion Capital Goods scheme

Image Source : https://www.freepik.com/

केंद्र सरकारद्वारे Export Promotion Capital Goods योजना राबवली जाते. या योजनेचा तुमच्या उद्योगासाठी कसा फायदा होऊ शकता, जाणून घ्या.

देशांतर्गत वस्तू उत्पादन क्षमता वाढावी यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. खासकरून, देशांतर्गत उत्पादन झालेल्या वस्तूना जगभरात निर्यात करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत असते. यासाठी सरकारकडून काही खास योजना देखील राबवल्या जातात. यापैकीच एक योजना Export Promotion Capital Goods scheme अर्थात निर्यात प्रोत्साहन भांडवली वस्तू योजना ही आहे. ही योजना नक्कीय काय आहे? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 

Export Promotion Capital Goods (EPCG) scheme काय आहे? 

सर्वात प्रथम 1990 च्या दशकात ही योजना मांडण्यात आली होती. मात्र, अधिकृतपणे वर्ष 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. ही एक व्यापार योजनाचा असून, भारतात उत्पादन होणाऱ्या वस्तूंची जागतिक पातळीवर निर्यात व्हावी, वस्तू व सेवांच्या उत्पादनांची गुणवत्ता वाढवून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची उत्पादन स्पर्धात्मकता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. 

या योजनेंतर्गत उत्पादकांना देशांतर्गत वस्तूंच्या उत्पादनाआधी, उत्पादनावेळी व उत्पादनानंतर कोणत्याही सीमाशुल्काशिवाय भांडवली वस्तूंची आयात करता येते. थोडक्यात, या अंतर्गत शून्य सीमा शुल्क भरून वस्तूंची आयात करू शकता. मात्र, या सवलतीचा फायदा घेण्यासाठी उत्पादकाला 6 वर्षांच्या आत सीमाशुल्काच्या रक्कमेपेक्षा 6 पट अधिक मुल्य असलेल्या वस्तूंची निर्यात करणे गरजेचे आहे. 

सीमाशुल्क न भरता कोणत्या भांडवली वस्तू आयात करता येतील?

वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी व सेवांची पुर्तता आवश्यक असलेल्या मशीन्स, प्लांटचा भांडवली वस्तूमध्ये समावेश होतो. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर सिस्टम्स देखील आयात करता येते. स्पेअर पार्ट्स, मशीन्स, उपकरण, वाहन इत्यादी आयात करता येईल. मात्र, भांडवली वस्तूंची आयात करण्यासाठी EPCG योजनेच्या अटींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

कसा होईल या योजनेचा फायदा?

निर्यातदारांना EPCG योजनेचा विशेष फायदा होऊ शकतो. तुम्ही जर उत्पादक असाल व मोठ्या प्रमाणात वस्तूंचे उत्पादन करत असल्यास या योजनेचा फायदा घेऊ शकता. या योजनेमुळे शून्य टक्के सीमाशुल्कावर भांडवली वस्तूंची आयात करू शकता. तसेच, निर्यातीसाठी देखील फायदा मिळतो. मात्र, उत्पादन क्षमता कमी असल्यास या योजनेचा फायदा घेणे योग्य ठरणार नाही.

तुम्ही DGFT च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन EPCG लायसन्ससाठी अर्ज करू शकता. अर्ज करताना तुम्हाला आयईसी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र सारखी कागदपत्रे जमा करावी लागतील. EPCG लायसन्स मिळाल्यावर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता.