Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ayushman Bharat Card Vs Health ID Card: आयुष्यमान भारत कार्ड आणि आयुष्यमान हेल्थ कार्ड यामध्ये काय फरक आहे?

Ayushman Bharat Card Vs Health ID Card

Ayushman Bharat Card Vs Health ID Card: आयुष्यमान भारत कार्ड आणि आयुष्मान हेल्थ कार्ड या दोन्ही योजना केंद्र सरकारद्वारे राबवल्या जातात आणि या दोन्ही योजना आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. फक्त या योजनांचे लाभ आणि लाभार्थी वेगवेगळे आहेत. या दोन योजनांमध्ये नेमका काय फरक आहे. हे आपण समजून घेणार आहोत.

Ayushman Bharat Card Vs Health ID Card: आयुष्यमान भारत कार्ड आणि आयुष्यमान भारत हेल्थ आयकार्ड या दोन कार्ड आणि योजनांमध्ये लोकांची फसगत होते. या दोन्ही योजनांद्वारे सर्वसामान्यांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवणे हा हेतू असून या योजना भारत सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात. आयुष्यमान भारत कार्ड आणि हेल्थ आयडी कार्ड काढण्यासाठी आधारकार्डचा वापर करावा लागतो. आधारकार्डद्वारे या दोन्ही कार्डचे व्हेरिफिकेशन केले जाते. पण या दोन्ही कार्डचे  उद्देश वेगवेगळे आहेत. चला तर या दोन्ही कार्डमध्ये नेमका काय फरक आहे. हे आपण जाणून घेणार आहोत.

आयुष्यमान भारत कार्ड (Ayushman Bharat Card)

आयुष्यमान भारत (Pradhan Mantri Jan Arogya Yojana-PMJAY) कार्ड हे भारत सरकारतर्फे दिले जाते. या कार्डच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांना वैदकीय खर्चासाठी आर्थिक मदत पुरवली जाते. या कार्डच्या लाभार्थ्यांची निवड सामाजिक-आर्थिक जातीय गणनेच्या (Socio-Economic Caste Sensus-SECC) आधारे केली जाते.

Ayushman Bharat Card (Internal Image)
Image Source: www.hexahealth.com

आयुष्यमान भारत कार्डधारकाला सरकारशी संलग्न असलेल्या हॉस्पिटलमधून उपचार घेता येऊ शकतात. देशातील सुमारे 10 कोटी गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना आरोग्यविषयक मदत पुरवणे हा आयुष्यमान भारत योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी 5 लाखापर्यंतच्या आरोग्यसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

आभा आरोग्य हेल्थ आयडी कार्ड (ABHA Health ID Card)

आभा या योजनेचे संपूर्ण नाव आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट (Ayushman Bharat Health Account-ABHA) आहे; पूर्वी ही योजना हेल्थ कार्ड किंवा आरोग्य कार्ड म्हणून प्रचलित होती. या कार्डद्वारे लाभार्थ्याला 14 अंकी युनिक क्रमांक दिला जातो. जो त्या व्यक्तीच्या आधार कार्डशी संलग्न असतो. या कार्डच्या माध्यमातून लाभार्थी आरोग्यविषयक सेवांचा लाभ घेऊ शकतो. तसेच त्याची वैद्यकीय माहिती ही एकाच ठिकाणी उपलब्ध होते.

Health ID Card (Internal Image)
Image Source: www.hexahealth.com

आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड हे सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहे.या कार्डच्या मदतीने लाभार्थीला डॉक्टरांची वेळ मिळवणे, आजाराचे निदान करणे, योग्य औषध उपचार मिळवणे आणि स्वत:चा डिजिटली वैद्यकीय रेकॉर्ड जतन होणार आहे. हे कार्ड आरोग्याशी संबंधित विविध योजनांशी संलग्न आहे. त्यामुळे लाभार्थ्याला याद्वारे विविध आरोग्य योजनांचा लाभ घेता येऊ शकतो. हे कार्ड सरकारसाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण या कार्डच्या माध्यमातून सरकारला विविध आरोग्यविषयक योजना तयार करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.

आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड असे काढा

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागांतर्गत असलेल्या www.healthid.abdm.gov.in या वेबसाईटवरून आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड अगदी 5 मिनिटांत काढता येते. यासाठी होम पेजवर Create ABHA Number यावर क्लिक करा. इथे आधार कार्ड किंवा ड्रायव्हिग लायसनच्या मदतीने आयुष्यमान भारत हेल्थ कार्डची प्रक्रिया पूर्ण करून तुमचे डिजिटल हेल्थ कार्ड काही मिनिटांत मिळवू शकता.

आयुष्यमान भारत कार्ड विरुद्ध आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड

आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड आरोग्य आणि विम्याशी संबंधित योजनांशी लिंक करता येते. या कार्डद्वारे लाभार्थ्यांची वैद्यकीय माहिती किंवा हिस्ट्री लगेच उपलब्ध होऊ शकते. तर आयुष्यमान भारत कार्ड हे एक ई-कार्ड आहे. ज्याच्या मदतीने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लाभार्थ्याला कॅशलेस आरोग्य सेवा उपलब्ध होतात. या दोन कार्डमध्ये आणखी काय फरक आहे, हे आपण पाहुया.

आयुष्यमान भारत योजनेचे फायदे

सामाजिक-आर्थिक जनजाती जनगणेच्या आधारे आयुष्यमान भारत योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेतून लाभार्थ्याला संलग्नित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस, पेपरलेस आणि मोफत वैद्यकीय सुविधा दिली जाते. या योजनेचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.

  • आयुष्यमान भारत कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते.
  • या कार्डद्वारे लाभार्थ्याला एका वर्षात 5 लाखापर्यंतची आरोग्य सेवा मिळते.
  • या योजनेतून लाभार्थ्याला विविध प्रकारच्या आरोग्य सेवांचा लाभ घेता येतो.
  • यामध्ये 3 दिवसांचा प्री-हॉस्पिटलायझेशन आणि 15 दिवसांचा पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च समावेश होतो.
  • या कार्डद्वारे जवळपास 1400 प्रकारच्या वैद्यकीय सुविधा सरकार उपलब्ध करून देते.


आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड योजनेचे फायदे

सध्या हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये डिजिटायझेशन वाढू लागले आहे. यामुळे रुग्णांची मेडिकल हिस्ट्री डिजिटली जतन होऊ लागली आहे. तसेच ती कोठोही आणि कधीही वापरू शकतो. या कार्डचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.

  • आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट किंवा डिजिटल हेल्थ कार्ड हे स्वत:सह कुटुंबियांचे हेल्थ रेकॉर्ड जतन करण्याची पहिली पायरी आहे.
  • कार्डधारकाला उपचारांपूर्वी हेल्थेकेअर प्रोफेशनल रजिस्ट्रीमधून (HPR) डॉक्टर्सचा अनुभव आणि इतर माहिती मिळू शकते.
  • त्याचरबरोबर खासगी आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांची माहिती देखील हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्रीमधून मिळवता येईल.
  • हेल्थकार्डमधून कार्डधारकाची हेल्थ हिस्ट्री, उपचार पद्धती, औषधे, मेडिकल डिस्चार्ज, मेटेस्ट रिपोर्ट यांची माहिती तपासता येते.
  • कोव्हीड-19 सारख्या महामारीमध्ये डिजिटल हेल्थ आयडी खूपच फायदेशीर आहे. 
  • व्यापक प्रमाणात राबवल्या जाणाऱ्या लसीकरण मोहीमेत या कार्डाचा फायदा होऊ शकतो. 
  • हेल्थ आयडी असणाऱ्या कार्डधारकाला  देशभरात कुठेही उपचार घेणे सहज शक्य आहे.


आयुष्यमान भारत कार्ड आणि आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड या दोन्हींमधील महत्त्वाचा फरक आपण समजून घेतला आहे. आयुष्यमान भारत योजनेमुळे भारतातील आरोग्य क्षेत्रामध्ये एक चांगला बदल घडून येऊ लागला आहे. आयुष्यमान भारत कार्डमुळे आर्थिक मागास कुटुंबियांना 5 लाखापर्यंत कॅशलेस आरोग्य सुविधा मिळत आहे. तर आयुष्यमान हेल्थ कार्डमुळे नागरिकांची आरोग्य हिस्ट्री डिजिटली जतन केली जात आहे.