Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Current Account: करंट अकाउंट म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय?

Current Account: करंट अकाउंट म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय?

Image Source : www.razorpay.com

Current Account: चालू खाते (Current Account) हे खासकरून व्यापारी लोक वापरतात. याचा वापर मुळात व्यवसायासाठीच केला जातो. बचत खात्यात रक्कम जमा करण्याच्या आणि व्यवहार करण्याचा काही मर्यादा आहेत. तशा मर्यादा करंट अकाउंटमध्ये नसतात. तर आज आपण करंट अकाउंटची वैशिष्ट्ये आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

तुम्ही बँकेत वरचेवर जात असाल. त्यामुळे बँकेत वेगवेगळ्या प्रकारचे काऊंटर असतात. याची माहिती तुम्हाला असेलच. म्हणजे ग्राहकांच्या गरजेनुसार बँकेत आपल्याला काऊंटर दिसतात आणि ते त्यानुसार ग्राहकांना सेवा देतात.

बँकेतील वेगवेगळ्या विभागानुसार बँकेची वेगवेगळी खाती सुद्धा असतात. साधारणत: सगळ्यांचेच बचत खाते असते. पण ज्याचे बचत खाते नाही. त्याचे दुसऱ्या प्रकारचे खाते त्या बँकेत असू शकते. जसे की, बँकेत बचत खाते (Saving Account), चालू खाते (Current Account), मुदत ठेव खाते (Fixed Deposit Account), आवर्ती ठेव खाते (Recurring Deposit Account), सॅलरी अकाउंट (Salary Account) आणि एनआरआय (NRI Account) अशी वेगवेगळ्या प्रकारची खाती असतात. तर आज आपण यातील करंट अकाउंट म्हणजेच चालू खात्याबद्दलची माहिती घेणार आहोत.

चालू खाते (Current Account) हे खासकरून व्यापारी लोक वापरतात. याचा वापर मुळात व्यवसायासाठीच केला जातो. व्यावसायिकांना अनेक प्रकारचे, मोठमोठ्या रकमेचे आणि सतत व्यवहार करायचे असल्याने या खात्याद्वारे त्यांना काही विशेष सुविधा दिल्या जातात. बचत खात्यात रक्कम जमा करण्याच्या आणि व्यवहार करण्याचा काही मर्यादा आहेत. तशा मर्यादा करंट अकाउंटमध्ये नसतात. या खात्यात महिन्याला कितीही पैसे डिपॉझिट करू शकतो किंवा काढू शकतो.

चालू खात्याची वैशिष्ट्ये

करंट अकाउंटचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्यं म्हणजे या खात्यावर सेव्हिंग अकाउंटप्रमाणे व्याज मिळत नाही. करंट अकाउंटमध्ये जमा असलेली रक्कम खातेदाराला कधीही वापरता येते. करंट खात्यामधून कितीही व्यवहार करता येतात. बचत खात्यामध्ये अशी सुविधा नसते. इथे त्यापेक्षा जास्त व्यवहार केले तर बँक त्या खातेदाराकडून दंड वसूल करते. चालू खात्यामध्येही बँका खातेदाराला रकमेनुसार व्यवहार करण्याची परवानगी देते. तसेच चालू खात्यातून चेक देणे किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे ट्रान्सफर करणे यालाही लिमिट नाही.

चालू खात्याचे फायदे

  • व्यवसाय करणाऱ्यांसाठी करंट अकाउंटचे बरेच फायदे आहेत.
  • व्यावसायिकांना करंट अकाउंटमधून कधीही पैसे काढता येतात.
  • करंट अकाउंटमध्ये वेगवेगळ्या ब्रान्चमधून पैसे किंवा चेक भरता येतात.
  • करंट अकाउंटमध्ये ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध असते.
  • करंट अकाउंट वेगवेगळ्या उद्देशांसाठी वापरता येऊ शकते.
  • व्यवसाय, ट्रस्ट, सोसायटी, असोसिएशन, क्लब आदी संस्था करंट अकाउंट ओपन करू शकतात.
  • करंट अकाउंटमध्ये चेकचा कितीही वापर करता येतो.
  • अतिरिक्त चेकसाठी बँक चार्ज करत नाही.


करंट अकाउंटचे अनेक फायदे आहेत. ज्याचा लाभ प्रोफेशनल, व्यावसायिक, सोसायटी, ट्रस्ट यांना मोठे व्यवहार करताना होतो. तसेच करंट अकाउंट है वैयक्तिक व्यक्तीच्या नावाने काढता येत नाही.