Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is CSR: क्लेम सेटलमेंट रेशो काय आहे? त्याचे महत्त्व काय आहे?

What is CSR

CSR: अडीअडचणीच्या काळासाठी तरतूद म्हणून विमा पॉलिसी घेतली जाते. मात्र अडचणीकाळात तुम्हाला मदत मिळालीच नाही किंवा क्लेम करण्याच्या वेळेस तो सेटल झालाच नाही, तर काय होईल, यासाठीच विमा घेण्यापूर्वी कंपनीची शहानिशा करणे गरजेचे आहे, त्यासाठी सर्वप्रथम पाहावे लागते की कंपनीचा सीएसआर काय आहे, पण म्हणजे नेमके काय? ते या लेखातून जाणून घ्या.

Explainer: अडचणीच्यावेळी मदत कोणी मदत करेल की नाही मात्र इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला नक्की साथ देईल, अशाच आशयाच्या इन्शुरन्स कंपन्यांच्या जाहिराती असतात. करोना काळात तर अनेकांना आरोग्य विम्याचे महत्त्व लक्षात आले. जेव्हा एखादी पॉलिसी घेतली जाते, तेव्हा त्यातील सुविधा पाहिल्या जातात, त्यातील व्याज किंवा परतावा याबाबत व्यवस्थित पडताळणी केली जाते. मात्र, कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो काय आहे हे पाहिलेच जात नाही. क्लेम सेटलमेंट रेशोवरुनच कंपनीची विश्वासार्हता लक्षात येते आणि येते आपण पैसे गुंतवावेत की नाही हा निर्णय सहज घेता येतो.

क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे काय? (What is CSR?)

क्लेम सेटलमेंट रेशो (CSR: Claim Settlement Ratio) हे पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी, विमा प्रदाता कंपनी किती विश्वासार्ह आहे याची तपासणी करण्याचे महत्त्वाचे निकष आहे. क्लेम सेटलमेंट रेशो हे कंपनीने दिलेल्या क्लेम सपोर्टचे सूचक असते. हे मूलत: कंपनीने दाखल केलेल्या दाव्यांच्या एकूण संख्येपैकी निकाली काढलेल्या दाव्यांची संख्या दर्शवते. उच्च सीएसआर नंबर दर्शवितात की कंपनीकडे दावा सेटलमेंटची क्षमता जास्त आहे. सीएसआरची गणना, एकूण दावे निकाली काढले त्याचा 100 ने गुणाकार केला. उदाहरणार्थ, 95% चा सीएसआर दर्शवितो की पॉलिसीधारकांनी दाखल केलेल्या 100 पैकी 95 दावे विमा कंपनीने निकाली काढले आहेत. ही टक्केवारी वर्षभरात निकाली लावलेल्या दाव्यांवरुन काढली जाते, (Total number of claims settled in a year X 100 = Claim Settlement Ratio). काही विमा कंपन्या थेट क्लेम सेटलमेंट प्रक्रिया ऑफर करतात तर काही त्यासाठी त्रयस्थ संस्थेची ​​(TPAs: Third-party administrator) मदत घेतात.

कोणत्या कंपनीचा किती रेशो आहे? (What is the CSR of which company?)

आर्थिक वर्ष 2022 मध्ये एलआयसीचे क्लेम सेटलमेंट रेशो 98.62 टक्के होते. तर खाजगी कंपन्यांविषयी बोलायचे तर, एको जनरलचा रेशो 93.49 टक्के होता. बजाज आलियांज 98.61 टक्के, भारती एक्सा 92.17 टक्के, चोलामंडलम एमएस 91.47 टक्के, एडलवाइस जनरल 99.72 टक्के, फ्यूचर जनरली 93.34 टक्के,  गो डिजिट 99.65 टक्के, आईसीआईसीआई लोम्बार्ड 96.93 टक्के, इफको टोकियो 81.67 टक्के, कोटक महिन्द्रा 98.62 टक्के , लिबर्टी 97.84 टक्के, मैग्मा एचडीआई 95.40 टक्के, नवी जनरल 98.70 टक्के, रहेजा क्यूबे 30.29 टक्के, रिलायंस 98.16 टक्के, रॉयल सुंदरम 97.75 टक्के, एसबीआई जनरल 97.84 टक्के, टाटा एआईजी 92.82 टक्के, यूनिवर्सल सोम्पो 22.14 टक्के, नेशनल 45.37 टक्के, न्यू इंडिया 91.99 टक्के, ओरिएंटल 92.71 टक्के, युनाइटेड इंडिया 89.18 टक्के, आदित्य बिड़ला हेल्थ 94 टक्के, एचडीएफसी एर्गो हेल्थ 99.80, मणिपाल सिग्ना 99.96 टक्के, मॅक्स बूपा 99.91 टक्के इतका रेशो आहे. सर्वात जास्त रेशो असणाऱ्या दोन कंपन्या म्हणजे स्टार हेल्थ यांचा रेशो 99.90 टक्के एवढा आहे, दुसरी कंपनी म्हणजे रेलिगेयर हेल्थ यांचा रेशो तर चक्क 100 टक्के आहे. ही माहिती नुकतीच विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (Insurance Regulatory and Development Authority) सादर केली आहे.