Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Artificial Intelligence: जाणून घ्या, Artificial Intelligence म्हणजे काय; त्याचा उपयोग

Artificial Intelligence

AI Technology: Artificial Intelligence फोटोज् मागील काही दिवसांपासून सोशलमिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोज् ला जवळजवळ पाच लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. सध्या हे फोटोज् गुगलवर ट्रेंड करित आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, ‘Artificial Intelligence’ म्हणजे काय? याचा भविष्यात कोणत्या क्षेत्रात उपयोग होणार आहे? याविषयी जाणून घेऊयात.

Artificial Intelligence: सध्या हे Artificial Intelligence फोटोज् गुगलवर ट्रेंड करित आहेत. या फोटोज् मध्ये भारतातील विविध राज्यातील विवाह संस्कृती दाखविण्यात आली आहे. म्हणजेच या फोटोमध्ये विविध राज्यातील संस्कृतीनुसार नवविवाहित जोडप्याचे फोटो Artificial Intelligence नुसार दाखविण्यात आली आहेत.  तुम्हाला माहिती आहे का, Artificial Intelligence म्हणजे काय? भविष्यात कोणत्या क्षेत्रात याचा उपयोग होणार आहे? याविषयी जाणून घेऊयात.

कृत्रिम बुध्दिमता तंत्र  म्हणजे काय? (Artificial Intelligence Meaning) 

AI हे तंत्रज्ञान असून यांचा फुल फार्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence)  आहे. याला मराठीत कृत्रिम बुध्दीमत्तादेखील म्हणता येईल. या तंत्रज्ञानाद्वारे कोणतीही मशीन मनुष्यासारखी स्वतःचं डोकं वापरून प्रत्यक्षात काम करू शकते. जसे की, भाषा ओळखणे, विविध भाषेत संवाद साधणे, आवाज ओळखणे, कोणतेही काम करणे, विविध भाषा बोलणे आदि गोष्टी करू शकते. म्हणजे प्रत्येकी व्यक्ती ज्या ज्या गोष्टी करू शकतो, त्या त्या गोष्टी हे तंत्रज्ञान करू शकते.  

कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञान (Artificial Intelligence Technology) 

Artificial Intelligence (AI) हा फक्त एक शब्द नसून हा एक भविष्यात होणारा मोठा बदल आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात संपूर्ण जगाचे स्वरूप बदलणार आहे. आपल्या भविष्यात येणारा काळ हा फक्त Artificial Intelligence तंत्रज्ञानानुसार चालण्याची शक्यता आहे. याचा खूप मोठा परिणाम कंपन्या, उदयोगधंदयासोबतच विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे  मोठया प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. एआय ही टेक्नॉलॉजी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरात AI तंत्रज्ञानाचे रिसर्च सेंटरदेखील आहे.

कोणत्या क्षेत्रात होणार उपयोग (In which field will it be used)

साहजिकच, AI तंत्रज्ञानाने मशीनच प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीचे काम करणार आहे. त्यामुळे तिथे माणसांची काही गरजच नसणार आहे. त्यामुळे भविष्यात विविध क्षेत्रात रोजगाराची निर्मिती होणार नाही. त्यामुळे बेरोजगारीचे प्रश्न मोठया प्रमाणात उपस्थित राहतील. या तंत्रज्ञानाचा उपयोग रिटेल, शॉपिंग व फॅशन (Retail, Shopping and Fashion), सुरक्षा आणि पाळत ठेवणे (Security and Surveillance), क्रीडा विश्लेषण आणि उपक्रम (Sports Analytics and Activities), निर्मिती आणि उत्पादन (Manufacturing and Production) या क्षेत्रात होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील छोटया-मोठया उद्योगात पुढे रोजगार मिळेल का? हा प्रश्नच उपस्थित राहणार आहे.