What is Recession: जेव्हा एखाद्या देशाचा जीडीपी (Gross Domestic Product-GDP) सतत 6 महिने घसरता असतो. तेव्हा त्याला आर्थिक परिभाषेत आर्थिक मंदी म्हणजेच रिसेशन म्हटले जाते. तसेच सतत दोन तिमाहीत देशाचा जीडीपी 10 टक्क्यांपेक्षा अधिक खाली आला असेल तर त्याला डिप्रेशन म्हटले जाते. जे रिसेशनपेक्षा अधिक धोकादायक मानले जाते. आर्थिक मंदी (Economic Recession) ही जगातली सगळ्यात मोठी घटना मानली जाते. 2008 मध्ये आलेल्या मंदीला ग्रेट रिसेशन (Great Recession) असे म्हटले गेले. तर पहिल्या महायुद्धानंतर 1930 मध्ये आलेल्या मंदीला ग्रेट डिप्रेशन (Great Depression) म्हटले गेले होते.
आर्थिक मंदीचा परिणाम
आर्थिक मंदीचा परिणाम ह दूरगामी होत असतो. यामुळे जीडीपीमध्ये घसरण होते. परिणामी दैनंदिन वापरातील वस्तुंचे भाव गगनाला भिडतात. त्याच दरम्यान सर्वसामान्यांचे उत्पन्न कमी होऊ लागते. लोकांकडे खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध नसल्यामुळे मार्केटमध्ये मालाला उठाव मिळत नाही. गुंतवणूकदार आपले हात आखडते घेतात. त्यामुळे कंपन्यांना आपल्या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी नोकर कपात करावी लागते. ज्यामुळे बेरोजगारी वाढते. या अशा मंदीच्या काळात मोठमोठ्या कंपन्या कशातरी तग धरतात. पण लहान कंपन्यांना तग धरणे जमत नाही. मग त्या बुडित निघतात. आर्थिक मंदीच्या भितीने गुंतवणूकदार शेअर मार्केटमधून पैसा काढून घेऊ लागतात. त्यामुळे शेअर मार्केटची स्थिती डळमळीत होते.
2008 मध्ये आलेल्या आर्थिक मंदीची सुरूवात अमेरिकेतील हाऊसिंग बबल (Housing Bubble) आणि लेहमन ब्रदर्समध्ये आलेल्या दिवाळखोरीपासून (Lehman Brothers Crisis) झाली होती. याचे पडसाद संपूर्ण जगावर पडले. परिणामी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगारी वाढली देशाचा जीडीपी घसरून खाली आला. जगभरातले उद्योग, कंपन्या बंद पडल्या. तर काही Export Countries म्हणजेच जपान, जर्मनी, ब्राझील यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. या देशांची अर्थव्यवस्था एक्सपोर्टवर आधारित असल्याने त्यांच्या मालाला मागणीच नव्हती. या परिस्थितीमुळे 2009 मध्ये तब्बल 50 मिलिअनहून अधिक लोकांचे रोजगार बुडाले.
2008 मधील जागतिक आर्थिक संकटाला जगभरातील देशांनी आपापल्या पद्धतीने हाताळले. भारत सरकारने त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था ढासळू नये यासाठी ठोस धोरणे अवलंबली. तसेच सरकारने नागरिकांसाठी 40 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. तसेच उत्पादनांवरील टॅक्स कमी करून लोकांना दिलासा देत अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यास मदत केली.