Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Zero Balance Account: झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट काय असते, त्यावर बँक व्याज देते का?

What is Zero Balance Account

Image Source : https://www.squareyards.com

Zero Balance Account: झिरो बॅलन्स अकाउंट खात्यामध्ये ग्राहकाला किमान रक्कम ठेवण्याचे बंधन नसते. देशातील काही मोजक्या बँका ही सुविधा सर्वसाधारण ग्राहकांना देतात. अन्यथा झिरो बॅलन्स अकाउंट हे कॉर्पोरेट क्लाईंटसाठी ऑफर केले जाते. याबाबतची अजून माहिती जाणून घ्या.

Zero Balance Account: झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट या नावातूनच तुम्हाला कळले असेल की, ज्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला किमान रक्कम शिल्लक ठेवणे गरजेचे नसते. त्या खात्याला Zero Balance Saving Account म्हटले जाते.

झिरो बॅलन्स अकाउंट खात्यामध्ये ग्राहकाला किमान रक्कम ठेवण्याचे बंधन नसते. देशातील काही मोजक्या बँका ही सुविधा सर्वसाधारण ग्राहकांना देतात. अन्यथा झिरो बॅलन्स अकाउंट हे कॉर्पोरेट क्लाईंटसाठी ऑफर केले जाते. कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांची पगाराची खाती त्या बँकेत ओपन करण्याच्या अटीवर संबंधित कर्मचाऱ्यांचे झिरो बॅलन्स अकाउंट ओपन केले जाते. या खात्यामध्ये कर्मचाऱ्या पगार जमा झाल्यावर त्यातून सर्व पैसे काढून घेतले किंवा इतर खात्यात ट्रान्सफर केले तरी चालतात.

रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईननुसार, या खात्याला बेसिक सेव्हिंग बँक अकाउंट (Basic Savings Bank Deposit-BSBD) म्हणतात. ग्राहकांमध्ये बचतीची सवय वाढावी यासाठी ही सुविधा दिली जाते.

बचत खाते ही बेसिकली बँकेत पैसे जमा करण्यासाठी काढले जाते आणि ते बहुतांश वैयक्तिक किंवा जॉईंट असते. बचत खात्यात पैसे जमा करण्याची सवयी लागावी यासाठी काही बँकांकडून त्या खात्यामध्ये किमान रक्कम शिल्लक ठेवण्याचा नियम आहे. पण एखादी बँक झिरो बॅलन्सची सुविधा देत असेल तर बँक खात्यात एकही पैसा ठेवला नाही तरी चालते. पण एखाद्या खातेधारकाने या खात्यात काही रक्कम ठेवली तर बँक सदर खातेधारकाला त्यावर नियमानुसार व्याजसुद्धा देते. तसेच ज्या सुविधा सेव्हिंग अकाउंटला असतात त्या सर्व सुविधा झिरो बॅलन्स अकाउंटला सुद्धा मिळतात.

झिरो बॅलन्स अकाउंटमध्ये ट्रान्सॅक्शनच्या मर्यादा 

झिरो बॅलन्स अकाउंटमध्ये ट्रान्सॅक्शनबाबत काही मर्यादा असतात. त्या प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे तुमच्याकडे झिरो बॅलन्स खाते असेल त्याचा वापर करण्यापूर्वी त्यावर मिळणाऱ्या फॅसिलिटी आणि व्यवहाराच्या मर्यादा जाणून घ्या. एखाद्या वेळेसे खातेदाराकडून व्यवहाराच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या तर ते खाते बँकेकडून नियमित सेव्हिंग खाते म्हणून ट्रीट केले जाऊ शकते.

ज्यांचे सॅलरी अकाउंट झिरो बॅलन्स असते. त्यांनी नोकरी बदलताना अगोदरच्या बँकेचे खाते बंद करणे गरजेचे आहे किंवा त्याबाबत बँकेला अवगत करणे आवश्यक आहे. कारण बँका ठराविक कंपन्यांनाच ही सुविधा देतात. अशावेळी तुमच्या झिरो बॅलन्स खात्यात त्या कंपनीची सॅलरी जमा झाली नाही. तर बँक तुमचे झिरो बॅलन्सचे खाते नियमित सेव्हिंग खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकते. असे झाल्यास खातेधारकाला त्या सेव्हिंग खात्यात आवश्यक असणारी किमान शिल्लक रक्कम भरावी लागणार. नाहीतर बँक त्याच्यावर दंड आकारू शकते.

झिरो बॅलन्स खात्याचे फायदे काय?

  • नो मिनिमम बॅलन्स
  • सर्व सुविधा मोफत
  • इंटरनेट बँकिंग फ्री
  • डेबिट कार्ड / एटीएम कार्ड
  • डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा


झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करण्यासाठी सेव्हिंग अकाउंटप्रमाणेच कागदपत्रे लागतात. जसे की, आधारकार्ड, पॅनकार्ड, फोटो, निवासाचा पुरावा इत्यादी. पण वैयक्तिक पातळीवर झिरो बॅलन्स अकाउंटची सुविधा देणाऱ्या खूपच मोजक्या बँका आहेत. यात सार्वजनिक क्षेत्रातील एसबीआय बँकेबरोबर, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, कोटक महिंन्द्रा आणि आयसीआयसीआय बँक आहे.