एक व्यक्ती, संस्था किंवा फर्म शेअर मार्केट मध्ये शेअर्स खरेदी आणि विक्रीसाठी सेवा पुरवते त्याला शेअर ब्रोकर म्हणतात. मराठीत याचं ब्रोकरला दलाल असेही म्हंटले जाते. शेअर ब्रोकर व्यक्ती, संस्था किंवा कंपन्या यासाठी शुल्क आकारतात, ज्याला दलाली म्हणतात. ब्रोकरची उपजीविका दलाली द्वारे चालवली जाते. ब्रोकर म्हणजे काय आणि ब्रोकर कोणत्या प्रकारच्या सेवा पुरवतात याबद्दल माहिती घेऊया. तुम्हाला शेअर्स किंवा म्युच्युअल फंड खरेदी करायचे असतील तर तुम्हाला ब्रोकरची आवश्यकता असेल.
शेअर ब्रोकर म्हणजे काय (What is Stock Broker)
शेअर ब्रोकर हे शेअर बाजारातील शेअर्स खरेदी करण्याचे माध्यम आहे. आपण थेट शेअर बाजारातून शेअर्स खरेदी करू शकत नाही. शेअर बाजारातून शेअर्स खरेदी करण्यासाठी डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते असणे आवश्यक आहे. डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते उघडण्याचे काम दलाल करतात. हे दलाल एनएसडीएल (National Securities Depository Limited NSDL) आणि सीडीएसएलशी (Central Depository Services (India) Limited CDSL) डीपी (Depository participant DP) सह जोडलेले आहेत. जेव्हा तुम्ही शेअर्स खरेदी आणि विक्रीची ऑर्डर देता तेव्हा ती ट्रेडिंग खात्याद्वारे ब्रोकरकडे जाते आणि ब्रोकरच्या माध्यमातून ही ऑर्डर शेअर मार्केटच्या सर्व्हरवर पोहोचते. शेअर बाजारात तुमची मागणी पोहोचवण्याचे काम हे ब्रोकर करतात. ब्रोकर हा शेअर बाजाराचा कणा आहे, त्यांच्याशिवाय शेअर मार्केट चालवणे कठीण आहे.
शेअर ब्रोकर्सचे प्रकार(Type of Broker)
शेअर बाजारात वेगवेगळ्या सेवा पुरवण्यासाठी ब्रोकरचे दोन प्रकार आहेत. पूर्ण वेळ दलाल (Full time broker) आणि सवलत दलाल (Discount Broker) हे दोन्ही प्रकारचे दलाला कसे काम करतात ते पाहूया.
पूर्ण वेळ ब्रोकर (Full time Broker)
पूर्ण वेळ दलाल शेअर बाजाराशी संबंधित सर्व सेवा पुरवतो. जसे की डिमॅट खाते उघडणे, व्यापार खाते उघडणे, यासारख्या शेअर बाजाराच्या कामाशी संबंधित सर्व काम शेअर ब्रोकर करतात. स्टॉक निवडतात आणि त्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना सल्ले देण्याचा कामे ब्रोकर करतात. गुंतवणूकदाराने कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, त्याने किती कालावधीसाठी गुंतवणूक करावी आणि शेअर्स कधी विकावे याचे मार्गदर्शनही ब्रोकरकडून केले जाते. अनेक सेवा पुरवल्यामुळे पूर्णवेळ दलालांची दलालीही जास्त असते. हे दलाल मोबाईल अॅपवर ग्राहकांना अनेक सुविधाही देतात. पूर्ण वेळ दलालाची हेल्पलाईन सेवा देखील खूप चांगली असते.
सवलत ब्रोकर (Discount Broker)
सवलत दलाल गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारचे सल्ला देत नाहीत. कोणत्याही स्टॉक संशोधनाची कोणतीही माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. सवलतीचे दलाल फक्त आपले सौदे बाजारात पोहचवण्याचे काम करतात, ज्यामुळे या दलालाची दलाली खूप कमी आहे, ज्यामुळे ग्राहकांना फायदा होतो. सवलती दलालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे सर्व काम ऑनलाईन केले जाते. डिमॅट खाते उघडण्यापासून, संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली जाते. झीरोधा भारतातील आघाडीच्या सवलत दलालांपैकी एक आहे.
गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणूक करणे सोईचे जावे यासाठी शेअर ब्रोकर महत्वाची भूमिका बजावत असतो.