Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cyber Insurance: सायबर इन्शुरन्स पॉलिसी काय आहे? फ्रॉड झाल्यावर असा मिळवा फायदा

What is Cyber Insurance

Cyber Insurance: सायबर सिक्युरिटी इन्शुरन्स सायबर हल्ले आणि सायबर गुन्ह्यांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीचे संरक्षण करण्यास मदत करतो. तसेच आपली वैयक्तिक माहिती (Sensitive Information) सार्वजनिक होणाऱ्या मनस्तापातून सावरण्यासाठी देखील मदत करतो.

आपण सर्वच 0,1 या बायनरी नंबर्सच्या अवाढव्य पसाऱ्यामध्ये हरवून गेलेलो आहोत. ॲप्स (Apps), ब्रॉडबँड (Broadband), कोडिंग (Coding), डिजिटलायझेशन (Digitalization) यांसारख्या संकल्पना सध्याच्या युगाच्या A, B, C, D अल्फाबेट्स झाल्या आहेत. म्हणतात, तिसरे महायुद्ध एकतर “वॉटर वॉर” असेल, आणि ते “नंबर वॉर”च्या स्वरूपात केले जाईल. कारण “डेटा (Data)” हे आजच्या क्षणाला सर्वात घातक शस्त्र (ruling weapon) बनले आहे.

CERT-In म्हणजे इंडियन कॉम्प्युटर इमर्जंसी रिस्पॉन्स टीमच्या अहवालानुसार, भारतामध्ये 2022 या वर्षांमध्ये 12,66,564 (नोव्हेंबर 2022 पर्यंत) सायबर अटॅक्स झाले होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ही फक्त भारतातील प्रकरणे होती आणि केवळ नोंदवलेली प्रकरणे होती. सायबर गुन्हे सातत्याने वाढतच आहेत. याची तीव्रता या आकड्यांवरून तुम्हाला जाणवेल. इंटरनेटने मानवतेला एक अतिशय स्मार्ट भविष्य दाखवलेय. पण या स्मार्ट भविष्याला सायबर क्राईम्सची एक गडद बाजू आहे.


आजच्या “डेटा-युगामध्ये” इलेक्ट्रॉनिक-शॉपिंग, नेट बँकिंग, सोशल नेटवर्किंग आणि अशा अनेक ऑनलाइन व्यवहारांमुळे आपण डिजिटल फसवणूक, सायबर-स्टॉकिंग, हॅकिंग, स्पूफिंग, फिशिंग तसेच ऑनलाइन चोरी सारख्या हल्ल्यांना बळी पडण्याची शक्यता वाढलीये. मग अशा वेळी स्वतःचे रक्षण करण्याचा काही मार्ग आहे का? होय,नक्कीच आहे. “Cyber Security Insurance” अर्थात “सायबर सुरक्षा विमा” सायबर-हल्ले आणि सायबर गुन्ह्यांमुळे होणारे आर्थिक हितसंबंधाच्या (financial interest) संरक्षण करण्यास मदत तर करतो आणि आपली वैयक्तिक तसेच संवेदनशील डेटा (sensitive information) ब्रीच झाल्याने आपल्याला होणाऱ्या मनस्तापातून सावरण्याचे देखील कार्य करतो.

सायबर सिक्युरिटी इन्शुरन्स क्लेम कसा कराल?

सायबर फसवणूक किंवा गुन्ह्याची जाणीव होताच सर्वप्रथम पोलिस स्टेशन आणि/किंवा सायबर सेल विभागात पोलिस तक्रार दाखल करावी. या FIRचे / तक्रारीचे सर्व डिटेल्स (शक्यतो 2 दिवसांत) इन्शुरन्स कंपनीला कळवावे. इन्शुररकडे नुकसान-भरपाईसाठी 90 दिवसांच्या आत क्लेम करणे आवश्यक आहे आणि तो देखील लेखी स्वरूपात (On paper). सोबत झालेल्या नुकसानाचा पुरावा (Evidence of loss) इन्शुररला सादर करावा लागतो. इन्शुरन्स कंपनीचा इन्व्हीस्टीगेटर, इन्शुररचे फॉरेन्सिक एक्सपर्टस् संबंधित प्रकरणाचे तपशीलवर व्हेरिफिकेशन करतात. कंपनीने क्लेम ॲक्सेप्ट केल्यास इन्शुअर्ड पार्टीला पे-आउट मिळते. क्लेम अमान्य (रिजेक्ट) झाल्यास तसे कळविण्यात येत.

क्लेम करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात?  

संपूर्ण भरलेला आणि स्वाक्षांकित केलेला क्लेम फॉर्म, पोलीस अहवालातील FIR ची कॉपी, फॉरेन्सिक रिपोर्टची कॉपी, IT कन्सल्टंट्स सर्व्हिस वरील खर्चाची बिल्स, तसेच सिस्टम रिस्टोरेशन साठी केलेल्या खर्चाची बिल्स, प्रत्यक्ष झालेल्या नुकसानाचा पुरावा, डेटा आपल्या वैयक्तिक मालकीचा असल्याचा पुरावा, परिस्थितीजन्य निष्कर्षांचे स्क्रीन-शॉट्स, तसेच नुकसान संबधी इतर कोणते दस्तऐवज (डॉक्युमेंट्स) असल्यास सादर केला जाणे अपेक्षित आहे. न्यायालयाकडून आपल्याला कायदेशीर नोटीस किंवा समन्स आले असल्यास त्याची प्रत देखील सोबत जोडणे आवश्यक आहे.

क्लेम सेटल होण्यासाठी किती वेळ लागतो?

आवश्यक ती सर्व डॉक्युमेंट्स सबमिट केली, की या नाटकातील आपला असलेला रोल पूर्ण झाला असतो आणि आता इन्शुरन्स कंपनीचा रोल सुरू होतो. इन्शुरर त्याच्या फॉरेन्सिक तज्ञांचा सल्ला घेऊन क्लेमचे व्हेरिफिकेशन करतो. सायबर-तज्न्यांचा रिपोर्ट  आणि सर्व डॉक्युमेंट्स प्राप्त झाल्यापासून 5 ते 7 दिवसांच्या आत, इन्शुरन्स कंपनीने क्लेम ॲक्सेप्ट केला असल्यास क्लेम सेटलमेंट प्रोसेस सुरु करते.

म्हणून अगदी या क्षणाला हा कॉलम लिहीत असताना आणि तुम्ही वाचत असताना देखील आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये असणाऱ्या स्मार्ट-फोनमधील सॉफ्टवेअर्स, ॲप्स, ॲन्टी-वायरस सुखनैव चालू राहावेत, म्हणून देश-विदेशांतील सायबर-तज्ज्ञ क्षणाक्षणाला सिस्टमवर होत असलेले सायबर हल्ले परतावून लावत आहेत. कारण एका सेकंदाचीही चूक सगळी संगणक-संरक्षण प्रणाली करप्ट करू शकते. खऱ्या अर्थाने सायबर वॉरने देशादेशांतल्या सीमारेषा पुसत करून टाकल्या आहेत.