Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

e-Rupi Voucher: सर्वसामान्यांच्या फायद्याचं ई-रुपी व्हाउचर आहे तरी काय? आरबीआयने दिली परवानगी

e-Rupi Voucher: सर्वसामान्यांच्या फायद्याचं ई-रुपी व्हाउचर आहे तरी काय? आरबीआयने दिली परवानगी

Image Source : www.dailypioneer.com

e-Rupi Voucher : ई-रुपी व्हाउचर हे सर्वसामान्यांच्या फायद्याचं आहे. पण हे नेमकं आहे तरी काय, असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नॉन-बँकिंग कंपन्यांना प्रीपेड पेमेंट साधनांद्वारे ई-रुपी व्हाउचर जारी करण्यास मान्यता दिली आहे. जाणून घेऊ सविस्तर...

तुम्हाला जर ई-फॉर्म डिजिटल व्हाउचर वापरायचे असतील, तर लवकरच सरकारकडून सर्वसामान्यांसाठीही ई-फॉर्म व्हाउचर जारी केले जाण्याची शक्यता आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) नॉन-बँकिंग कंपन्यांना प्रीपेड पेमेंट साधनांद्वारे (Prepaid payment instruments) ई-रुपी व्हाउचर जारी करण्यास मान्यता दिली आहे. म्हणजेच, आता बिगर बँकिंग कंपन्या प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंटच्या माध्यमातून ई-रुपी व्हाउचर जारी करू शकतील. तसंच सेंट्रल बँकेनं व्यक्तींच्या वतीनंदेखील ई-रुपी व्हाउचर जारी करायला परवानगी दिलीय. सामान्य लोक आणि लाभार्थ्यांना सारखेच फायदे लक्षात घेऊन त्याची व्याप्ती वाढवणं आणि विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे.

काय म्हणाले आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास?

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यासंदर्भात म्हणाले, की व्यक्तींच्या वतीनं ई-रुपी व्हाउचर जारी करणं आणि रिडम्प्शनची प्रक्रिया अधिक सोपी करणं आणि सध्याच्या काही संरचनेच्या इतर बाबी सक्षम करणं हेही प्रस्तावित आहे. या उपायांमुळे ई-फॉर्म डिजिटल व्हाउचरचे फायदे सहज उपलब्ध होणार आहेत. मोठ्या प्रमाणातली ग्राहकांची संख्या आणि देशातली डिजिटल पेमेंट प्रक्रिया आणखी सोपी बनवणार आहोत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शक्तीकांत दास यांनी या पेमेंट प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती यावेळी दिली.

ई-रुपी म्हणजे काय, काम कसं करतं?

ई-रुपी हे डिजिटल व्हाउचर आहे. ग्राहकाला त्याच्या फोनवर एसएमएस किंवा क्यूआर कोडच्या स्वरूपात ते मिळतं. हे एक प्रीपेड व्हाउचर आहे. कोणत्याही केंद्रावर जिथे त्याचा स्वीकार होतो, तिथे ते रिडीम करता येईल. समजा जर सरकारला हॉस्पिटलमधल्या कर्मचार्‍यांवर विशेष उपचार करायचा असेल, तर ते भागीदार असलेल्या बँकेच्या माध्यमातून विशिष्ट रकमेसाठी ई-रुपी व्हाउचर जारी करू शकतं. कर्मचाऱ्याला आपल्या स्मार्टफोनवर एसएमएस किंवा क्यूआर कोड मिळेल. तो संबंधित हॉस्पिटलला भेट देऊ शकतो आणि या सेवांचा लाभ घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्या फोनवर मिळालेल्या ई-व्हाउचरद्वारे पैसे देऊ शकतो.

ई-रुपीचे फायदे

कॅशलेस व्हाउचरवर आधारित पेमेंट पद्धत म्हणजेच ई-रुपी होय. कार्ड, डिजिटल पेमेंट अ‍ॅप्स किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये न जाता व्हाउचर रिडीम करण्यात ग्राहकांना मदत करणारा पर्याय आहे. ई-रुपीसाठी सामान्य लोकांकडे बँक खातं असणं गरजेचं नाही. हा इतर डिजीटल पेमेंटच्या पद्धतीपेक्षा सर्वात वेगळा आणि सर्वात फायद्याचा पर्याय आहे. ही एक सोपी, संपर्करहित, टू स्टेप रिडेम्प्शन प्रक्रिया आहे. यात कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करण्याची गरज नाही. ही ई-रुपी सेवा बेसिक फोनवरदेखील काम करू शकते. म्हणजे ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीत तसंच इंटरनेट कनेक्शनसंबंधी काही समस्या असतील, तर अशावेळी या सुविधेचा वापर करता येवू शकतो.