Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Travel Loan: ट्रॅव्हल लोन मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत? जाणून घ्या

Travel Loan Documents

SUMMERY: तुम्हालाही फिरायला जायला आवडत असेल, तर सध्या बँका पर्यटनासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहेत. हे कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर (Cibil Score) किती असावा, कोणती कागदपत्रं गरजेची आहेत, पात्रता निकष काय, इत्यादी गोष्टी जाणून घ्या.

हल्ली पर्यटनासाठी बँकांकडून कर्ज देण्यात येते. वैयक्तिक कर्ज (Personal Loan) या कॅटेगरी अंतर्गत बँका ट्रॅव्हल लोन (Travel Loan) उपलब्ध करून देतात. मात्र हे कर्ज देण्यापूर्वी बँका अर्जदाराचा पाठपुरावा करतात. अर्जदाराचा सिबिल स्कोर (Cibil Score) यासाठी तगडा असणे गरजेचे असते. ज्या अर्जदाराचा सिबिल स्कोर चांगला असेल, त्याने कमीत कमी कागदपत्रं (Minimum Document) जमा केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कर्जाची रक्कम त्याच्या खात्यात जमा केली जाते. पण हे कर्ज मिळवण्यासाठी पात्रतेचे निकष काय?,कोणती कागदपत्रं बँकेला जमा करावी लागतात? व्याजदर आणि शुल्क किती आकारले जाते? याशिवाय अर्ज कसा करायचा, या सगळ्याची माहिती जाणून घ्या.

ट्रॅव्हल लोन घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जसं की, अर्जदाराचा सिबिल स्कोर, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रं याची माहिती जाणून घेऊयात.

सिबिल स्कोर (Cibil Score) किती असावा?

ट्रॅव्हल लोन हे इतर कर्जप्रमाणे अतिशय सामान्य झाले आहे. मात्र हे कर्ज घेण्यासाठी बँका अर्जदाराचा सिबिल स्कोर तपासतात. अर्जदाराचा सिबिल स्कोर (Cibil Score) तगडा असेल, तर बँक काही मिनिटात पैसे अर्जदाराच्या खात्यात जमा करते. यासाठी अर्जदाराचा किमान सिबिल स्कोर 700 असावा किंवा त्याहून जास्त असेल तर उत्तम.

विशेष म्हणजे जर ग्राहक त्याच्याच बँकेमध्ये ट्रॅव्हल लोनसाठी (Travel Loan) अर्ज करत असेल तर, काही कागदपत्रं सादर केल्यानंतर काही मिनिटांमध्ये त्याला कर्ज मिळते. याउलट इतर  बँकांमध्ये अर्ज केला तर, काही तासांमध्ये हे कर्ज सहज उपलब्ध होते. इतकी याची सोपी प्रक्रिया आहे.

कर्ज मिळवण्यासाठी पात्रता निकष काय?

  • अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 65 वर्ष असणे आवश्यक आहे
  • पगारदार व्यक्तीने या कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी किमान 6 महिने नोकरीत असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) बँकांना मान्य असणे आवश्यक आहे. बहुतेक बँका किमान 700 क्रेडिट स्कोअर असलेल्या व्यक्तींनाच प्राधान्य देतात
  • या कर्जाचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे किमान मासिक उत्पन्न 20,000 रुपये असणे आवश्यक आहे

कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत?

बाजारपेठेतील बहुतेक सर्वोत्कृष्ट बँका अत्यंत कमी कागदपत्रांसह (Minimum Document) ग्राहकांना ट्रॅव्हल लोन देतात. प्रत्येक बँकेनुसार कागदपत्रं बदलू शकतात. तथापि, यासाठी अर्ज करताना काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे सबमिट करणे आवश्यक असते. ती कोणती, हे खाली नमूद करण्यात आली आहेत.

  • ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड आणि पॅन कार्ड सदर करावे लागेल 
  • पत्त्याचा पुरावा देताना वीज बील किंवा आधार कार्ड दाखवले तरी चालू शकते 
  • व्यक्तीच्या उत्पन्नाचा पुरावा सादर करताना Payslip किंवा IT Returns दाखवावे लागतील 
  • याशिवाय अर्जाची कॉपी आणि अर्जदाराचा फोटो द्यावा लागणार आहे

प्रक्रिया शुल्क आणि व्याजदर किती?

ट्रॅव्हल लोनची प्रकिया करण्यासाठी बँक प्रक्रिया शुल्क (Processing Fees) आकारते. हे शुल्क प्रत्येक बँकेनुसार बदलत जाते. अर्जदाराच्या एकुण कर्जाच्या रकमेवर हे शुल्क आकारले जाते. किमान 1.5 ते 3 टक्क्यांपर्यंत हे शुल्क असू शकते.

हे कर्ज वैयक्तिक कर्जाच्या (Personal Loan)अंतर्गत मिळत असल्याने याचा व्याजदरही जास्त असतो. मात्र क्रेडिट कार्डवरील व्याजदरापेक्षा (Credit Card Interest) ट्रॅव्हल लोनचा व्याजदर (Travel Loan Interest) कमी असतो. 


'Credit Mantri' या वेबसाईटने 2023 मधील नामांकित बँकांचे ट्रॅव्हल लोनचे व्याजदर जाहीर केले आहेत. ते किती आहेत, हे समजून घेण्यासाठी खालील तक्ता नीट पाहा.  

bank-infographic.jpg

कर्ज किती कालावधीसाठी दिले जाते?

व्यक्तीच्या उत्पन्नानुसार बँक त्याला कर्ज देते. अर्थात प्रवासासाठी किती खर्च येईल, त्यानुसार व्यक्ती कर्जाच्या रकमेचा दावा करू शकतो. मात्र घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा केवळ 5 ते 6 वर्षांपुर्ता मर्यादित ठेवण्यात आला आहे. हा कालावधी वाढवण्याचा  किंवा कमी करण्याचा अधिकार बँक राखून ठेवते. हा कालावधी व्यक्तीच्या उत्पन्नानुसार बदलू शकतो. 

अर्ज कसा करायचा?

  • ट्रॅव्हल लोनसाठी अर्ज करणे ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे. बहुतांश बँका आता वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाइईन अर्ज (Online Apply) देतात
  • तुम्ही फक्त बँकेच्या अधिकृत वेबसाइटला (Visit Bank Website) भेट द्या आणि ट्रॅव्हल लोनचा अर्ज करण्यासाठी तुमचे वैयक्तिक तपशील भरा
  • तुम्ही तुमची कागदपत्रे ऑनलाईन सबमिट करू शकता आणि बँकेकडून त्वरित मंजुरी मिळवू शकता
  • तुम्ही बँकेच्या शाखेला भेट देऊन अर्ज करू शकता किंवा संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करू शकता 
  • तुम्हाला अर्ज करण्यासाठी काही सहाय्य हवे असल्यास, बँकेच्या ग्राहक सेवा विभागाची मदत घेऊ येऊ शकते