Smartwatch Price: आपण दिवसेंदिवस डिजिटल तंत्रज्ञांनाबरोबर स्मार्ट होत चाललो आहोत, तर मग तशा आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूही स्मार्ट होत चालल्या आहेत. त्यातलीच एक वस्तू म्हणजे स्मार्टवॉच! पहिले फिटबीट आले, मग त्याच्यामागोमाग स्मार्टवॉचने एँट्री घेतली. सुरुवातील हे वॉच अगदी 10 हजारांना वैगरे मिळत होते, मात्र लगेचच बोट, जेबीएल, नॉइस यांसारख्या कंपन्यांमुळे हे स्मार्टवॉच आणि इतर डिजिटल एक्सेसरीज स्वस्त मिळू लागली. अगदी दीड हजारांपासून स्मार्टवॉच मिळतात.
सर्वात स्वस्त स्मार्टवॉचचे फीचर्स (Features of the cheapest smartwatch)
दीड हजारांपेक्षा स्वस्त स्मार्टवॉच मिळत असेल का? तर हो, अगदी दीडशे रुपयांनाही स्मार्टवॉच मिळते. अमेझफीट स्ट्रॅटोसचे (Amazfit Stratos) स्मार्टवॉच दिडशे रुपयांना मिळते. तर, अॅगलन्स (Aglance) कंपनीचे स्मार्टवॉच 199 रुपयांना मिळते. एमयुके ट्रिक्स (MUK Trick) या कंपनीचे स्मार्टवॉच 399 रुपयांना मिळते. हे संपूर्ण ऑनलाईन आणि ऑफलाईन बाजारातील सर्वात स्वस्त स्मार्टवॉच आहेत.
या तिन्ही स्मार्टवॉचमध्ये टच स्क्रिन, नाईट मोड, अॅक्टिव्हीट मोड, बॅटरी बॅकअप, ब्लडप्रेशर, हार्टबीट लेव्हल तपासण्याची सुविधा आहे. मुख्य म्हणजे ही तिन्ही स्मार्टवॉच वॉटरप्रूफ आहेत. इतक्या स्वस्त स्मार्टवॉचमध्ये सर्व हाय क्वालिटी ब्रँडेड वॉचचे फिचर्स आहेत.
स्मार्टवॉच स्वस्त कसे मिळते? (How do smartwatches get cheaper?)
स्वस्त स्मार्टवॉच हे चीनवरुन येतात. चीनमध्ये इलेक्ट्रिक प्रोडक्ट स्वस्तात बनवली जातात. या वॉचचे लाईफ फार नसते, मात्र जे वारंवार नवीन विकत घेणारे असतात, त्यांना ही स्वस्त काही दिवस चालणारी घड्याळे घ्यायला आवडतात. तसेच ही घड्याळे भारतात मोठ्या प्रमाणात विकलीही जातात. लहान शॉप्समध्ये, रस्त्यांवर हे वॉच माससाठी किरकोळ बाजारात आणले जातात. तर काही लोक त्यावर आपले लेबल चढवून ऑनलाईन बाजारातही विकतात.
चीनवरुन येणाऱ्या मालाला व्हाईट लेबल माल म्हणतात. त्या मालावर स्वत:चे ब्रँड लेबल लावून विकता येते. शार्क टँक इंडियामधील शार्क अमन गुप्ता यांची बोट ही कंपनीदेखील व्हाईट लेबलिंग करते. तेही चीनवरुन माल घेऊन त्याचे ब्रँडींग, पॅकेजिंग भारतात करून विकतात. मात्र बोटने स्वत:चे सर्व्हिस सेंटर आणि प्रोडक्टची क्वालिटी मेटेंन केलेली आहे, त्यामुळे त्यांचे प्रोडक्ट चांगले विकले जातात आणि जनतेमध्ये त्यांची मान्यता आहे. मात्र, हे सगळ्यात स्वस्त असलेले स्मार्टवॉच आणि त्यांच्या कंपनींच्या नावांविषयी कोणाला काहीच माहिती नाही आहे. चीनच्या वस्तूंबद्दल म्हटले जाते तसे चले ते चाँद तक वरना, शाम तक तसा प्रकार होऊ शकतो, त्यामुळे स्वस्त वॉच जर काहिच दिवसांसाठी घालायचे असेल तर घेता येऊ शकते. तसेही, या प्रोडक्टपासून राहिले पाहिजे, कारण या प्रोडक्टचे अॅप आपला मोबाईल हॅक करू शकते. त्यामुळे हे स्मार्टवॉच विकत घेताना सावध राहा.