तुमची आरोग्य विमा पॉलिसी सद्यस्थितीत ज्या कंपनीमध्ये आहे तेथून दुसऱ्या कंपनीमध्ये पोर्ट करता येते. सोप्या शब्दात सांगायचे तर, जसे तुम्ही मोबाइलचे सीम कार्ड एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत पोर्ट (Portability of Health Insurance करू शकता). त्याचप्रमाणे तुमची विमा पॉलिसीही दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर करू शकता. कंपनीकडून चांगली सेवा न मिळणे, विमा योजना पुरेशी नसने किंवा इतर कोणतेही कारण असल्यास तुम्ही पॉलिसी पोर्ट करू शकता. पॉलिसीत असलेले फायदे न गमावता दुसऱ्या कंपनीकडे जाण्याचे स्वातंत्र्य ग्राहकांना आहे.
पोर्टिबिलीटीसाठी अर्ज कसा कराल?
1) चालू विमा पॉलिसी संपण्यापूर्वी किमान 45 दिवस आधी नवीन कंपनीकडे पोर्टिबिलीटीसाठी अर्ज करा.
2) दुसऱ्या विमा कंपनीला जेव्हा पोर्ट करण्याची विनंती मिळेल, तेव्हा कंपनी तुम्हाला प्रपोजल पाठवेल. ज्यामध्ये कंपनीकडून देण्यात येणारे लाभ, विविध योजना आणि प्रिमियम संदर्भात माहिती असेल.
3) तुमच्या गरजा पूर्ण करणारी योग्य योजना तुम्ही निवडू शकता. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे विमा कंपनीला पाठवावी लागतील.
४) विमा धारकाची माहिती पडताळून पाहण्यासाठी जसे की, आधीच्या कंपनीकडे केलेले दावे, आरोग्याची माहिती मिळवण्यासाठी ज्या कंपनीत पोर्ट होत आहात ती कंपनी आधीच्या कंपनीला संपर्क करेल. तसेच IRDAI च्या संकेतस्थळावर जाऊन माहिती पडताळून पाहिल.
5) काही दिवसांत तुमची सद्य स्थितीतमध्ये विमा पॉलिसी असलेली कंपनी नव्या कंपनीशी तुमची माहिती शेअर करेल. जर कंपनीनी ही माहिती देण्यास उशीर केल्यास पॉलिसी पोर्ट होण्यास वेळ लागू शकतो.
6) आधीच्या कंपनीकडून संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर दुसरी कंपनी तुम्हाला विमा पॉलिसी देण्याबाबतचा किंवा नाकरण्याबाबत 15 दिवसांच्या आत निर्णय घेईल. जर 15 दिवसांत निर्णय घेतला नाही, तर कंपनीला पोर्टची सुविधा देणे अनिवार्य आहे.
कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?
आधीच्या कंपनीकडे पॉलिसी काढल्याची किंवा नूतनीकरण केल्याची कागदपत्रे, जर विम्याचा दावा केला असेल तर त्यासंबंधित कागदपत्रे, जसे की, रुग्णालयाचा डिस्चार्ज रिपोर्ट. दावा केलेला नसेल तर सेल्फ डिक्लेरेशेन फॉर्म. ज्या कंपनीमध्ये तुम्ही पोर्ट होत आहात त्या कंपनीला पोर्टिबिलीटी फॉर्म आणि प्रपोजल फॉर्म भरुन द्यावा लागेल.
पोर्टिबिलीटीचे फायदे
आधीच्या कंपनीत जर चांगली सुविधा मिळत नसेल तर तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये पोर्ट होऊ शकता. नवीन सदस्य किंवा अतिरिक्त कव्हर पोर्ट करताना तुम्ही घेऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला प्रिमियम भरावा लागेल. नो क्लेम बोनस नव्या विमा कंपनीच्या पॉलिसीमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो. पसंतीची विमा कंपनी निवडण्याचे स्वातंत्र्य ग्राहकाला मिळते.