घरांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. त्यातच काही दुर्घटनांमुळे अथवा नैसर्गिक आपत्तीमुळे पै-पै जमवून बांधलेल्या घराचे नुकसान झाल्यास कोणत्याही व्यक्तीवर आभाळ कोसळल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारच्या जोखमीसाठी घर खरेदी केल्यानंतर त्याचा इन्शुरन्स काढणे आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षेचे आणि फायद्याचे ठरेल. यामुळे कोणत्याही नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानापासून तुम्ही तुमच्या घराचे रक्षण करु शकता. त्याच अनुषंगाने आज आपण होम इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कोणकोणते कव्हरेजचा समावेश असतो याबाबतची माहिती आज आपण जाणून घेऊयात.. ज्यामुळे तुम्हाला सर्वसमावेशक विमा पॉलिसी खरेदी करणे सोयीचे होईल.
होम इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जाते?
- घर आणि घरातील वस्तू
होम इन्शुरन्स फक्त घरासाठीच मिळत नाही तर घरात असलेल्या वस्तू जसे की, इलेक्ट्राॅनिक आणि फर्निचरसाठी सुद्धा कामात येतो. याचबरोबर काही बाबींमध्ये, महागडे दागिने आणि आर्टवर्क यांचा देखील एका विशिष्ट मर्यादेपर्यंत समावेश असतो. त्यामुळे होम इन्शुरन्स तुम्हाला घरातील महागड्या संपत्तीवर ही कव्हर देते. तसेच, घराची दुरूस्ती सुरू असल्यास, दुसरीकडे राहायला गेल्यावर त्याचाही खर्च होम इन्शुरन्स कव्हर करतो.
- होम लोन इन्शुरन्सपेक्षा वेगळे
तुम्ही होम लोन इन्शुरन्स आणि होम इन्शुरन्स या दोन्हींना एकच समजण्याची चूक करू नका. कारण, होम लोन इन्शुरन्स तुमच्या घराचा हप्ता थकल्यास, तो सेटल करायला कामी येतो. तर होम इन्शुरन्स तुमच्या घराचे नुकसान झाले किंवा चोरी झाल्यास त्याला कव्हर करतो.
- दहशतवादी हल्ल्याला आहे कव्हर
दहशतवादी हल्ल्यात तुमच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास, त्याचा समावेशही इन्शुरन्स प्लॅनमध्ये होतो. प्लॅन घेताना तुम्हाला वाटल्यास, तुम्ही अतिरिक्त तो तुमच्या होम इन्शुरन्समध्ये जोडू शकता. त्यासाठी वेगळे चार्जेस असू शकतात.
होम इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले जात नाही?
- जाणूनबुजून झालेले नुकसान
होम इन्शुरन्समध्ये काही गोष्टींना कव्हर नाही आहे. जसे की देखभाली अभावी आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे नुकसान झाले. तर त्याचा कव्हर तुम्हाला मिळणार नाही. तसेच, एखादी गोष्ट जाणूनबुजून केल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले तर त्यावरही कव्हर मिळत नाही.
- कार्यालयासाठी वापराचा कव्हर नाही
ज्या घराचे होम इन्शुरन्स करुन आहे, त्याचा वापर कार्यालयासाठी केल्यास, पाॅलिसीधारकाला कोणतीही भरपाई दिली जात नाही. तसेच, घराचा वापर राहण्यासाठी सोडून इतर कोणत्याही गोष्टींसाठी केला जात असल्यास क्लेम फेटाळण्यात येतो.
- फक्त नैसर्गिक नुकसानीचा कव्हर
पाणी जर हळूहळू टपकत असले आणि त्यामुळे घर खराब झाले तर त्यासाठी इन्शुरन्स कंपनी त्या क्लेमवर प्रक्रिया करणार नाही. फक्त पुरामुळे झालेले नुकसान किंवा अनपेक्षित आणि नकळत पाण्याशी संबंधित नुकसान इन्शुरन्सद्वारे कव्हर केले जाते.