Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Warehouse Rent: मुंबई, बंगळुरुसह दिल्लीतही गोदामांच्या भाड्यात वाढ; वस्तुंच्या किंमती वाढणार?

Warehouse Rent

कोणतेही उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहचताना त्यामध्ये वाहतूक, साठवणूक खर्चाचाही समावेश असतो. इंधनाच्या दरवाढीमुळे आधीच वाहतूक महाग झाली आहे. आता गोदामांमध्ये माल ठेवणेही महाग झाल्याने त्याचा परिणाम वस्तुंच्या किंमत वाढीत होऊ शकतो. मुंबई शहरातील भाडेवाढ सर्वाधिक आहे.

Warehouse Rent: भारतातील मेट्रो शहरांमधील गोदामांच्या भाड्यामध्ये मोठी वाढ होत आहे. कोरोनाकाळात ठप्प झालेले व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू झाल्यानंतर मागील वर्षांपासून प्रमुख शहरांतील गोदामांचे भाडे वाढले आहे. मुंबई, बंगळुरु दिल्ली ही शहरे यामध्ये आघाडीवर आहेत. मॅन्युफॅक्चरिंग, इ-कॉमर्स, थर्ड पार्टी लॉजिस्टिकमध्ये वाढ झाल्याने गोदामांची मागणीही सतत वाढत आहे. या भाडेवाढीचा परिणाम वस्तू आणि सेवांच्या किंमती वाढण्यामध्ये होऊ शकतो. कारण, कंपन्यांना भाड्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत.

वस्तू आणि सेवांच्या किंमती वाढणार? (Price Hike due to Logistic cost)

कोणतेही उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहचताना त्यामध्ये वाहतूक, साठवणूक खर्चाचाही समावेश असतो. इंधनाच्या दरवाढीमुळे आधीच वाहतूक महाग झाली आहे. आता गोदामांमध्ये माल ठेवणेही महाग झाल्याने त्याचा परिणाम वस्तुंच्या किंमत वाढीत होईल. मात्र, शहरांनुसार त्यामध्ये कमी जास्त बदल होतील. इ-कॉमर्स कंपन्यांना गोदामांची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यामुळे ऑनलाइन खरेदीही वाढू शकते.

देशात गोदामांच्या दरवाढीत मुंबई आघाडीवर (Wearhouse rent highest in Mumbai)

आशिया पॅसिफिक विभागामधील टॉप 10 लॉजिस्टिक मार्केटमध्ये भारताचा समावेश होतो. यातील दिल्ली, मुंबई आणि बंगळुरु शहरातील वाढ झपाट्याने होत आहे. मुंबई शहराचा क्रमांक आशिया विभागात 6 वा आहे. गोदामांच्या भाड्याचा सर्वाधिक दर मुंबई शहरात आहे. (Wearhouse rent in Mumbai) 2022 साली अर्थव्यवस्थेला उभारी मिळाली. चालू वर्षी आणखी आशादायक चित्र असल्याने प्रमुख शहरांतील भाडे आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दर महिन्याला मुंबईमध्ये गोदामाचे भाडे प्रति स्केअर फूट 22 रुपये इतके आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये 9.3 टक्के वाढ झाली आहे. नाइट फ्रँक इंडिया या कंपनी याबाबतचा डेटा जाहीर केला आहे. मुंबईमध्ये येत्या काळात 1.1 मिलियन स्केअर फूट नवी जागा गोदामांसाठी तयार होईल अशी शक्यता आहे.

निर्मिती क्षेत्राची झपाट्याने वाढ होत असून तयार झालेला माल ठेवण्यासाठी गोदामांची मोठ्या प्रमाणावर गरज पडते. मालाची साठवणूक आणि वाहतूक करण्यासाठी अनेक थर्ड पार्टी कंपन्यांनी उभ्या राहिल्या आहेत. आशिया-पॅसिफिक रिजनमध्ये बंगळुरु लॉजिस्टिक मार्केटमध्ये आठव्या क्रमांकावर आहे तर दिल्ली 9 व्या क्रमांकावर आहे.

निर्मिती आणि पायाभूत सुविधांची वाढ (Manufacturing and Infrastructure development In India)

भारतामध्ये पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होत आहे. केंद्र सरकारने 2023 बजेटमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सर्वाधिक पैशांची तरतूद केली आहे. तसेच निर्मिती क्षेत्रालाही चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे मालाची वाहतूक आणि साठवणुकीच्या सुविधांची मागणी वाढली आहे. महिंद्रा, गती, ब्लू डार्ट, अपोलो, टीव्हीएस अशा बड्या कंपन्या या क्षेत्रामध्ये आहेत. सोबतच औद्योगिक परिसरातली लहान गोदामांचीही मागणी वाढली आहे.