Mutual Fund Money Withdrawal: तुम्हाला म्युच्युअल फंड रिडेम्प्शन (Mutual fund redemption) ऑनलाईन किंवा ऑफलाईन करता येते. यासाठी तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंड हाऊसच्या वेबसाईट किंवा मोबाईल अॅपवर लॉग इन करावे लागेल. तसेच, तुम्हाला युनिट ऑफलाईन रिडीम करण्यासाठी, एक रिडेम्प्शन फॉर्म भरावा लागेल.
त्यानंतर तो AMC (अॅसेट मॅनेजमेंट कंपनी) किंवा त्यांच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (RTA) कडे सादर करावा लागेल. याशिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड युनिट रिडीम करता तेव्हा रिडेम्प्शनच्या दिवशी तुम्हाला फंडाचे नेट अॅसेट व्हॅल्यू (NAV) मिळेल. NAV ही फंडाची प्रति युनिट किंमत आहे आणि ती रोजच मोजली जाते.
जर तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड युनिट रिडीम करण्याचा विचार करत असाल तर त्याचे फायदे-तोटे माहिती करुन घेणे आवश्यक आहे. तसेच, तुम्हाला काही गोंधळ वाटत असल्यास तुम्ही आर्थिक सल्लागाराचा सल्ला ही घेऊ शकता. पण, त्याआधी या गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
Table of contents [Show]
रिडेम्प्शन प्रक्रिया घ्या समजून
तुम्ही ज्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे, त्याची रिडेम्प्शन प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे. कारण, वेगवेगळ्या फंडांची पद्धत थोडी वेगळी असू शकते. यासाठी तुम्ही तुमच्या फंडाचे ऑफर डॉक्युमेंट पुन्हा पाहू शकता. तसेच, तुम्हाला आवश्यक वाटल्यास तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला ही घेऊ शकता.
मिनिमम होल्डिंग पीरियड करा चेका
आपण ज्या फंडात गुंतवणूक करतो, त्याला मिनिमम होल्डिंग पीरियड आहे का ते चेक करणे आवश्यक आहे. कारण, ठरावीक अवधीपूर्वी गुंतवणूक रिडीम केल्यास काही फंडांमध्ये एक्झिट लोड असू शकतो. त्यासाठी तुम्हाला चार्ज द्यावा लागू शकतो. म्हणून पैसे काढण्याआधी मिनिमम होल्डिंग पीरियड चेक करा. तसेच, एक्झिट चार्ज ही पाहून घ्या.
ज्या दिवशी तुम्ही रिडीम करणार असाल त्या दिवशी म्युच्युअल फंड योजनेचा NAV चेक करा. कारण, NAV रोजच बदलत असते, त्यामुळे जास्तीतजास्त रिटर्न मिळावा वाटत असल्यास योग्य NAV वर रिडीम करत असल्याची पुष्टी करा. तरच रिडीम केल्यावर तुम्हाला फायदा होऊ शकतो.
रिडेम्प्शनची पद्धत निवडा
सर्वात आधी तुम्हाला तुमचे म्युच्युअल फंड युनिट्स कसे रिडीम करायचे आहेत हे ठरवणे आवश्यक आहे. तुमचे फिजिकल सर्टिफिकेट, तुमच्या बँक खात्यात थेट क्रेडिट करु शकता किंवा सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन (SWP) या दोन्हीतून एक निवडू शकता.
बँक खाते डिटेल्स द्या अचूक
तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता, तेव्हाच नोंदणीकृत बॅंक खाते देणे फायद्याचे ठरते. तसेच, पैसे काढताना ते अचूक असल्याची पुष्टी करा. कारण, रिडेम्प्शनची रक्कम याच खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे बॅंकेची माहिती देताना सर्व गोष्टी योग्य असल्याची पुष्टी करा.
KYC अपडेट करा
रिडेम्प्शन करण्याआधी KYC डिटेल्स अपडेट असल्याची खात्री करा. तसेच, जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक माहितीत काही बदल केले असतील तर तुमच्या KYC रेकॉर्ड फंड हाऊसकडे ते बदल अपडेट करा.
टॅक्स संबंधित गोष्टी पाहा
तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यावर टॅक्सवर त्याचा काही परिणाम होतो का हेही समजून घ्या. तसेच, यावर भांडवली नफा टॅक्स लागू होऊ शकतो. यामुळे टॅक्स दायित्व कमी करण्यासाठी तुम्ही एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेऊ शकता.
सबमिशनची पद्धत घ्या जाणून
तुम्ही रिडेम्प्शनची विनंती फंड हाऊसच्या वेबसाईटवरुन, मोबाईल अॅप किंवा रजिस्ट्रार किंवा फंड हाऊसच्या कार्यालयात सादर केलेल्या फिजिकल फॉर्मद्वारे करु शकता. बरेच जण मोबाईल अॅपचा वापर करतात, त्यामुळे त्यांच्यासाठी ही प्रोसेस सोपी ठरु शकते.
चार्जेस करा चेक
रिडेम्प्शन करताना काही फंड व्यवहार किंवा सेवा चार्जेस घेऊ शकतात, त्यामुळे त्याची माहिती देखील पैसे काढण्यापूर्वी घेणे आवश्यक आहे.
तुम्ही एकदा तुमच्या रिडेम्प्शनची विनंती सबमिट केल्यानंतर, तुम्हाला पावती मिळाल्याची खात्री करा. हे तुम्ही केलेल्या विनंतीचा पुरावा म्हणून काम करेल. तसेच, तुमच्या रिडेम्प्शनचे स्टेट्स ट्रॅक करायलाही मदत करेल. याशिवाय तुम्हाला रिडेम्प्शन करताना गोंधळल्यासारखं वाटत असले तर तुम्ही एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेऊ शकता. कारण, तुमच्या कमाईचा पैसा आहे. त्यामुळे तो काढताना तुमचा तोटा व्हायला नको.