Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Lava Agni 2 5G ची वाट बघताय? आज होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

LAVA AGNI 2 5G

मे महिन्यापासून सातत्याने या मोबाईलसाठी ग्राहकांची विचारणा होत होती. कंपनीने मात्र लॉन्च तारीख जाहीर केली नव्हती. आता मात्र हा मोबाईल कुठे आणि कधी खरेदी करता येणार आहे हे स्वतः कंपनीने सांगितले असल्यामुळे खरेदीदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 Lava Agni 2 5G या मोबाईल फोनची काही दिवसांपूर्वी जोरदार चर्चा होती. याचे कारण म्हणजे संपूर्ण भारतीय बनावटीचा हा मोबाईल स्वस्तात मस्त फीचर्स देणारा होता. या वर्षी मे महिन्यात कंपनीने हा मोबाईल लॉन्च केला होता. यासाठी अनेकांनी अमेझॉनवर त्याचे प्रिबुकिंग केले होते. मात्र मोबाईल लॉन्च होताच तो हातोहात विकला गेला आणि खरेदीसाठी वाट बघणाऱ्या टेक्नोसेवी लोकांच्या पदरी निराशा आली होती. सोशल मिडीयावर या प्रकरणाची जोरदार चर्चा होती.

आता पुन्हा एकदा हा Lava Agni 2 5G तुमच्या भेटीसाठी येतो आहे. मोबाईल कधी लॉन्च होणार याची तारीख देखील कंपनीने जाहीर केली आहे. मे महिन्यापासून सातत्याने या मोबाईलसाठी ग्राहकांची विचारणा होत होती. कंपनीने मात्र लॉन्च तारीख जाहीर केली नव्हती. आता मात्र हा मोबाईल कुठे आणि कधी खरेदी करता येणार आहे हे स्वतः कंपनीने सांगितले असल्यामुळे खरेदीदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून तुम्ही Amazon वर हा 5 G स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहात. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेजसाह हा स्मार्ट फोन तुम्हांला केवळ  21,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे.

अतिरिक्त ऑफर 

सध्या हा मोबाईल ग्राहकांना Amazon वर खरेदी करता येणार असून, तुम्ही मोबैअल खरेदी करतांना जर HDFC किंवा SBI या बँकेचे क्रेडीट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला खरेदीवर अतिरिक्त सवलत मिळणार आहे. होय, क्रेडीट कार्डचा वापर करून पैसे भरल्यास तुम्हाला इंस्टंट 2000 रुपयांची सवलत दिली जाणार आहे. म्हणजेच तुम्हांला हा मोबाईल 19,999 रुपयांत खरेदी करण्याची देखील संधी दिली जाणार आहे.

हे आहेत फीचर्स 

Lava Agni 2 स्मार्टफोन 6.78-इंचाच्या FHD+ डिस्प्लेसह कंपनीने डिझाईन केला आहे. यात HDR10+ सह 120Hz 3D डिस्प्ले देखील आहे. स्मार्टफोनची किंमत लक्षात घेता हे फीचर्स ग्राहकांना उत्तम अनुभव देणारे आहेत. चिपसेट बद्दल बोलायचे झाल्यास MediaTek Dimensity 7050 chipset ला सपोर्ट करणारा हा भारतातील पहिलाच स्मार्टफोन आहे.हा स्मार्टफोन Android 13 वर चालतो तसेच  Android 14 आणि Android 15 वर हा स्मार्टफोन ग्राहकांना अपग्रेड देखील करता येणार आहे.

फोटोग्राफी आणि व्हिडियोग्राफीसाठी हा मोबाईल उत्तम ऑप्शन ठरू शकतो. हा स्मार्टफोन युजर्सला 50MP+8MP+2MP+2MP क्वाड कॅमेरा सेटअपसह सर्वोत्तम फोटोग्राफीचा अनुभव प्रदान करणार आहे. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी 4700mAh बॅटरी यात दिली गेली आहे. याशिवाय 66W फास्ट चार्जिंगची सुविधा देखील यात दिली गेली आहे. साधारण वापर करणाऱ्या युजर्सला दिवसभर पुरेल अशी मोबाईल चार्जीग अनुभवता येणार आहे.