तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्स रिफंडची आतुरतेने वाट पाहत असून तुम्हाला तो अजून मिळाला नसेल तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असणे आवश्यक आहे. कारण, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने त्यांच्या सोशल मीडिया X वरून 5 सप्टेंबरला माहिती दिली आहे की, फक्त व्हॅलिडेटेड बॅंक खात्यांनाच रिटर्न मिळणार आहे.
त्यामुळे बॅंक खात्याच्या डिटेल्समध्ये काही बदल केले असल्यास, पूर्वीचे व्हॅलिडेटेड बॅंक खाते अपडेट आणि रि-व्हॅलिडेटेड करण्याची आवश्यकता असू शकते. त्यामुळे तुम्हाला अजून रिफंड मिळाला नसेल तर तुम्ही तुमचे बॅंक खाते अपडेट आणि रि-व्हॅलिडेटेड करु शकता.
Table of contents [Show]
ई-व्हेरिफिकेशनचा फायदा
इन्कम टॅक्स रिफंड प्राप्त करण्यासाठी, पहिले तुमचे बॅंक खाते प्री-व्हॅलिडेटेड असणे आवश्यक आहे. याशिवाय ई-व्हेरिफिकेशनसाठी ईव्हीसी (इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड) सक्षम करायला विशिष्ट करदात्याद्वारे प्री-व्हॅलिडेटेड बॅंक खात्याचा वापर केला जाऊ शकतो. तसेच, टॅक्स रिटर्न, अन्य फाॅर्म, ई-प्रोसिडिंग्स, रिफंड रिइश्यू , पासवर्ड रिसेट आणि ई-फायलिंग खात्यावर सुरक्षित लॉग इन या सर्व गोष्टी ई-व्हेरिफिकेशनचा वापर करुन करता येणार आहेत.
Kind Attention Taxpayers!
— Income Tax India (@IncomeTaxIndia) September 5, 2023
Your refund can only be credited into a validated bank account. So, please check bank account validation status on e-filing portal.
Pl visit https://t.co/GYvO3mRVUH ➡️ Login ➡️ Profile ➡️ My Bank Account ➡️ Revalidate/Add Bank Account
Previously… pic.twitter.com/nt80jNccxM
बॅंक खाते हवे रि-व्हॅलिडेटेड
सोशल मीडिया X नुसार, बॅंक खात्याच्या डिटेल्समध्ये काही बदल केले असल्यास, पूर्वीचे व्हॅलिडेटेड बॅंक खाते अपडेट आणि रि-व्हॅलिडेटेड करण्याची आवश्यकता असू शकते. त्यामुळे करदात्यांना बॅंक खाते व्हॅलिडेटेड करणे आवश्यक आहे. ते करण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला त्याची प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
पोर्टलवरुन व्हॅलिडेटेड स्टेट्स कसं चेक करायचं?
- http://incometax.gov.in भेट द्या आणि लाॅग इन करा.
- प्रोफाईल सेक्शनमध्ये जा.
- 'My Bank Account'वर क्लिक.
- बँक खाते रि-व्हॅलिडेट करा किंवा जोडा.
व्हॅलिडेशन विनंतीचे स्टेट्स तुम्ही ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल पत्त्यावर पाठवण्यात येते.
व्हॅलिडेशन अयशस्वी झाल्यास?
व्हॅलिडेशन अयशस्वी झाल्यास, तुम्हाला ती माहिती अयशस्वी बॅंक खात्याखाली दाखवल्या जाते. जर प्री-व्हॅलिडेशनसाठी बॅंक अयशस्वी दाखवत असल्यास, तुम्ही ते बॅंक खाते व्हॅलिडेशनसाठी रिसबमिट करु शकता. यासाठी अयशस्वी बॅंक खाते सेक्शनमध्ये रि-व्हॅलिडेटवर क्लिक करा आणि तुमच्या खात्यावर ‘Validation in progress’ स्टेट्स दिसेल.