Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Voltas Offers for Ganesh Festival: वोल्टासची गणेशोत्सवात फेस्टिव्ह ऑफर्स आणि कॅशबॅक

voltas

Voltas Offers for Ganesh Festival: वोल्टासने अनेक सेवा देण्याची घोषणा केली असून, एसीच्या एक्सचेंज ऑफरसोबत ग्राहकांना कॅशबॅक, इझी ईएमआय, एक्सटेंडेड वॉरंटी आणि इन्स्टॉलेशनची सेवा मिळणार आहे.

वोल्टास लिमिटेड या रूम एअर कंडिशनरमधील सर्वात आघाडीच्या कंपनीने ग्राहकांसाठी विविध उत्पादनांवर ऑफर्स आणल्या आहेत. कॅशबॅक, अतिरिक्त वॉरंटी आणि एसी एक्सचेंज केल्यास इन्स्टॉलेशनसारख्या ऑफर्सही कंपनीने ग्राहकांसाठी उपलब्ध केल्या आहेत.

वोल्टासने अनेक सेवा देण्याची घोषणा केली असून, एसीच्या एक्सचेंज ऑफरसोबत ग्राहकांना कॅशबॅक, इझी ईएमआय, एक्सटेंडेड वॉरंटी आणि इन्स्टॉलेशनची सेवा मिळणार आहे.  ग्राहकांना आपल्या घराला अजून अत्याधुनिक बनवता यावे, यासाठी कंपनीने काही ठराविक डेबिट आणि क्रेडिट कार्डवरील खरेदीसाठी 15% कॅशबॅकची ऑफर दिली आहे. 

वोल्टास बेको होम अप्लायसेन्सच्या विविध उत्पादनांवर एनबीएफसीद्वारे सुलभ मासिक हप्त्यांवर वित्तपुरवठा करण्याची योजना आणली आहे. वर्षानुवर्षे कंपनीची उत्पादने वापरणाऱ्या लॉयल ग्राहकांसाठी वोल्टासने या ऑफर्स आणल्या असून त्या मर्यादित काळासाठी आहेत.

या ऑफर्सबद्दल माहिती देताना वोल्टास लिमिटेडचे एमडी आणि सीईओ प्रदीप बक्षी म्हणाले की,  “गणेशोत्सवाचा हा मंगलमय हा उत्सव विशेषतः महाराष्ट्रात अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी कंपनी सज्ज आहे. गणेशोत्सवातील आनंद द्विगुणीत करण्यासाठी वोल्टासने नव्या ऑफर्स  आणि अनेक नवी उत्पादने आणली आहेत.  

ग्राहकांना  दिवाळी, नवरात्री, दुर्गा पुजा आणि इतर सणांच्या काळातही अशाच विविध ऑफर्स देण्यात येणार आहेत. या ऑफर्समुळे सणासुदीच्या उत्साहात भर पडते. त्यामुळे ग्राहकांना मंगलमय वातावरणात अनेकविध वस्तू खरेदीही करता येतात.

ग्राहकांना त्यांच्या घरातील उत्पादने बदलता येतील, अपग्रेड करता येतील. कंज्युमर ड्युरेबल क्षेत्रात कंपनी आघाडीवर असून, नवनवीन गोष्टींसाठी आणि  ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार विविध उत्पादने बाजारात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

फेस्टिव्ह ऑफर्स

  • ग्राहकांना वोल्टास आणि वोल्टास बेकोच्या उत्पादनांवर 15 टक्के कॅशबॅक ऑफर 
  • फिक्स्ड ईझी ईएमआय आणि झिरो डाउन पेमेंटचे पर्यायही उपलब्ध
  • एक्स्चेंज ऑफरच्या अंतर्गत ग्राहकांना एसीवर एक्सटेंडेड वॉरंटी
  • एक्सचेंज ऑफरच्या अंतर्गत ग्राहकांना एसीचे फ्री स्टॅंडर्ड इन्स्टॉलेशन