Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

'Volkswagen Virtus GT DSG' कार भारतात लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Volkswagen Virtus GT DSG Launch in India

Image Source : www.v3cars.com

Volkswagen Virtus GT DSG Launch: जर्मन कार निर्माता कंपनी फोक्सवॅगनने भारतीय बाजारात 'फोक्सवॅगन व्हर्टस जीटी डीएसजी' (Volkswagen Virtus GT DSG) ही नवीन कार लॉन्च केली आहे. सात वेगवेगळ्या रंगात आणि आधुनिक फीचर्स या कारमध्ये ग्राहकांना मिळणार आहेत. मात्र त्यासाठी ग्राहकांना किती रुपये मोजावे लागतील, जाणून घेऊयात.

भारतात अनेक चारचाकी कार वापरल्या जातात. ज्यामध्ये होंडा (Honda), मारुती (Maruti), ह्युंदाई (Hyundai), टाटा (Tata) आणि फोक्सवॅगन (Volkswagen) यासारख्या नामांकित ब्रँडचा समावेश आहे. जर्मन कार निर्माता कंपनी फोक्सवॅगनने भारतीय बाजारात नवी कार लॉन्च केली आहे. कंपनीने सेडान सेगमेंटचा विस्तार करत, देशात ‘फोक्सवॅगन व्हर्टस जीटी डीएसजी’ (Volkswagen Virtus GT DSG) कार लॉन्च केली आहे. जागतिक स्तरावर या कारची यशस्वी विक्री केल्यानंतर कंपनीने ही कार भारतात लॉन्च केली आहे. यानिमित्ताने या कारचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

'Volkswagen Virtus GT DSG' चे फीचर्स जाणून घ्या

Volkswagen Virtus GT DSG मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 10-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. तसेच यात कनेक्टेड कार टेक, 8 स्पीकर, वायरलेस चार्जिंगची सिस्टीम दिली आहे. याशिवाय रेड-पेंट केलेले फ्रंट ब्रेक कॅलिपर, जीटी-थीम असलेली अपहोल्स्ट्री आणि ब्लॅक रिअर स्पॉयलर यासारखी विशेष जीटी टच वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Volkswagen Virtus GT DSG कारमध्ये 1.5-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 148bhp पॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करते. फोक्सवॅगन ग्रुपने आपल्या नवीन कारमध्ये दिलेले इंजिन डीएसजी गिअरबॉक्ससोबत जोडले आहे.

कंपनीचा असा दावा आहे की, Volkswagen Virtus GT DSG एक लिटर इंधनाचा वापर करून 19.62 किलोमीटरचे अंतर कापेल. तसेच फॉक्सवॅगनने या कारमध्ये  अॅक्टिव्ह सिलेंडर कट-ऑफ तंत्रज्ञान देखील दिले आहे, जे इंधनाची बचत करण्यासाठी मदत करते. ज्याच्या मदतीने ग्राहक कमी इंधनात जास्त अंतराचा प्रवास करू शकतील.

Volkswagen Virtus GT DSG वाइल्ड चेरी रेड (Wild Cherry Red), करकुमा येलो (Curcuma Yellow), कार्बन स्टील ग्रे (Carbon Steel Grey), राइजिंग ब्लू (Rising Blue), कँडी व्हाइट(Candy White), लावा ब्लू (Lava Blue),आणि रिफ्लेक्स सिल्व्हर (Reflex Silver) सारख्या सात रंगात कार उपलब्ध आहे.

'Volkswagen Virtus GT DSG' ची किंमत जाणून घ्या

volkswagen-virtus-price-based-on-variant.jpg

फोक्सवॅगन व्हर्टस जीटी डीएसजीची (Volkswagen Virtus GT DSG) एक्स-शोरूम किंमत 16.19 लाख रुपयांपासून सुरु होते. या कारची किंमत ही तिच्या व्हेरियंटनुसार बदलणार आहे.

प्रतिस्पर्धी कोण आहेत?

फोक्सवॅगन व्हर्टस जीटी डीएसजी (Volkswagen Virtus GT DSG) बाजारातील नामांकित होंडा सिटी (Honda City), ह्युंदाई व्हर्ना (Hyundai Verna), मारुती सुझुकी सियाझ (Maruti Suzuki Ciaz) आणि स्कोडा स्लाव्हिया (Skoda Slavia) यांसारख्या वाहनांना स्पर्धा निर्माण करणार आहे.

Source: hindi.financialexpress.com