Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

'Vivo X90' स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदी केल्यावर मिळू शकतो 36,000 रुपयांचा डिस्काउंट; कसा, जाणून घ्या

Vivo X90 Smartphone Flipkart Deal

Vivo X90 Smartphone Flipkart Deal: विवो कंपनीचा 'Vivo X90' हा स्मार्टफोन एप्रिल 2023 मध्ये भारतीय बाजारपेठेत दाखल झाला. या फोनची किंमत 61,999 रुपये असून फ्लिपकार्टवरून या फोनची खरेदी केल्यावर ग्राहकांना 36,000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. तो कसा, जाणून घेऊयात.

सध्या भारतीय बाजारपेठेत अनेक नामांकित मोबाईल कंपन्या सक्रिय आहेत. त्यापैकीच एक म्हणजे विवो (Vivo). 26 एप्रिल 2023 रोजी भारतीय बाजारपेठेत 'Vivo X90' स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला. या स्मार्टफोनला भारतीय बाजारपेठेत येऊन केवळ दोन महिने होतायेत न होतायेत तो पर्यंत या फोनवर 36,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. ऑनलाईन रिटेल वेबसाईट फ्लिपकार्टवर (Flipkart) हा डिस्काउंट देण्यात येत आहे. तो कसा मिळवायचा, जाणून घेऊयात.

फ्लिपकार्टवर मिळतोय 'इतका' डिस्काउंट

विवो कंपनीचा 'Vivo X90' हा नवीन स्मार्टफोन ग्राहक फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या या फोनची  किंमत 61,999 रुपये आहे. या फोनच्या खरेदीवर फ्लिपकार्टकडून 3 टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. हा डिस्काउंट पकडून या फोनची किंमत 59,999 रुपये होते.

बँक ऑफर्सबाबत माहिती जाणून घ्या

या फोनच्या खरेदीवर वेगवेगळ्या बँकेकडून ऑफर्स देण्यात येत आहेत. एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) क्रेडिट कार्डवरून या फोनची खरेदी केल्यावर 4,000 रुपयांचा त्वरित डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय अ‍ॅक्सिस बँकेच्या फ्लिपकार्ट कार्डवरून (Axis Bank's Flipkart card) खरेदी केल्यावर 5 टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. तसेच कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरून (Kotak Mahindra Bank credit and debit card) खरेदी केल्यावर 2000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे.

36,000 हजारांचा डिस्काउंट कसा मिळेल?

फ्लिपकार्टवर स्मार्टफोन एक्सचेंजची ऑफर देण्यात येत आहे. या ऑफर अंतर्गत 36000 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करावा लागणार आहे. 36000 रुपयांचा डिस्काउंट हा तुमच्या एक्सचेंज करण्यात आलेल्या स्मार्टफोनच्या स्थितीवर देण्यात येईल. त्यानुसार ही किंमत बदलू देखील शकते.

'Vivo X90' फोनचे फीचर्स जाणून घ्या

या फोनमध्ये 17.22 सेमीचा (6.78 इंच) फुल एचडी डिस्प्ले (HD display) देण्यात आला आहे. तसेच Dimensity 9200 Processor देण्यात आला आहे, ज्यामुळे फोनला उत्तम स्पीड मिळेल.

Vivo X90 मध्ये 50Mp +12Mp + 12Mp चे तीन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. तर 32MP चा सेल्फी काढण्यासाठी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनची बॅटरी क्षमता 4810mAh इतकी असून दीर्घकाळ फोन चालण्यासाठी मदत होणार आहे. यामध्ये 8GB रॅम आणि 256 GB स्टोरेज देण्यात आले आहे.

Source: navbharattimes.indiatimes.com