Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Ananda : भारतीय आयुर्विमा महामंडळाचे आनंदा ॲप कोणासाठी आहे? काय आहेत याचे फायदे?

LIC Ananda : भारतीय आयुर्विमा महामंडळाचे आनंदा ॲप कोणासाठी आहे? काय आहेत याचे फायदे?

Image Source : www.youtube.com

LIC साठी काम करणाऱ्या एजंटसाठी 2020 मध्ये एलआयसी आनंदा हे डिजिटल ॲप लॉन्च केले आहे.'ANANDA' म्हणजे आत्म निर्भर एजंट्स न्यू बिझनेस डिजिटल अॅप होय. हे अॅप फक्त LIC एजंटसाठी आहे. हे नवीन एलआयसी पॉलिसी नोंदणीच्या वापरासाठी आहे.

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) या सरकारी संस्थेमध्ये अनेक पूर्णवेळ कर्मचारी आणि लाखो एजंट काम करतात. एलआसीचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात एजंटवर अवलंबवून आहे. या एंजटच्या माध्यमातून LIC नवीन विमा पॉलिसीधारकांना जोडण्याचे किंवा आपल्या नवीन विमा पॉलिसीची विक्री करत असते. मात्र, एलआयसी एजंटला पॉलिसीच्या कामासाठी प्रत्येकवेळी ऑफिसला येण्याची गरज पडू नये यासाठी एलआयसीने डिजिटल ॲप लॉन्च केले आहे. ते ॲप एलआयसी आनंदा(ANANDA) या नावाने ओळखले जाते.

हे ॲप फक्त LIC एजंटसाठी 

संपूर्ण देशभरात एलआसीचे जवळपास 13 लाख एजंटचे जाळे आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत या अभियानाला जोड देत एलआयसीने देखील आपल्या व्यवसाय वाढीवर भर देत LIC साठी काम करणाऱ्या एजंटसाठी 2020 मध्ये एलआयसी आनंदा हे डिजिटल ॲप लॉन्च केले आहे.'ANANDA' म्हणजे आत्म निर्भर एजंट्स न्यू बिझनेस डिजिटल अॅप होय. हे अॅप फक्त LIC एजंटसाठी आहे. हे नवीन एलआयसी पॉलिसी नोंदणीच्या वापरासाठी आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांची पॉलिसी अपडेट करता येते. तसेच ग्राहकांची पेपरलेस प्रक्रिया पूर्ण करता येणे सोपे झाले आहे. विमा एजंटना पॉलिसी संबंधित सर्व प्रक्रिया करणे अगदी सुलभ आणि जलद झाली आहे.

या ॲपचे फायदे काय आहेत?

एलआयसी एजंटसाठी आनंदा हे अॅप  वापराचे अनेक फायद आहेत. यासाठी एलआयसी एजंटला अॅपवर आपला आयडी वापरून लॉगिन करणे गरजेचे आहे. तसेच या अॅपचा कोविड महामारी दरम्यान एजंटना कोणत्याही प्रत्यक्ष भेटी घेण्याची गरज पडली नाही. तसेच सद्यस्थितीतही एजंटना कोणत्याही वेळी पॉलिसी संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करता येते.पॉलिसी लाइव्ह नंबर वाढवण्यास मदत होते. ज्यामुळे LIC एजंटच्या CLUB सदस्यत्वासाठी अधिक फायदा होतो. तसेच ग्राहकांसाठी ऑनलाइन पेमेंटची सुविधा होते.