Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vegetable oil import: खाद्यतेल आयातीत 28 टक्क्यांनी वाढ; पामतेलाला सर्वात जास्त मागणी

Vegetable oils import

Image Source : www.thesouthafrican.com

भारतीयांच्या जेवणातील तेलाचं प्रमाण वाढल्याचं खाद्यतेल आयातीच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यात खाद्यतेल आयातीत तब्बल 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

भारतीयांच्या जेवणातील तेलाचं प्रमाण वाढल्याचं खाद्यतेल आयातीच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यात खाद्यतेल आयातीत तब्बल 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यात भारताने 15.66 लाख टन खाद्यतेल आयात केले. यामध्ये रिफाइन्ड पामतेल आणि क्रूड म्हणजेच कच्च्या पामतेलाची सर्वात जास्त आयात करण्यात आली, असे Solvent Extractors' Association of India (SEA) या संस्थेने म्हटले आहे.

पाम तेलाची सर्वाधिक आयात

मागील वर्षी डिसेंबर 2021 मध्ये खाद्यतेलाची आयात 12 लाख 26 हजार 686 टन करण्यात आली होती. तर यामध्ये वाढ होऊन मागील वर्षी डिसेंबरमध्ये 15 लाख 66 हजार 129 कोटी टन तेलाची आयात करण्यात आली. सोबतच खाद्यतेलाव्यतिरिक्त इतर उपयोगांसाठी असलेल्या तेलाची आयात 9 हजार 832 टन वरून 10 हजार 349 टन एवढी वाढली. खाद्यतेलामध्ये पाम तेलाची आयात डिसेंबर 2021 मध्ये फक्त 24 हजार टन इतकी होती. त्यामध्ये वाढ होऊन तब्बल 2 लाख 56 हजार 398 टन तेल मागील वर्षी डिसेंबर महिन्यात आयात करण्यात आले.

नोव्हेंबर-डिसेंबर 2022 मध्ये, वनस्पती तेलाची आयात मागील वर्षीच्या याच कालावधीतील 24 लाख टनांच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढून 31 लाख 11 हजार 669 टन झाली. नोव्हेंबर-डिसेंबर 2022  मध्ये रिफाइंड पामोलिन आणि CPO (क्रूड पाम ऑइल) ची आयात मोठ्या प्रमाणात वाढली.

नोव्हेंबर-डिसेंबर 2022 या कालावधीत 4 लाख 58 हजार 646 टन रिफाइंड तेल आयात करण्यात आले होते, जे मागील वर्षीच्या कालावधीत 82 हजार 267 टन होते. नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मधील 22 लाख 73 हजार 419 टनांच्या तुलनेत गेल्या दोन महिन्यांत 26 लाख 25 हजार 894 टन कच्चे तेल आयात करण्यात आले, असे SEA संघटनेने सांगितले.