• 04 Oct, 2022 16:13

विकायम फॅशनचा आयपीओ ओपन; 11 ऑगस्टपर्यंत करता येणार गुंतवणूक

विकायम फॅशनचा आयपीओ ओपन; 11 ऑगस्टपर्यंत करता येणार गुंतवणूक

IPO Update : विकायम फॅशन अॅण्ड अॅपरेल लिमिटेड (Veekayem Fashion and Apparels Limited) ही कंपनीचा आयपीओ (IPO) शुक्रवारपासून (दि.5 ऑगस्ट) ओपन झाला असून तो 11 ऑगस्टपर्यंत खुला असणार आहे.

विकायम फॅशन अॅण्ड अॅपरेल लिमिटेड (Veekayem Fashion and Apparels Limited) ही कंपनीचा आयपीओ (IPO) शुक्रवारपासून (दि.5 ऑगस्ट) ओपन झाला असून तो 11 ऑगस्टपर्यंत खुला असणार आहे. या आयपीओमधून विकायम 4.44 कोटी रूपये उभारणार आहे. विकायम फॅशन अॅण्ड अॅपरेल लिमिटेडची स्थापना 1985 मध्ये झाली असून कंपनी कपडे आणि फॅशन उद्योगात कार्यरत आहेत.


विकायमच्या कंपनीच्या प्रोडक्शन पोर्टफोलिओमध्ये टेक्स्टाईल आणि गारमेंट अशा दोन मुख्य प्रकारांचा समावेश आहे. टेक्सटाईल कॅटेगरी अंतर्गत कंपनी 100 टक्के कॉटन, लायक्रा आणि नॉन-लायक्रा, मिक्स कॉटन, पॉलिस्टर कॉटन आदी कापडाची निर्मिती करते. तसेच विकायम कंपनी पुरूष आणि स्त्रियांसाठी सर्व प्रकारच्या तयार कपड्यांची निर्मिती सुद्धा करते. Veekayem Fashion चे उत्पादन केंद्र गुजरातमधील उमरगाव येथे आहे.

विकायम फॅशनचा आयपीओ 5 ऑगस्टला ओपन झाला असून तो 11 ऑगस्टपर्यंत खुला राहणार आहे. विकायमच्या एका शेअरची किंमत 28 रूपये असून शेअर्सची लॉटसाईज 4 हजार आहे. तर इश्यू साईज 15,84,000 शेअर असून यातून कंपनीने अंदाजे 4.44 कोटी रूपये उभे करण्याचा मानस ठेवला आहे. कंपनीने सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी 50 टक्के आणि हाय-नेटवर्थ गुंतवणूकदारांसाठी 50 टक्के ऑफर ठेवण्यात आली आहे. कृष्णकांत गुप्ता, विजयकुमार गुप्ता आणि मदनलाल गुप्ता हे कंपनीचे प्रमोटर आहेत.

कंपनीला 2021 वर्ष वगळता 2019, 2020 आणि 2022 मध्ये टॅक्स वगळून अनुक्रमे 228.31 लाख, 109.1 लाख आणि 188.54 लाख रूपयांचा नफा झाला होता. तर 2021 मध्ये फक्त 35.25 लाख रूपयांचा नफा झाला होता. 31 मार्च, 2022 मध्ये कंपनीची एकूण असेट 13267.19 लाख रूपये होती.