Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Valentine Day: लग्नासाठी 36 गुण जुळले! मात्र, साथीदारासोबत पैशांची कुंडली जुळत नसेल तर 'ही' लक्षणे ओळखा

Valentine Day

प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. जोडीदाराची निवड मात्र तुम्ही डोळसपणे करा. प्रेम आणि त्यानंतर विवाह हा काही एक दोन दिवसांचा किंवा महिन्याभराचा खेळ नाही. दोघांना आयुष्यभर बरोबर रहावं लागतं. जसे कुंडलीत गुण जुळतात का हे लग्न ठरण्याआधी पाहतात, तसेच पैशांच्या विचाराबाबत दोघांची कुंडली जुळते का? हेही पाहायला हवं.

Valentine Day: आज जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. जोडीदाराची निवड मात्र तुम्ही डोळसपणे करा. प्रेम आणि त्यानंतर विवाह हा काही एक दोन दिवसांचा किंवा महिन्याभराचा खेळ नाही. दोघांना आयुष्यभर बरोबर रहावं लागतं. जशी गुणांची कुंडली लग्न ठरण्याआधी पाहतात, तशी दोघांच्या पैशांच्या विचारांची कुंडली जुळते का तेही पाहायला पाहिजे.

वैवाहिक जीवनात (couple Financial planning) अनेक वेळा पैशांवरून भांडणे होतात. दोघेही काम करत असतील तर पती पत्नीकडून पैसे कोठे खर्च होतात, कुठे गुंतवणूक केली आहे, किंवा कोणाला पैसे दिले आहेत, याबाबतची माहिती लपवण्याचेही प्रकार घडतात. यातून गैरसमज निर्माण होतात आणि दोघांमध्ये भांडणे होतात. जर तुमचेही तुमच्या पार्टनर सोबत सारखे वाद होत असतील तर त्यामागे खालील कारणे असू शकतात.

तुमचा पार्टनर पैशांबाबत बोलण्यास कम्फर्टेबल नाही -

तुमच्या साथीदारासोबत तुम्ही पैशांचे नियोजन, गुंतवणूक, खर्च, भविष्यातील मोठे खर्च, विमा अशा गोष्टींवर सविस्तर चर्चा करायला हवी. जर तुमचा साथीदार अशा विषयांवर बोलत नसेल तर त्याला कोणत्या गोष्टींची अडचण आहे हे जाणून घ्या. जर एकाने आर्थिक विषय काढला तर दुसरा त्यास टाळाटाळ करत असेल तर त्यामागे एखाद्याने केलेला अवास्तव खर्च असून शकतो. एकमेकांसोबत आर्थिक व्यवहारांबाबत खोटे बालणे टाळा. थोडा वेळ घ्या मात्र, काणतीही गोष्ट लपवू नका. तुमचा पार्टनर जर अर्थसाक्षर नसेल तर त्याला अर्थसाक्षर करा. म्युच्युअल फंड, शेअरमार्केट, गुंतवणूक  योजना, महिला योजना यांसारख्या गोष्टींची माहिती द्या. मग पैशांचे महत्त्व आपोआप समजेल. 

तुमचा साथीदार फक्त आजचा विचार करतो - 

अनेक जण भविष्याचा विचार करत नाहीत. आजचा दिवस कसा जगायचा यावर भर असतो. त्यामुळे शॉपिंग, फूड, ट्रिप आणि महाग वस्तू खरेदी करण्यावर भर असतो. या गोष्टींचा परिणाम दीर्घकालीन पैशांच्या नियोजनावर होतो. जर तुमचा पार्टनर भविष्याचा विचार करत नसेल तर हा चिंतेचा विषय आहे. भविष्याबाबतच्या चर्चा दोघांनी मिळून केल्या पाहिजेत. घर, गाडी, मुलांचे शिक्षण याबाबत नियोजन अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कोठे गुंतवणूक केली पाहिजे, कोणते पर्याय योग्य आहेत यावर दोघांनी मिळून चर्चा केली पाहिजे.

अवास्तव खर्चाची सवय - 

स्वत:च्या आनंदासाठी पैसा खर्च करण्यात वावगं असं काहीही नाही. मात्र, जर दोघांपैकी एकाने अवास्तव खर्च करण्यास सुरूवात केल्यास वादाची ठिणगी पेटू शकते. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्यास अडचणी वाढू शकतात. जसे की  क्रेडिट कार्डचा अति प्रमाणात वापर तुमचं खर्चाचं गणित बिघडू शकतं. यावरुनही दोघांमध्ये वाद होऊ शकतो. प्लास्टिक मनीवर आवर घालणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा अडचणीच्या वेळी पैशांची चणचण भासू शकते. 

कर्ज घेण्याची सवय-

जर तुमच्या साथीदाराला कायम कर्ज घेण्याची सवय असेल तर हा देखील चिंतेचा विषय आहे. उत्पन्न पुरेसे नसताना देखील कर्ज घेत असेल तर हप्ते थकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे भविष्यात cibil score खराब होईल. मग अशा वेळी तुम्ही भविष्यातील मोठ्या गोष्टींसाठी कर्ज काढण्यास जाल तेव्हा अडचणी निर्माण होतील. कर्जासोबतच कोणाला पैसे दिले आहेत याची जर व्यवस्थित माहिती तुमचा पार्टनर ठेवत नसेल तर यातून निष्काळजीपणा दिसून येतो.